लौट्टेच्या आईस्क्रीम उत्पादन सुविधेचे पुण्यात उद्घाटन · पुण्यातील सुविधा लौट्टेच्या सर्वांत मोठ्या सुविधांपैकी एक

तारां कित Avatar

पुणे,6 फेब्रुवारी 2025 : लौट्टे ने आपल्या जागतिक विस्ताराच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठत पुण्यात आपल्या सर्वात मोठ्या सुविधांपैकी एक अत्याधुनिक उत्पादन सुविधेची घोषणा केली. याचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, लौट्टे समुहाचे अध्यक्ष डाँग बीन शीन, रिपब्लिक ऑफ कोरियाचे (आरओके) भारतातील राजदूत सियोंग हो ली यांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी सरकारी अधिकारी स्थानिक कोरियन असोसिएशन व समुदाय सदस्य, लौट्टे इंडियाचे व्यवसाय सहकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. एकूण 60,000 चौरस मीटरवर विस्तारलेली ही एकमेव अद्वितीय सुविधा ही लौट्टेची भारतीय बाजारपेठेप्रती असलेली वचनबध्दता आणि शाश्वत विकासासाठी धोरणात्मक दृष्टी दृढ करते.

50 दशलक्ष लीटर अशा प्रभावी वार्षिक उत्पादन क्षमता असलेली आणि त्यानंतर काही वर्षात 100 दशलक्ष लीटर पर्यंत वाढविण्याची क्षमता असलेली ही सुविधा आहे. पुण्यातील या प्रकल्पाची रचना विशेष करून तीव्र उन्हाळ्याच्या काळात आईस्क्रीमची तीव्र मागणी पूर्ण करण्यासाठी करण्यात आली आहे. 9 प्रॉडक्शन लाईन्स कार्यरत असणार असून ही संख्या 16 पर्यंत वाढविण्याची योजना आहे, ही सुविधा वैविध्यपूर्ण आईस्क्रीम प्रकार उत्पादन करण्यासाठी बांधली गेली आहे. येथे सेकंडरी पॅकेजिंग,उच्च कार्यक्षमता आणि उच्च उत्पादन गुणवत्तेसाठी हायस्पीड मशिन्स पूर्णपणे स्वयंचलित रोबोटिक यंत्रणेबरोबर एकीकृत करण्यात आली आहे. या अत्याधुनिक सुविधेसह हैवमोर आपल्या विकासाला पुढच्या तीन वर्षात अधिक गती देईल. 500 कोटी रूपयांच्या गुंतवणूकीसह हा ऐतिहासिक उत्पादन प्रकल्प पुढील दोन वर्षात 1000 लोकांना रोजगार देईल,ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला लक्षणीयरित्या चालना मिळेल.

याप्रसंगी बोलताना लौट्टे समुहाचे अध्यक्ष डाँग बीन शीन म्हणाले की,आमचा प्रवास नेहमीच उत्कृष्टता आणि नाविन्यपूर्णतेसाठी असलेल्या आमच्या वचनबध्दतेसह पुढे नेत आलो आहोत. लौट्टेच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असलेल्या या सुविधेचे उद्घाटन करताना आम्हाला अभिमान वाटतो. भारत आमच्यासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि आमच्या जागतिक कामकाजाचा अविभाज्य भाग आहे. 2004 मध्ये लौट्टे चोको पाय सह भारतीय कन्फेक्शनरी बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून 2017 मध्ये हैवमोर आईस्क्रीममध्ये विस्तार हा आमचा विकासाचा प्रवास देशाच्या जलद आर्थिक प्रगतीचे प्रतिबिंब आहे. हैवमोरला भारतातील सर्वात लोकप्रिय आईस्क्रीम ब्रँड बनविण्याच्या उद्देशाने आम्ही पुण्यातील सुविधेमध्ये 16 प्रॉडक्शन लाईन्स सुरू राहतील. ज्यामुळे अतुलनीय व दर्जेदार उत्पादने देशभरात पोहचविता येतील. हैवमोर आणि लौट्टे इंडिया यावर्षी विलीन होणार असल्याने अभिनवता,गुंतवणूक आणि जागतिक दर्जाच्या उत्पादनांसह भारतीय ग्राहकांना आनंददायी अनुभव देण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत.

या दृष्टीला दुजोरा देताना लौट्टे वेलफूड कंपनी लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल चँग यी म्हणाले की,येथे आमची सर्वांत मोठी आईस्क्रीम सुविधा स्थापित करून आम्ही केवळ आमच्या जागतिक कार्याचा विस्तार करत नाही तर,भारतातील हैवमोर आईस्क्रीमचा वारसा अधिक दृढ करत आहोत. हे पाऊल म्हणजे हैवमोरला भारताच्या कानाकोपऱ्यात एक विश्वासार्ह आणि लोकप्रिय ब्रँड बनविण्याच्या आमचा धोरणात्मक दृष्टीकोन अधोरेखित करते. नाविन्यपूर्ण उत्पादन श्रेणी,प्रगत वितरण पध्दती आणि गुणवत्तेप्रती वचनबध्दतेसह भारतात विस्तार करत ग्राहक समाधानाला प्राधान्य देत राहू.

हैवमोर आईस्क्रीम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कोमल आनंद म्हणाले की, लौट्टे भारताला एक धोरणात्मक बाजारपेठ म्हणून पाहत असून ही गुंतवणूक भारतातील विकासाच्या सामर्थ्यावर समुहाचा विश्वास दर्शविते. इतर आशियाई देशांच्या तुलनेत भारतात दरडोई आईस्क्रीमचा वापर कमी असल्याने वापर वाढविण्यासाठी पुरेसा वाव आहे. आमचे उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक विक्री होणारी आमची उत्पादने या सुविधेत बनवून ग्राहकांना आनंददायी अनुभव देणे आहे.

Tagged in :

तारां कित Avatar

More Articles & Posts