Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedआयटीआय प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात होणार उद्घाटन

आयटीआय प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात होणार उद्घाटन

मुंबई, दि. 14 : राज्य सरकारचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने सोमवार, दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध येथे प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम अर्थात ‘ट्रेन द टीचर्स’ या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून, विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.

यावेळी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, टाटा स्ट्राईव्हचे सीओओ अमेय वंजारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी आभासी (ऑनलाईन) पद्धतीने शा. औ. प्र. संस्था, संभाजीनगर, शा. औ. प्र. संस्था, अमरावती, राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, मुंबई आणि इंडो-जर्मन टुल रूम, संभाजीनगरचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य हेतू प्रशिक्षित प्रशिक्षक निर्माण करणे असून, दिनांक 17 फेब्रुवारीपासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments