Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedउमेद फौंडेशनच्या कलाकारांची मुक्त कंठाने प्रशंसा

उमेद फौंडेशनच्या कलाकारांची मुक्त कंठाने प्रशंसा

पुणे, कलाकारांना प्रोत्साहन मिळाले की ते अधिक उमेदीने कला सादर करतात,असाच अनुभव क्रिएटिव्ह फौंडेशनच्या संदीप खर्डेकर यांनी अनुभवला.काही कार्यक्रम हे अत्यंत हृदयस्पर्शी आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलणारे असतात नाही का !!
काल उमेद फाउंडेशन ने आयोजित केलेल्या “विशेष मुलांच्या” विविध कलाविष्काराच्या कार्यक्रमाला जाण्याचा योग आला आणि नकळतच डोळे पाणावले….निरागसतेने आपल्या पद्धतीने व्यक्त होणारी ही मुलं म्हणजे खरंच “देवा घरची फुलं”….😇 ह्यांना ना सहानुभूती नकोय तर हवाय आधार – सामान्य माणसाप्रमाणे जगण्याचा अधिकार !! अश्यांच्या पंखामध्ये बळ भरण्याचे काम करणारा तरुण स्वयंसेवक “राकेश सणस”, दिव्यांग मुलांचे जगणं सुसह्य करू पाहणाऱ्या ह्या क्षेत्रात प्रदीर्घ काम करत असलेल्या प्रतिभाताई केंजळे, सीमाताई दाबके, जयंतराव पारखी,दीपक सोनावणे,लीनाताई देवरे, त्यांची टीम अश्या सर्वांना सलाम 🙏ह्या मुलांच्यात उपजतच अनेक कलागूण आहेत…. स्वार्थी, हेकेखोर,सत्ता पैसा लोलूप माणसांपेक्षा यांचे विश्व अधिक स्वच्छ !! ह्या मुलांसाठी काही करता आले तर तेच पुण्यकर्म समजावे 🕉️
सध्या महाप्रसादाचे “event” करण्याचा जमाना आहे / पोट भरलेल्यांनाच पोटभर खाऊ घातले जाते, 😜 त्यात ना भाव ना भावना….नागरिकांना वर्गणीसाठी त्रास देऊन जेवणावळ्या घालण्यापेक्षा चांगल्या सामाजिक विषयांकडे जेव्हा तरुण पिढी वळेल तो सुदिनच !!

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments