पुणे,6 फेब्रुवारी 2025 : रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो तर्फे पुस्तक दान उपक्रमांतर्गत पाच शाळांना 500 हून अधिक पुस्तके देण्यात आली. विज्ञान, कांदबरी, कल्पनारम्य, सामान्य ज्ञान, आत्मचरित्रे, इनसायक्लोपिडीया इत्यादी विषयातील मराठी व इंग्रजी पुस्तके देण्यात आली. ही पुस्तके 7 ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील. हा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,ता.मतेवाडी,आंबेगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,कुरूवंडी ता.आंबेगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,ता.घोडेगाव, आंबेगाव,रेणुका स्वरूप शाळा,पुणे आणि राजतोरण इंग्लिश मिडियम शाळा,ता.माळवली,वेल्हे यांचा समावेश होता.या उपक्रमामध्ये पुस्तक हस्तांतरण समारंभात रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोच्या अध्यक्ष अमिता नेने,प्रकल्प संचालक अंजली सहस्त्रबुध्दे यांसह अल्ताफ चिकोडी,सचिन नेने,सचिव राजस फडके,प्रेरणा जोशी,केदार जोशी,शोभना परांजपे आदी सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो तर्फे 5 शाळांना पुस्तके वाटप
Share with
Tagged in :