एचसीआयएल सिटी ई:एचईव्ही, एलीव्हेट, सिटी आणि अमेझसह संपूर्ण लाइन-अपमध्ये एडीएएस देते
एचसीआयएलने होंडा अमेझसह भारतात सर्वात किफायतशीर एडीएएस-सुसज्ज कार लाँच केली आहे
एलीव्हेट, सिटी व अमेझचे एडीएएस-सुसज्ज व्हेरिएण्ट्स त्यांच्या अनुक्रमे विक्रीमध्ये ६० टक्के, ९५ टक्के आणि ३० टक्के योगदान देतात
एचसीआयएल २०२३ मध्ये सुरूवात केल्यापासून भारतात मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिएण्ट्समध्ये एडीएएस लाँच करणारी पहिली कंपनी ठरली होती
पुणे, मार्च ४, २०२५: होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्या प्रीमियम कार उत्पादक कंपनीने भारतातील रस्त्यांवर ५०,००० एडीएएस सक्षम होंडा कार्स धावण्यासह महत्त्वपूर्ण विक्रीचा टप्पा गाठला आहे. या यशामधून होंडाचा जागतिक दृष्टिकोन ‘सर्वांसाठी सुरक्षितता’प्रती एचसीआयएलची कटिबद्धता आणि २०५० पर्यंत होंडा मोटरसायकल्स व ऑटोमोबाइल्सशी संबंधित शून्य वाहतूक अपघात संपादित करण्याचे त्यांचे ध्येय दिसून येते.
रस्त्यावर प्रवास करणाऱ्या सर्वांसाठी सुरक्षिततेमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आणि शून्य अपघात समाजाचा दृष्टिकोन राखत होंडा अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक महत्वपूर्ण प्रयत्न करत आहे.
मे २०२२ मध्ये भारतातील पहिली मेनस्ट्रीम शक्तिशाली हायब्रिड इलेक्ट्रिक वेईकल होंडा सिटी ई:एचईव्हीच्या लाँचसह होंडाचे इंटेलिजण्ट एडीएएस (अडवान्स्ड ड्रायव्हर असिस्टण्स सिस्टम) तंत्रज्ञान होंडा सेन्सिंग प्रथम लाँच करण्यात आले. सुरक्षिततेचे वाढते महत्त्व ओळखत एचसीआयएल होंडा सिटी (मार्च २०२३), होंडा एलीव्हेट (सप्टेंबर २०२३) आणि नुकतेच होंडा अमेझ (डिसेंबर २०२४) अशा आपल्या लाइन-अपमधील इतर मॉडेल्समध्ये या वैशिष्ट्याचा वापर वाढवत आहे. ऑल-न्यू थर्ड जनरेशन अमेझ भारतातील सर्वात किफायतशीर एडीएएस सक्षम कार आहे, ज्यामुळे हे प्रगत सुरक्षितता तंत्रज्ञान अधिकाधिक ग्राहकांना उपलब्ध होत आहे.
लाँच करण्यात आलेल्या एडीएएस तंत्रज्ञानाप्रती ग्राहकांचा प्रतिसाद सकारात्मक राहिला आहे, ज्यामधून प्रगत सुरक्षितता तंत्रज्ञानांप्रती ग्राहकांची वाढती पसंती दिसून येते. सध्याच्या विक्री ट्रेण्डनुसार होंडा सेन्सिंग एडीएएससह सुसज्ज व्हेएिण्ट्स एलीव्हेट, सिटी व अमेझच्या विक्रीमध्ये अनुक्रमे ६० टक्के, ९५ टक्के आणि ३० टक्के योगदान देतात. तसेच, एडीएएस-सुसज्ज मॉडेल्सचा अवलंब केलेल्या ग्राहकांपैकी प्रत्येक २ पैकी एका ग्राहकाने खरेदीसाठी त्यांचे प्रमुख कारण म्हणून प्रगत सुरक्षितता तंत्रज्ञानाची निवड केली. यामधून भारतातील कार ग्राहकांमध्ये निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सुरक्षिततेचे वाढते महत्त्व दिसून येते.
या यशाबाबत मत व्यक्त करत होंडा कार्स इंडिया लि.च्या विपणन व विक्री विभागाचे उपाध्यक्ष श्री. कुणाल बहल म्हणाले, “होंडा कार्स इंडियामध्ये आम्ही करणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये सुरक्षिततेला प्राधान्य देतो. भारतातील रस्त्यांवर ५०,००० एडीएएस-सक्षम वेईकल्सचा टप्पा गाठण्यामधून सर्वांसाठी सुरक्षितता वाढवण्याप्रती आमची अविरत कटिबद्धता दिसून येते. हे यश आमच्या जागतिक सुरक्षितता दृष्टिकोनाशी संलग्न आहे, तसेच त्यामधून भारतातील ग्राहकांमध्ये प्रगत ड्रायव्हर असिस्टण्स तंत्रज्ञानांप्रती वाढती पसंती व स्वीकृती देखील निदर्शनास येते. दररोज, आम्ही सक्रिय व निष्क्रिय सुरक्षितता वैशिष्ट्यांमध्ये सतत सुधारणा करत आमच्या वेईकल्सना अधिक सुरक्षित करण्यासाठी काम करत आहोत, ज्यामधून आम्ही सर्वांना सुरक्षित ड्रायव्हिंग अनुभव देत असल्याची खात्री मिळते.”
सुरक्षितता नाविन्यतेमध्ये अग्रस्थानी राहत एचसीआयएल २०२३ मध्ये होंडा सिटीसह मॅन्युअल ट्रान्समिशन (एमटी) व्हेरिएण्ट्समध्ये एडीएस सादर करणारी देशातील पहिली ऑटोमेकर ठरली. सध्या होंडा सिटीचे व्ही, व्हीएक्स व झेडएक्स ग्रेड्स, होंडा एलीव्हेटची झेडएक्स ग्रेड व होंडा अमेझची झेडएक्स ग्रेड या सर्वांच्या एमटी व सीव्हीटीमध्ये आणि होंडा सिटी ई:एचईव्हीमध्ये प्रमाणित ऑफरिंग म्हणून होंडा सेन्सिंग आहे.
——————————————————————————–


