पुणे, 5 फेब्रुवारी 2025: थर्ड आय स्पोर्टस अँड इव्हेंटस एलएलपी यांच्या वतीने आयोजित थर्ड आय 13 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत सहारा क्रिकेट अकादमी, सनराईज क्रिकेट स्कूल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.
भुकुम येथील मानसाके जिमखाना क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत आदित्य तुळजापूरकर(5-24) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सहारा क्रिकेट अकादमी संघाने स्केल अप क्रिकेट अकादमी ब संघाचा 83 धावांनी पराभव करून विजयी सुरुवात केली.
दुसऱ्या लढतीत आर्यन देवडकर(61धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सनराईज क्रिकेट स्कूल संघाने विजय क्रिकेट अकादमी संघाचा 6 गडी राखून पराभव केला.
निकाल: साखळी फेरी:
सहारा क्रिकेट अकादमी: 36षटकात सर्व बाद 224धावा(अर्णव नेमाडे नाबाद 77(78,14×4,1×6), तनुष उल्हाळकर 20, हर्षल येरम 18, आदित्य भोसले 17, मिहिर आव्हाड 3-31, अद्विक शेटे 3-46, जयप्रकाश सिंग 2-40, कार्तिक लांडे 2-16) वि.वि. स्केल अप क्रिकेट अकादमी ब: 29.2षटकात सर्व बाद 141धावा(आर्यन गोरे 23, रांजय बराटे 23, आदित्य तुळजापूरकर 5-24, अर्णव नेमाडे 2-29); सामनावीर – आदित्य तुळजापूरकर; सहारा क्रिकेट अकादमी संघ 83धावांनी विजयी;
विजय क्रिकेट अकादमी: 34.1 षटकात सर्व बाद 126धावा(कार्तिकेय खरात 27, विहान ताकवले 19, उत्कर्ष भोसले 14, आर्यन एम 13, अर्जुन केसरोड 2-10, कोविद पराशर 2-12) पराभुत वि. सनराईज क्रिकेट स्कूल: 21षटकात 4बाद 127धावा(आर्यन देवडकर 61(57,10×4), प्रज्वल सणस 19, कोविद पराशर नाबाद 10, नील सोलापूरे 1-11); सामनावीर – आर्यन देवडकर; सनराईज क्रिकेट स्कूल संघ 6 गडी राखून विजयी.


