Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedरेनॉ कायगर व ट्रायबर एमवाय २५ मध्‍ये सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आणि स्‍मार्ट अपग्रेड्ससह...

रेनॉ कायगर व ट्रायबर एमवाय २५ मध्‍ये सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आणि स्‍मार्ट अपग्रेड्ससह सुधारणा

रेनॉने सेगमेंटमधील सर्वात सहजसाध्य ऑटोमॅटिक टर्बो व्‍हेरिएण्‍टसह ड्राइव्‍ह अनुभवाला अधिक उत्‍साहित केले आहे, जेथे कायगर आरएक्‍सटी(ओ) टर्बो सीव्‍हीटीची किंमत ९.९९ लाख रूपये आहे
रेनॉ कायगर व ट्रायबर श्रेणी आता व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये प्रमाणित म्‍हणून चारही पॉवर विंडोज आणि रिमोट सेंट्रल लॉकिंगसह सुसज्‍ज आहे
रेनॉ कायगर व ट्रायबर श्रेणीमध्‍ये स्‍मार्ट वैशिष्‍ट्ये आहेत, जसे ८-इंच टचस्क्रिन इन्‍फोटेन्‍मेंटसह अँड्रॉईड ऑटो व अॅप्‍पल कार प्‍ले, आरएक्‍सएलमधील रिअर व्‍ह्यू कॅमेरा आणि अपवर्ड व्‍हेरिएण्‍ट्स
ह्युमन फर्स्‍ट उपक्रमाला अधिक दृढ करत रेनॉ इंडियाने कायगर व ट्रायबर मॉडेल इअर २०२५ च्‍या सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये १७ सुरक्षितता वैशिष्‍ट्यांची भर केली आहे
पुणे,१७ फेब्रुवारी २०२५: – रेनॉ इंडिया या रेनॉ ग्रुपच्‍या पूर्णत: मालकीच्‍या उपकंपनीने कायगर व ट्रायबरचे नवीन व्‍हर्जन लाँच केले, जेथे इंटेलिजण्‍ट व विचारशील अपग्रेड्ससह त्‍यांची अपील, ड्राइव्‍ह अनुभव अणि कार्यक्षमतेमध्‍ये सुधारणा करण्‍यात आली आहे.

या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत रेनॉ इंडियाचे कंट्री सीईओ व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. वेंकटराम एम. म्‍हणाले, “रेनॉच्‍या जागतिक धोरणामध्‍ये भारताचे मोठे स्‍थान आहे आणि आम्‍ही गतीशीलतेला अधिक स्‍मार्ट, अधिक सहजसाध्य बनवण्‍यास कटिबद्ध आहोत, जी भारतातील ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करेल. नवीन रेनॉ लाइन-अपमध्‍ये सर्वोत्तम सुधारणा करण्‍यात आल्‍या आहेत, ज्‍या त्‍यांचे अपील आकर्षक करण्‍यासोबत स्‍टाइल, आरामदायीपणा व आधुनिक वैशिष्‍ट्यांचे संतुलित संयोजन देतात.”

ग्राहकांच्‍या व बाजारपेठेच्‍या अभिप्रायांच्‍या आधारावर नवीन कायगर व ट्रायबरच्‍या श्रेणीमध्‍ये प्रमाणित म्‍हणून चारही पॉवर विंडोज व रिमोट सेंट्रल लॉकिंग अशी वैशिष्‍ट्ये असतील. ग्राहकांची सोयीसुविधा व अनुभवामध्‍ये अधिक वाढ करण्‍यासाठी आरएक्‍सएलमधून आधुनिक इन-कार तंत्रज्ञान जसे ८-इंच इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टमसह अॅप्‍पल कारप्‍ले व अँड्रॉईड ऑटो आणि रिअर-व्‍ह्यू कॅमेरा यांची भर करण्‍यात आली आहे, ज्‍यामुळे कार अधिक आकर्षक व लक्षवेधक दिसतात.

रेनॉने आरएक्‍सटी(ओ)मधील कायगरमध्‍ये टर्बो पेट्रोल सीव्‍हीटी गिअरबॉक्‍ससह सुधारणा केली आहे. या कारची किंमत आता ९,९९,९९५ रूपये आहे, जी आधुनिक डिझाइन, तंत्रज्ञान व धमालपूर्ण ड्राइव्‍हचा आनंद घेऊ पाहणाऱ्या ग्राहकांना अपवादात्‍मक आणि प्रीमियम मूल्‍य देते.

सर्व रेनॉ मॉडेल्‍स आता ई-२० प्रमाणित आहेत. ह्युमन फर्स्‍ट उपक्रमाला अधिक दृढ करत रेनॉ इंडियाने कायगर व ट्रायबर मॉडेल इअर २०२५ च्‍या सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये १७ सुरक्षितता वैशिष्‍ट्यांची भर केली आहे.

रेनॉ कायगर अपगेड्स: स्‍मार्टर वैशिष्‍ट्ये, उत्तम अपील

आरएक्‍सई व्‍हेरिएण्‍ट – आता प्रमाणित म्‍हणून चारही पॉवर विंडोज आणि सेंट्रल लॉकिंगचा समावेश, जे सुधारित व्‍यावहारिकतेची खात्री देतात.
आरएक्‍सएल व्‍हेरिएण्‍ट – आता ८-इंच टचस्क्रिन इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टमसह अँड्रॉईड ऑटो व अॅप्‍पल कारप्‍ले, रिअर व्‍ह्यू कॅमेरा आणि स्‍टीअरिंग-माऊंटेड कंट्रोल्‍ससज सुसज्‍ज, जे विनासायास व कनेक्‍टेड ड्राइव्‍ह अनुभव देतात.
आरएक्‍सटी(ओ) व्‍हेरिएण्‍ट – फ्लेक्‍स व्‍हील्‍सचा समावेश, तसेच सेगमेंट-बेस्‍ट किमतीमध्‍ये सीव्‍हीटीसह टर्बो इंजिन, ज्‍यामुळे कार्यक्षमतेचा शोध घेत असलेल्‍या ग्राहकांसाठी ही कार लक्षवेधक पर्याय आहे.
आरएक्‍सझेड टर्बो व्‍हेरिएण्‍ट – भर करण्‍यात आलेले स्‍मार्ट अॅक्‍सेस कार्डसह रिमोट इंजिन स्‍टार्ट ग्राहकांच्‍या आरामदायीपणामध्‍ये अधिक वाढ करतात.
रेनॉ ट्रायबर अपग्रेड्स: सुधारित आरामदायीपणा व तंत्रज्ञान

आरएक्‍सई व्‍हेरिएण्‍ट – अधिक सोयीसुविधेसाठी प्रमाणित म्‍हणून चारही पॉवर विंडोज आणि सेंट्रल लॉकिंग.
आरएक्‍सएल व्‍हेरिएण्‍ट – ८-इंच टचस्क्रिन इन्‍फोटेन्‍मेंटसह अँड्रॉईड ऑटो व अॅप्‍पल कारप्‍ले, रिअर व्‍ह्यू कॅमेरा, रिअर पॉवर विंडोज आणि रिअर स्‍पीकर्स केबिनमधील आरामदायीपणामध्‍ये अधिक वाढ करतात.
आरएक्‍सटी व्‍हेरिएण्‍ट – आता १५-इंच फ्लेक्‍स व्‍हील्‍ससह अपग्रेड करण्‍यात आले आहे, जे स्‍टायलिश आकर्षकता व शक्तिशाली कार्यक्षमतेची खात्री देतात.
नवीन २०२५ श्रेणीची किंमत

ट्रायबर

किंमत रूपयांमध्‍ये

मॅन्‍युअल

आरएक्‍सई

६०९९९५

आरएक्‍सएल

६९९९९५

आरएक्‍सटी

७७०९९५

आरएक्‍सझेड

८२२९९५

एएमटी

आरएक्‍सझेड

८७४९९५

कायगर

किंमत रूपयांमध्‍ये

एनर्जी मॅन्‍युअल

आरएक्‍सई

६०९९९५

आरएक्‍सएल

६८४९९५

आरएक्‍सटी+

७९९९९५

आरएक्‍सझेड

८७९९९५

एनर्जी एएमटी

आरएक्‍सएल

७३४९९५

आरएक्‍सटी+

८४९९९५

टूर्बो मॅन्‍युअल

आरएक्‍सझेड

९९९९९५

टूर्बो सीव्‍हीटी

आरएक्‍सटी+

९९९९९५

आरएक्‍सझेड

१०९९९९५

२३,००० रूपयांच्‍या अतिरिक्‍त किमतीमध्‍ये निवड व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये ड्यअलटोन एक्‍स्‍टीरिअर बॉडीकलर.

कायगर व ट्रायबरसाठी उत्‍पादन वैशिष्‍ट्ये

कायगर

१एल एनर्जी एमटी आणि एएमटी

१एल टूर्बो

१एल टूर्बो सीव्‍हीटी

डिस्‍प्‍लेसमेंट

९९९ सीसी

९९९ सीसी

९९९ सीसी

सिलिंडर्सची संख्‍या

अधिकतम पॉवर आऊटपुट (पीएस @ आरपीएम)

७२ @ ६२५०

१०० @ ५०००

१०० @ ५०००

अधिकतम टॉर्क (एनएम @ आरपीएम)

९६ @ ३५००

१६०@२८००-३६००

१५२ @ २२००-४४००

ट्रान्‍समिशन प्रकार

५-स्‍पीड एमटी

५-स्‍पीड एमटी

एक्‍स-ट्रॉनिक सीव्‍हीटी

ग्राऊंड क्‍लीअरन्‍स

२०५ मिमी

२०५ मिमी

२०५ मिमी

ट्रायबरची वैशिष्‍ट्ये

१एल एनर्जी एमटी आणि एएमटी

डिस्‍प्‍लेसमेंट

९९९ सीसी

सिलिंडर्सची संख्‍या

अधिकतम पॉवर आऊटपुट (पीएस @ आरपीएम)

७२ @ ६२५०

अधिकतम टॉर्क (एनएम @ आरपीएम)

९६ @ ३५००

ट्रान्‍समिशन प्रकार

५-स्‍पीड एमटी

ग्राऊंड क्‍लीअरन्‍स

२०५ मिमी

रेनॉ इंडियाने ग्राहक-केंद्रित घोषणांसह २०२५ ची सुरूवात केलीी आहे. या वर्षाच्‍या सुरूवातीला, कंपनीने आपल्‍या सर्व नवीन ग्राहकांसाठी स्‍टॅण्‍डर्ड ३-वर्ष/१,००,००० किमी वॉरंटी, तसेच ७ वर्षे/अनलिमिटेड किमी कव्‍हरेज देणारा उद्योगातील सर्वोत्तम एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी प्रोग्राम लाँच केला. कंपनीने नुकतेच अंबात्तूर, चेन्‍नईमध्‍ये आपले प्रमुख आऊटलेट न्‍यू’आर स्‍टोअर लाँच केले. हे आऊटलेट कंपनीच्‍या नेटवर्कसाठी जागतिक आर्किटेक्‍चर संकल्‍पनेवर आधारित आहे. भारतात लाँच करण्‍यात आलेले हे जागतिक स्‍तरावरील पहिले आऊटलेट आहे, ज्‍यामधून कंपनीच्‍या जागतिक धोरणामध्‍ये देशाचे महत्त्व दिसून येते.

—————————————————————————————————————————————————————————–

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments