Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedसैनिक कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन

सैनिक कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन

पुणे, दि. 4 : सैनिक कल्याण विभागामार्फत माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता व वीरपिता यांना ऑनलाईन पद्धतीने आर्थिक मदतीचा लाभ घेण्याकरीता www.ksb.gov.in या संकेतस्थळावर नवीन ओळखपत्राकरिता नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सेवानिवृत्त सैनिकी अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता व वीरपिता यांनी सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, चौथा मजला, बी. विंग, विधानसमोर पुणे-1 येथे अर्जाची मूळ प्रत जमा करुन आपली माहिती अद्यावत करावी तसेच नवीन ओळखपत्रही प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल हंगे स.दै. (नि) यांनी केले आहे.
00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments