मुंबई, 10 मार्च 2025: वॅसकॉन इंजिनीयर्स लिमिटेड (VASCONEQ) हीEPC आणि रिअल्टी क्षेत्रातील एक प्रतिष्ठित कंपनी असून, कंपनीआपल्या चार दशकांच्या ठसठशीत वारशासह मुंबई बाजारात पदार्पणकरत आहे. कंपनीने सांताक्रुझ पश्चिमेतील लिंकिंग रोडवर पुनर्विकासउपक्रमांतर्गत ‘वॅसकॉन ऑर्किड्स’ हा आलिशान निवासी प्रकल्प सादरकेला आहे. वॅसकॉनने आपल्या 39 वर्षांच्या प्रवासात 30 पेक्षा अधिकशहरांमध्ये 225 हून अधिक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले असून, एकूण45+ दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळाचे रिअल इस्टेट प्रकल्प विकसित केलेआहेत.
या प्रकल्पाचे एकूण विकास मूल्य (GDV) सुमारे ₹300 कोटी आहे. सांताक्रुझ पश्चिमेतील गजबजलेल्या लिंकिंग रोडच्या मध्यवर्ती ठिकाणीहा प्रकल्प स्थित असून, वॅसकॉनच्या मुंबईतील विस्तार आणिविविधीकरणाच्या धोरणाशी पूर्णतः सुसंगत आहे.
या घोषणेबाबत वॅसकॉन इंजिनीयर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालकश्री. सिद्धार्थ वासुदेवन मूर्ती म्हणाले, “मुंबईतील पुनर्विकास क्षेत्र हे अपारसंधी प्रदान करणारे आहे, कारण जुन्या पायाभूत सुविधांचेआधुनिकीकरण आणि जुन्या घरांचे पुनरुज्जीवन करणे ही काळाची गरजआहे. सुमारे ₹30,000 कोटींच्या बाजारमूल्यासह, पुनर्विकास क्षेत्रातपरिवर्तन घडविण्याची मोठी क्षमता आहे. प्रीमियम आणि उच्च-गुणवत्तेचीशहरी जीवनशैली प्रदान करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाशी मुंबई पूर्णतःसुसंगत आहे. EPC आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील आमच्या सखोलअनुभवासह, ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन आणि उत्कृष्टतेवरील निष्ठा यामुळेआम्ही लक्झरी हाउसिंगच्या संकल्पनांना नव्या उंचीवर नेण्यास सज्जआहोत. ‘वॅसकॉन ऑर्किड्स’ हा केवळ मुंबईतील आमच्या भक्कमप्रवेशाचा पुरावा ठरणार नाही, तर या शहराच्या सदैव विकसित होणाऱ्यास्कायलाइनमध्येही महत्त्वपूर्ण योगदान देईल.”
वॅसकॉनने लिंकिंग रोडची निवड केवळ त्याच्या प्रतिष्ठेसाठीच नाही, तरत्यातील अजून न उलगडलेल्या संधींसाठीही केली आहे. मुंबईतील एकप्रमुख हाय स्ट्रीट असलेल्या सांताक्रुझ पश्चिममध्ये अद्यापही त्याच्यालौकिकाला साजेशी खऱ्या अर्थाने आलिशान निवाससुविधा नव्हती. ‘वॅसकॉन ऑर्किड्स’ ही उणीव भरून काढत, असामान्य जीवनशैलीशोधणाऱ्या ग्राहकांसाठी एक अप्रतिम अनुभव साकारतो. या परिसराततुलनेने मोठे भूखंड मिळणे दुर्मीळ आहे. मात्र, वॅसकॉनने अशा विशिष्टजागेचा विकास करून लक्झरी लिव्हिंगसाठी एक नवा मापदंड निर्माणकेला आहे. हा प्रकल्प केवळ एक निवासी संधी नसेल, तर लिंकिंगरोडवरील उच्च-प्रतीच्या जीवनशैलीला नवे परिमाण देणारा एकऐतिहासिक टप्पा ठरेल.
सांताक्रुझ पश्चिमेतील शास्त्रीनगरच्या प्रमुख ठिकाणी वसलेला आणि‘हाय-स्ट्रीट लिव्हिंग’ या संकल्पनेवर आधारित, ‘वॅसकॉन ऑर्किड्स’ प्रकल्प तीन विंग्समध्ये विभागलेला आहे, ज्यामध्ये 2 आणि 3 BHK निवास असतील, एकूण 62 युनिट्स विक्रीसाठी उपलब्ध असतील. हाप्रकल्प मुंबईतील सर्वाधिक मागणी असलेल्या परिसरांपैकी लक्झरी, आराम आणि सुविधा यांचे परिपूर्ण मिश्रण प्रदान करतो. रहिवाशांसाठीखास डिझाइन केलेल्या रूफटॉप आणि ग्राउंड-लेव्हल सुविधा उपलब्धअसतील, ज्यामध्ये बोच्चे बॉल, कॉर्नहोल, अत्याधुनिक जिम आणि अनेकअन्य सुविधा समाविष्ट आहेत, जेणेकरून त्यांच्या सर्व गरजा सहज पूर्णहोतील.
अत्याधुनिक कनेक्टिव्हिटी सुविधांची हमी देणारा हा प्रकल्प SV रोडवरील लवकरच सुरू होणाऱ्या मेट्रो स्थानकाच्या आणि कोस्टल रोडकनेक्टरच्या अगदी जवळ स्थित आहे, जो केवळ 500 मीटरच्या अंतरावरअसेल. यामुळे मुंबईतील महत्त्वाच्या व्यावसायिक केंद्रे आणि जीवनशैलीगंतव्यस्थाने अधिक सहज व वेगवानपणे जोडली जातील, तसेचरहिवाशांसाठी अप्रतिम सुविधा उपलब्ध होतील.
सांताक्रुझ पश्चिम हा मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रतिष्ठित आणिगतिशील परिसर असून, आंतरराष्ट्रीय विमानतळ व महत्त्वाचे व्यावसायिककेंद्र जवळ असल्याने हा भाग एक प्रमुख विकास केंद्र बनला आहे. उत्कृष्टवाहतूक सुविधा हे या परिसराचे वैशिष्ट्य असून, SV रोड, पश्चिम रेल्वेमार्ग, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि बांद्रा-वरळी सी लिंकद्वारे मुंबईतीलप्रत्येक भागाशी सुलभ कनेक्टिव्हिटी मिळते. याशिवाय, भारतातीलसर्वोत्तम शैक्षणिक संस्थांचे अस्तित्व, समृद्ध शॉपिंग सेंटर्स आणि विविधप्रकारच्या डायनिंग व मनोरंजनाच्या पर्यायांमुळे सांताक्रुझ पश्चिम हेमुंबईतील सर्वाधिक मागणी असलेले निवासी स्थानांपैकी एक ठरले आहे.


