Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedअकराव्या पुना क्लब प्रीमियर क्रिकेट लीग 2025 स्पर्धेस 10 फेब्रुवारीपासून प्रारंभ

अकराव्या पुना क्लब प्रीमियर क्रिकेट लीग 2025 स्पर्धेस 10 फेब्रुवारीपासून प्रारंभ

पुणे, 7 फेब्रुवारी 2025 – पुना क्लब लिमिटेडच्या वतीने अकराव्या पुना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट 2025 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि.10 ते 15 फेब्रुवारी 2025 या कालावधीत पुना क्लब क्रिकेट मैदानावर होणार आहे.

पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना पुना क्लबचे अध्यक्ष श्री गौरव गढोक यांनी सांगितले की, स्पर्धेतील खेळाडूंची निवड लिलाव पद्धतीने करण्यात आली असून संघांचे मालक हे क्लबचे सदस्य आहेत.

पुना क्लबचे उपाध्यक्ष इंद्रनील मुजगुले यांनी सांगितले की, यंदाच्या वर्षी 10 संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. तसेच,विशेषतः 16 वर्षाखालील सर्व गटातील 25 उदयोन्मुख खेळाडूंना पुना क्लब लिमिटेडच्या वतीने वार्षिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

विविध क्रिडाप्रकारांना वेळोवेळी प्रोत्साहन देण्यासाठी पुना क्लब नेहमीच आघाडीवर असतो. या स्पर्धेला जेट सिंथेसिस व ग्रॅव्हीटास फाउंडेशन यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले आहे. एलिका यांचे सहप्रायोजकत्व लाभले आहेत. लिलावात रौनक ढोले पाटील(फोर ओक्स सेलर्स, 6300पॉईंट्स), भार्गव पाठक(मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स, 6200पॉईंट्स) हे सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत.

स्पर्धेत मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स(मनप्रीत उप्पल व गौरव गढोक),जेट्स(राकेश नवानी), व्हीके टायगर्स(विक्रम काकडे),हिलयॉस इगल्स(सलील भार्गवा),ओबेरॉय अँड निल किंग्ज(वीरेंदर सिंग ओबेरॉय व इंद्रनील मुजगुले), व्हीएनएन क्वालिटी वॉरियर्स(आरव विज, रिद्दी शेवानी, अली तलब), पृथ्वी लायन्स(अमर सेंभे), जीएम टायफून्स(पवन कटारिया व क्रिश शहा), फोर ओक्स सेलर्स(सुमीरन मेहता), परमार 360एचएमएस ऑल स्टार्स(हिरेन परमार व कपिल ढोले पाटील) हे 10 संघ सहभागी झुंजणार आहेत.

पूना क्लबच्या क्रिडा विभागाचे अध्यक्ष तुषार आसवानी म्हणाले की, स्पर्धेत प्रत्येक संघात एका सामन्यासाठी प्रत्येकी 9 खेळाडूंचा समावेश असणार आहे. स्पर्धेचे सामने हे 6 षटकांचे होणार आहेत. स्पर्धेसाठी क्रिकेट टेनिस बॉलचे सर्व नियम लागू असून सर्व सामने सायंकाळी 4.00 ते रात्री 10.00 या वेळेत होणार असून काही सामने विद्युताप्रकाश झोतात होणार आहेत. स्पर्धेतील 10 संघांची 2 गटात प्रत्येकी 5संघ अशी विभागणी करण्यात आली आहे. तसेच, या दोन्ही गटांतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार असून यातील अव्वल संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना दि. बुधवार, 15 फेब्रुवारी 2025 या दिवशी होणार आहे. विजेत्या संघाला करंडक देण्यात येणार असून याशिवाय वैयक्तिक पारितोषिकेहि दिली जाणार आहेत.

याशिवाय महिला व क्लबच्या सदस्यांच्या लहान वयोगटासाठी देखील अंतिम फेरीच्या दिवशी स्पर्धा घेण्यात येणार आहे. याबरोबरच सर्व खेळाडूंना व उपस्थितांना खेळाबरोबरच खाद्यपदार्थ, मनोरंजन याची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.

स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये गौरव गढोक(स्पर्धा अध्यक्ष), तुषार आसवानी(क्लबच्या क्रिकेट विभागाचे अध्यक्ष),, अमित रामनानी, ऋषी चैनानी व रणजित पांडे(स्पर्धा संचालक)यांचा समावेश आहे. कारा इन्टलेकट याच्या संकल्पनेतून व व्यवस्थापनेतुन ही स्पर्धा पार पडणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments