गुरूग्राम । फेब्रुवारी १७, २०२५: ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल)ने आपला पूर्व-मालकीचा कार प्रोग्राम – ह्युंदाई प्रॉमिसच्या माध्यमातून कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये आतापर्यंतची सर्वोच्च वार्षिक विक्री संपादित केली आहे, जेथे वार्षिक ५.८ टक्के वाढीसह १,५७,५०३ पूर्व-मालकीच्या कार्सची विक्री केली. ग्राहक विश्वास व मूल्याला प्रबळ करत ह्युंदाई प्रॉमिसने ३५,५५३ प्रमाणित पूर्व-मालकीच्या कार विक्रीची नोंद केली, जेथे वार्षिक ८ टक्के वाढीची नोंद करत एकूण आकारमानामध्ये २३ टक्क्यांचे योगदान दिले.
ह्युंदाई प्रॉमिसने ग्राहक सहभागामध्ये नवीन मापदंड स्थापित केला आहे, जेथे कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये २०.४ टक्क्यांचे आतापर्यंतचे सर्वोच्च एक्स्चेंज आऊटरिच संपादित केले आहे. कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये ह्युंदाई प्रॉमिस प्रमाणित पूर्व-मालकीच्या कार विक्रीमध्ये ह्युंदाई आय२०, क्रेटा आणि ग्रॅण्ड आय१० या कार्सनी विक्रीमध्ये प्रभुत्व गाजवले, जेथे एकूण आकारमानांमध्ये ५५ टक्क्यांचे योगदान दिले. एसयूव्हींनी प्रमाणित पूर्व-मालकीच्या कार विक्रीमध्ये २१ टक्क्यांचे योगदान दिले, तर क्रेटा १३ टक्क्यांसह सर्वोच्च योगदान देणारी कार ठरली आणि व्हेन्यूने एकूण ह्युंदाई प्रॉमिस विक्रीमध्ये ८ टक्क्यांचे योगदान दिले.
ह्युंदाई प्रॉमिस विक्रीबाबत मत व्यक्त करत एचएमआयएलचे पूर्ण-वेळ संचालक आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. तरूण गर्ग म्हणाले, ”भारतातील पूर्व-मालकीच्या कार बाजारपेठेत पारदर्शकता, विश्वास आणि विश्वसनीयतेमधील सुधारणेसाठी मोठा वाव आहे. ह्युंदाई प्रॉमिस हे ओईएम-मालकीचे नेटवर्क ब्रँड ह्युंदाईचे आधुनिक तंत्रज्ञान आणि विश्वासाचा वापर करत प्रत्यक्ष या समस्यांचे निराकरण करते. स्थापनेपासून १ दशलक्षहून अधिक पूर्व-मालकीच्या कार विक्रीसह ह्युंदाई प्रॉमिसने वापरलेल्या कार्सच्या खरेदी-विक्री करण्याच्या अनुभवाला नव्या उंचीवर नेले आहे. जेथे हा अनुभव अधिक विश्वसनीय, पारदर्शक आणि विनासायास केला आहे. ह्युंदाई क्रेटा प्रमाणित पूर्व-मालकीच्या विभागामध्ये १३ टक्के योगदानासह सर्वात लोकप्रिय एसयूव्ही ठरली आहे, ज्यामधून नवीन कार विभागातील या कारची अद्वितीय लोकप्रियता दिसून येते. व्हेन्यू आणि क्रेटा यांसारख्या एसयूव्ही मॉडेल्सनी तिसऱ्या वर्षानंतर मूळ किमतीच्या ७० टक्क्यांहून अधिक किमतीमध्ये विक्री केली.”
ह्युंदाई प्रॉमिसच्या माध्यमातून विक्री करण्यात आलेल्या प्रमाणित पूर्व-मालकीच्या कार्सची प्लॅटफॉर्मवर नोंदणी करण्यापूर्वी प्रखर १६१-पॉइण्ट चेकलिस्टच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली आहे. अधिक विश्वसनीयता आणि नवीन कारच्या मालकीहक्क अनुभवाच्या खात्रीसाठी ह्युंदाई प्रॉमिसच्या प्रमाणित पूर्व-मालकीच्या कार्स अतिरिक्त फायद्यांसह ऑफर केल्या जातात, जसे ७ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या कार्ससाठी १ वर्षाची सर्वसमावेशक वॉरंटी आणि ७ ते १० वर्ष कालावधीदरम्यानच्या कार्सवर ६ महिने इंजिन व ट्रान्समिशन वॉरंटी. सर्व प्रमाणित पूर्व-मालकीच्या कार्स देखील रोड-साइड असिस्टण्स आणि विनामूल्य जवळपास दोन मोफत सर्विसेससोबत ऑफर केल्या जातात.
hyundai.co.in वरील ह्युंदाईचा नाविन्यपूर्ण ‘क्लिक-टू-बाय’ प्लॅटफॉर्म पूर्व-मालकीच्या कार्ससाठी विनासायास डिजिटल खरेदी-विक्री अनुभव देतो. ग्राहक ह्युंदाई डिलरशिप्समध्ये उपलब्ध असलेल्या प्रमाणित पूर्व-मालकीच्या कार्सना व्हर्च्युअली एक्स्प्लोअर करू शकतात, टेस्ट-ड्राइव्हची विनंती करू शकतात आणि त्यांच्या घरातून आरामात बुकिंग करू शकतात. विक्रेत्यांना विनासायास फिजिटल प्रक्रियेच्या माध्यमातून मूल्यांकनासाठी विनंती करण्याचा, सर्व संबंधित कागदपत्रे अपलोड करण्याचा आणि ऑफर किंमत पाहण्याचा पर्याय आहे. तसेच, डिलर्ससाठी एच-स्मार्ट अॅप विनासायास व पारदर्शक मूल्यांकन प्रक्रिया देते, तसेच विक्रेत्यांना वापरलेल्या कार्ससाठी सर्वोत्तम किंमत देखील देते.
भारतभरात ६०० हून अधिक डिलर्सच्या नेटवर्कसह ह्युंदाई प्रॉमिस पूर्व-मालकीच्या कारची खरेदी-विक्री प्रक्रिया विश्वसनीय, पारदर्शक आणि सोईस्कर करते.


