उद्योगक्षेत्र, OEMs, युटिलिटीज आणि पायाभूत सुविधा यांसाठी 30% पर्यंत ऊर्जा कार्यक्षमता आणि खर्च व्यवस्थापन साध्य करणारी अत्याधुनिक ऑटोमेशन सुविधा सादर
नवी दिल्ली, 10 मार्च 2025 : भारतीय इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन उद्योगक्षेत्रातील अग्रणी Lauritz Knudsen Electrical and Automation (पूर्वीचे L&T Switchgear) यांनी आज 30% पर्यंत ऊर्जा कार्यक्षमता आणि खर्च व्यवस्थापन साध्य करणारे अत्याधुनिक स्मार्ट एनर्जी आणि ऑटोमेशन सोल्युशन्स सादर केले.
या उपाय सुविधा भारताच्या डीकार्बनायझेशनच्या उद्दिष्टांशी सुसंगत असून औद्योगिक प्रक्रिया जास्तीत जास्त सुलभ करून देशाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांच्या भविष्यातील तयारीस मदत करतात. ऑटोमेशन, ऊर्जा व्यवस्थापन आणि सॉफ्टवेअर प्रणीत बुद्धिमत्ता एकत्रित करून हे नाविन्यपूर्ण उत्पादन उद्योगक्षेत्र, OEMs, युटिलिटीज आणि पायाभूत सुविधांना ऊर्जा वापर कमी करण्यासाठी सक्षम करतात.
“औद्योगिक परिवर्तन आणि ऊर्जा लवचिकतेतून ‘विकसित भारत’ संकल्पनेच्या प्रति असलेली आमची बांधिलकी स्पष्ट होते. नॉर्डिक डिझाइन उत्कृष्टतेला भारताच्या ऊर्जा बदलासह एकत्र करून, आम्ही कामकाज कार्यक्षमता वाढविणाऱ्या, उत्पादकतेला चालना देणाऱ्या आणि भारताच्या शाश्वत भविष्यास आधार देणाऱ्या विस्तारीत उपाय सुविधा सादर करत आहोत. भविष्यात टिकणारी औद्योगिक परिसंस्था उभारत असताना तंत्रज्ञान, भागीदारी आणि संशोधन-विकास यामध्ये धोरणात्मक गुंतवणुकीद्वारे आम्ही भारताच्या जागतिक पातळीवरील स्पर्धात्मकतेस, कार्यक्षमतेस बळकट करत आहोत,” असे Lauritz Knudsen Electrical and Automation चे मुख्य कामकाज अधिकारी (COO) श्री. नरेश कुमार यांनी सांगितले.
दशकभराच्या काळातील कौशल्यासह कंपनीने 2 लाख TCD साखर कारखान्यांना वीजपुरवठा दिला आहे, 8K हून अधिक टन तांदळाच्या गिरण्यांचे स्वयंचलन केले आहे तसेच 60 लाख कापड उद्योगातील स्पिंडल्स अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केल्या आहेत. विश्वासार्हतेसाठी ओळखली जाणारी Lauritz Knudsen 20 हून अधिक महापालिका, 80 हून अधिक पेट्रोकेमिकल टर्मिनल्स आणि 25 हजारांहून अधिक हॉस्पिटल बेड्सचे व्यवस्थापन करते. याशिवाय, भारतातील प्रमुख विमानतळे, आघाडीच्या औषधनिर्माण कंपन्या आणि 2G इथेनॉल प्रकल्पांना ऊर्जा देण्यात कंपनी महत्त्वाची भूमिका बजावते.
औषधनिर्माण, रसायने, वस्त्त्रोद्योग आणि धातू यासारख्या उद्योगक्षेत्रांसाठी विश्वासू भागीदार असलेल्या Lauritz Knudsen ने भारताच्या डिजिटल परिवर्तनास गती देण्यासाठी नवीन ऑटोमेशन सोल्युशन्स सादर केली आहेत.
भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित केलेली ही संपूर्ण उत्पादन मालिका आणि उपाय सुविधा ऊर्जा आणि कामकाज कार्यक्षमतेत क्रांती घडवून आणण्यासाठी आणि भविष्यात टिकणाऱ्या व्यवसायांसाठी सज्ज आहे. स्मार्ट ऊर्जा नियंत्रण आणि प्रगत ऑटोमेशन सक्षम करून Lauritz Knudsen औद्योगिक आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात भारतात सर्वदूर उत्पादकता वाढविण्यावर आणि विकास करण्यावर भर देत आहे.
या प्रगत उत्पादनांमध्ये व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राइव्हस् (VFDs), प्रोग्रॅमेबल लॉजिक कंट्रोलर्स (PLCs), ह्युमन-मशीन इंटरफेसेस (HMIs), IoT-सक्षम एज गेटवे आणि SMARTCOMM प्रोसेस SCADA सॉफ्टवेअर यांचा समावेश आहे. ‘भारता’ च्या विशेष गरजांसाठी डिझाइन केलेले हे नाविन्यपूर्ण उपाय औद्योगिक ऑटोमेशन सुधारण्यासाठी, कार्यप्रवाह सुव्यवस्थित करण्यासाठी आणि उत्पादकतेला चालना देण्यासाठी तयार करण्यात आले आहेत.
पाणीपुरवठा, रसायने, धातू, औषधनिर्माण आणि पायाभूत सुविधा यामध्ये अचूक मोटर नियंत्रण आणि ऊर्जा कार्यक्षमता सुधारणा यासाठी Lauritz Knudsen चे VFDs काम करतात. कंपनीचे PLCs विनाअडथळा कामकाज सुनिश्चित करत उत्पादन आणि प्रक्रिया नियंत्रणासाठी प्रगत ऑटोमेशन आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग सादर करतात. HMIs रिअल-टाइम डेटा व्हिज्युअलायझेशन आणि प्रोसेस ऑप्टिमायझेशन सक्षम करून निर्णय प्रक्रियेत सुधारणा करतात. डिजिटल कनेक्टीव्हिटी मजबूत करताना व्यवसायांच्या कार्यक्षमतेत जास्तीत जास्त वाढ सुनिश्चित करत IoT-Edge Gateways प्रेडिक्टिव मेंटेनन्स आणि ऑपरेशनल इनसाइट्स साठी मदत करतात.
जोडीला SMARTCOMM Process SCADA Software ऑन-प्रिमाइस आणि क्लाऊड-बेस्ड अॅप्लिकेशन्सचे एकत्रीकरण करते, औद्योगिक प्रक्रियांसाठी मजबूत नियंत्रण आणि मॉनिटरिंग सोल्युशन्स सादर करते. एकत्रितपणे या सर्व नाविन्यपूर्ण कल्पना Lauritz Knudsen ला भारताच्या ऑटोमेशन आणि ऊर्जा परिवर्तनाच्या अग्रस्थानी स्थान देतात.
संशोधन आणि विकास यात विस्तार करून तसेच तामिळनाडू, महाराष्ट्र आणि गुजरात मधील अत्याधुनिक उत्पादन सुविधा विस्तारून Lauritz Knudsen भारताच्या औद्योगिक आणि ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक सुरूच ठेवत आहे. विस्तृत उत्पादन क्षमतेसह आणि 500 हून अधिक शहरांमध्ये 33 हून अधिक कार्यालये असलेल्या Lauritz Knudsen ने मेक इन इंडिया आणि विकसीत भारत 2047 उपक्रमांच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे.
Lauritz Knudsen Electrical and Automation ही भारतातील Schneider Electric समूहाचा भाग आहे.


