Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedवाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन

वाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन

पुणे, दि. ४: पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत कार्यालयाच्या आवारात वाहन मालक किंवा चालक यांच्या जबाबदारीवर अटकावून ठेवलेली वाहने वाहन मालकांनी तडजोड शुल्क, मोटार वाहन कर, पर्यावरण कर भरुन येत्या ३० दिवसात सोडवून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन थकीत कराच्या वसुलीसाठी अटकावून ठेवलेल्यांपैकी १८९ वाहनांच्या प्रकरणांमध्ये वाहन मालक, चालक किंवा वित्तदात्यांनी कार्यालयाशी संपर्क केलेला नाही; तसेच वाहन सोडवून घेण्याबाबत हक्कही सांगितलेला नाही. या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली असून अशा वाहनांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केलेली आहे. ही वाहने बेवारस वाहने असल्याचे समजून सक्षम प्राधिकाऱ्यांच्या परवानगीने वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येईल.

वाहने सोडवून घेण्याची मुदत संपल्यानंतर त्यापैकी रस्त्यावर वापरण्यायोग्य वाहनांचा लिलाव https://eauction.gov.in या संकेतस्थळावर आणि १५ वर्षे पूर्ण झालेल्या व वापरण्यायोग्य नसलेल्या वाहनांचा लिलाव www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर करण्यात येईल. अधिक माहितीसाठी या संकेतस्थळांना तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, संत नगर, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड ०२०-२७२३२८२८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक अधिकारी राहूल जाधव यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments