मुंबई, १० मार्च २०२५: देशातील फार्मा क्षेत्रात अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखल्या जाणा-या एमक्युअर फार्माक्युटिकल्स लिमिटेड कंपनीने आर्थ रेंज औषधांची निर्मिती केली आहे. आता माणसांना दैनंदिन जीवनात आवश्यक असणा-या सप्लिमेंटच्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी आर्थ रेंज ब्रॅण्ड सुरु करण्यात आला आङे. माणसाच्या आरोग्याच्या हितासाठी एमक्युअरने आर्थ रेंजमध्ये ब्राह्मी या प्राचीन भारतीय औषधी वनस्पतींचा वापर केला आहे. ब्राह्मी या औषधी वनस्पतीचा वापर करताना आधुनिक विज्ञानाची जोड देत नव्या सप्लिमेंटची निर्मिती करण्यात आली आहे. या नव्या सप्लिमेंटमुळे दुर्लक्षित आजारांवरही मात करता येईल, असा विश्वास कंपनीच्यावतीने व्यक्त करण्यात आला.
एमक्युअरने नेहमीच महिलांच्या आरोग्यावर जनजागृतीबाबत प्राधान्य दिले आहे. एमक्युअर कंपनीने आर्थ रेंजच्या औषधांची खात्री देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांची ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड केली आहे. महिलांच्या आरोग्याविषयक अनेक विषयक समाजात उघडपणे बोलले जात नाहीत. विद्या बालन या महिलांच्या आरोग्यविषयक आवश्यक सर्व बाबी लोकांसमोर मांडतील. विशेषकरुन त्या शरीराच्या खासगी भागांत होणा-या अनेक समस्यांबाबत उघडपणे बोलणे टाळतात. अभिनेत्री विद्या बालन महिलांनी आरोग्यविषयक घ्यायवयाच्या काळजीबद्दलही माहिती देतील. निद्रानाशासारख्या समस्येवरही त्या मार्गदर्शन करतील. विद्या बालन यांना देशातील प्रत्येक घरकुलातील आवडत्या अभिनेत्री असल्याने त्यांच्याकडून महिलांविषयकक सर्व समस्यांना मार्गदर्शन करता येईल, असा विश्वास कंपनीच्यावतीने व्यक्त करण्यात आला.
एमक्युअरसोबतच्या भागीदारीचा भाग म्हणून विद्या बालन आर्थ रेंजमधील तीन महत्त्वाच्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित करतील. इंटिमेट केअर, स्लीप सपोर्ट गम्मीज, ब्रेन फॉर एड या तीन उत्पादनांबाबत त्या महिलांना तपशीलवार माहिती देतील. महिलांच्या खासगी भागांतील खाज, कोरडेपणा कमी करण्यासाठी इंटिमेट केअर या उत्पादनाची निर्मिती करण्यात आली आहे. महिलांना शांत झोप मिळावी, म्हणून स्लीप सपोर्ट गम्मीज आणि महिलांच्या एकाग्रतेत सुधारणा आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ब्रेन फॉग एड या दर्जेदार उत्पादने आता बाजारात उपलब्ध होत आहेत. या तिन्ही उत्पादनांच्या वापराबाबत विद्या बालन यांच्याकडून माहिती दिली जाईल.
या भागीदारीबद्दल बोलताना बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन यांनी आपले मत मांडले. त्या म्हणाल्या, ‘‘ महिलांच्या आरोग्य सुधारावे याकरिता दर्जेदार उत्पादनांची निर्मिती करणा-या एमक्युअरच्या आर्थ रेंजशी मी जोडले गेले आहे. मला ही भागीदारी केल्याचा निश्चितच आनंद आहे. एमक्युअरने महिलांच्या वृदधीसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. महिला या प्रत्येक घराच्या मुख्य कणा असतात. घरातील प्रत्येकाची काळजी घेणा-या महिलांचे आरोग्य नेहमीच दुर्लक्षिले जाते. एमक्युअरने महिलांच्या आरोग्यासाठी आवश्यक गरजा लक्षात घेतल्या. महिलांचे आरोग्य सक्षम बनवण्याची तत्परता दर्शवली. या वचनबद्धतेसाठी मी त्यांचा आदर करते. आरोग्य अबाधित राहिले तरच महिलांचे सशक्तीकरण होईल. या भागीदारीच्या निमित्ताने मी आशा बाळगते की, महिलांना आरोग्यविषयक सर्व माहिती उपलब्ध करत स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याकरिता प्रोत्साहित करेन.’’
एमक्युअर फार्माक्युटिकल्स लिमिटेडच्या पूर्णवेळ संचालिका नमिता थापर यांनीही या भागीदारीबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘‘ आम्ही अभिनेत्री विद्या बालनशी भागीदारी करण्यास उत्सुक आहोत. तिचा धाडसी आणि प्रामाणिक स्वभाव कंपनीच्या ब्रँण्डच्या तत्त्वाशी जुळतो. विद्या बालन यांनी महिला आरोग्याच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. आम्ही तिच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत. महिलांच्या आरोग्याविषयीचे निवडक विषय टॅबू म्हणून पाहिले जातात त्या विषयांवर चर्चा करण्यासाठी विद्या बालन यांची मदत होईल. ’’
रजोनिवृत्ती काळातील महिलांनाही आवश्यक गोळ्यां (सप्लिमेंट्स) ध्यानात घेत आर्थ रेंज आता वेगवेगळ्या उत्पादनांची निर्मिती करत आहेत. कंपनी महिलांच्या आरोग्याविषयक विश्वासार्ह साथीदार म्हणून आर्थ रेंजबद्दल अनेक महत्त्वकांक्षा बाळगून आहे. एमक्युअर फार्माक्युटिकल कंपनी महिलांच्या आरोग्याविषयक सर्व समस्यांच्या निराकरणासाठी उच्च दर्ज्याचे उत्पादनांची निर्मिती करत आहे. या उत्पादनातून सर्व स्तरांतील महिलांचे आरोग्य अबाधित राहील, असा विश्वास कंपनीकडून व्यक्त करण्यात आला.
आर्थ रेंजबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.arthbyemcure.com या संकेतस्थळाला भेट


