Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा मोटर्सने २० हून अधिक जिल्‍ह्यांमध्‍ये १००० जलस्रोतांचे संवर्धन करण्‍यासाठी महाराष्‍ट्र सरकारसोबत...

टाटा मोटर्सने २० हून अधिक जिल्‍ह्यांमध्‍ये १००० जलस्रोतांचे संवर्धन करण्‍यासाठी महाराष्‍ट्र सरकारसोबत केली हातमिळवणी

मुंबई, फेब्रुवारी 4, 2025: जल संसाधनांची सुरक्षा आणि ग्रामीण समुदायांची उन्‍नती करण्‍याप्रती आपली कटिबद्धता दृढ करत टाटा मोटर्सने महाराष्‍ट्र सरकारसोबत सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केली. या करारांतर्गत राज्‍यातील पाणीटंचाई असलेल्‍या प्रांतांतील २० हून अधिक जिल्‍ह्यांमधील १००० जलस्रोतांचे संवर्धन करण्‍यात येईल. २०२४ मध्‍ये, टाटा मोटर्सने महाराष्‍ट्र सरकारचा जमीन व जल संवर्धन विभाग, नाम फाऊंडेशन आणि स्‍थानिक समुदायांसोबत सहयोगाने समुदाय-आधारित गाळ काढून टाकण्‍याचा उपक्रम ‘गाळमुक्‍त धरण गाळमुक्‍त शिवार योजना’चा फायदा घेत महाराष्‍ट्रातील ३५६ जलस्रोतांचे संवर्धन केले.

हा सहयोग अधिक दृढ करत टाटा मोटर्सचा विदर्भ व मराठवाडाच्‍या पाणीटंचाई असलेल्‍या प्रांतांसह राज्‍यातील २० हून अधिक जिल्‍ह्यांपर्यंत जल संवर्धन उपक्रम घेऊन जाण्‍याचा मनसुबा आहे. प्रस्‍तावित सहयोगाचा राज्‍यातील अमरावती, लातूर, चंद्रपूर, नागपूर, नांदेड, परभणी, अकोला, गडचिरोली, यवतमाळ, धाराशीव, छत्रपती संभाजी नगर, अहिल्‍या नगर, सांगली, सोलापूर, पुणे, पालघर, ठाणे आणि इतर जिल्‍ह्यांमधील १००० जलस्रोतांचे संवर्धन करण्‍याचा मनसुबा आहे. नाम फाऊंडेशन या उपक्रमासाठी अंमलबजावणी सहयोगी असणार आहे.

या उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्सच्‍या कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटीचे प्रमुख विनोद कुलकर्णी म्‍हणाले, ”आम्‍हाला राज्‍यातील दुष्‍काळ आणि पाणीटंचाई या समस्‍यांच्‍या परिणामांचे निराकरण करण्‍यासाठी महाराष्‍ट्र सरकार व नाम फाऊंडेशन सोबतचा आमचा सहयोग अधिक दृढ करण्‍याचा अत्‍यंत अभिमान वाटत आहे. २०२४ मध्‍ये ३५६ जलसाठ्यांच्‍या यशस्‍वीरित्‍या संवर्धनाने आम्‍हाला हा उपक्रम २० हून अधिक जिल्‍ह्यांपर्यंत विस्‍तारित करण्‍यास आणि महाराष्‍ट्रातील अधिकाधिक गावांपर्यंत पोहोच वाढवण्‍यास प्रेरित केले आहे. हा उपक्रम भूजल पातळी वाढवण्‍याचा, शुद्ध पिण्‍याचे पाणी उपलब्‍ध करून देण्‍याचा, तसेच वर्षभर सिंचनासाठी पाणी उपलब्‍ध करून देण्‍याचा प्रयत्‍न करतो, ज्‍यामुळे गावकऱ्यांच्‍या उदरनिर्वाहामध्‍ये सुधारणा होत आहे.”

या उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत प्रिया खान, विशेष कर्तव्‍य अधिकारी, मुख्‍यमंत्री कार्यालय, महाराष्‍ट्र सरकार म्हणाल्‍या, ”महाराष्‍ट्र सरकारने विद्यमान धरणे व जलस्रोतांमधील पाण्‍याची क्षमता वाढवण्‍यासाठी ‘गाळमुक्‍त धरण, गाळमुक्‍त शिवार योजना’ सुरू केली. या उपक्रमाने व्‍यक्‍तींच्‍या पुढाकाराला गती दिली आहे, ज्‍याचे श्रेय टाटा मोटर्स व नाम फाऊंडेशन यांसारख्‍या आमच्‍या सहयोगी संस्‍थांच्‍या बहुमूल्‍य पाठिंब्‍याला जाते. सहयोगाने, आम्‍ही जलस्रोतांचे संवर्धन करत आहोत, तसेच राज्‍यामध्‍ये सतत येणाऱ्या दुष्‍काळांच्‍या परिणामाला कमी करण्‍यासाठी स्थिरता व शाश्‍वततेला गती देत आहोत.”

नाम फाऊंडेशनचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात म्‍हणाले, ”नाम फाऊंडेशनने २०१५ मध्‍ये महाराष्‍ट्रातील तीव्र पाणीटंचाई समस्‍येचे निराकरण करण्‍यास सुरूवात केली. टाटा मोटर्स आणि महाराष्‍ट्र सरकारसोबतचा आमचा सहयोग या प्रयत्‍नांच्‍या दिशेने मोठे पाऊल आहे. गेल्‍या वर्षी आम्‍ही सहयोगाने आमचे कार्य दहा जिल्‍ह्यांपर्यंत विस्‍तारित केले. आम्‍हाला जल संवर्धन प्रयत्‍नांचे सकारात्‍मक परिणाम आता अधिकाधिक जिल्‍ह्यांपर्यंत पोहोचणार असल्‍याचे पाहताना आनंद होत आहे.” ‍

२०२४ मध्‍ये, टाटा मोटर्स आणि नाम फाऊंडेशनने पुणे, पालघर, ठाणे, सातारा, धुळे, सोलापूर, चंद्रपूर, अहमदनगर, बीड व लातूर या १० जिल्‍ह्यांमध्‍ये जवळपास ६० लाख घनमीटर गाळ काढत ३५६ जलस्रोतांचे यशस्‍वीरित्‍या संवर्धन केले. या सहयोगात्‍मक प्रयत्‍नाने जवळपास ७००० दशलक्ष पाणीसाठा निर्माण झाला आहे, ज्‍यामुळे ७,००० शेतकऱ्यांना फायदा होण्‍यासोबत पाण्‍याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढवण्‍यास मदत झाली आहे आणि ग्रामीण महाराष्‍ट्रात पिण्‍यायोग्‍य पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध झाले आहे.

गाळमुक्‍त धरण गाळमुक्‍त शिवार योजना शेतकऱ्यांना उत्‍खनन केलेला गाळ त्‍यांच्‍या शेतांपर्यंत परिवहन करण्‍यासाठी पूर्वमंजूर केलेला निधी देते, ज्‍यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. एण्‍ड-टू-एण्‍ड डिजिटल मॉनिटरिंग यंत्रणा प्रकल्‍पाची अंमलबजावणी करण्‍यामध्‍ये गतीशीलता व पारदर्शकतेची खात्री घेते.

महाराष्‍ट्रातील जलस्रोतांच्‍या संवर्धनाचे यश आणि प्रभावामधून ग्रामीण समुदायांचा शाश्‍वत विकास व उन्‍नतीप्रती टाटा मोटर्सची कटिबद्धता दिसून येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments