Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedबीएनसीए तर्फे टॉर्क 2025 आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न

बीएनसीए तर्फे टॉर्क 2025 आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न

पुणे,11 मार्च 2025 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ.भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमेन (बीएनसीए) तर्फे टॉर्क 2025 अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये आर्किटेक्चर आणि डिझाईन महाविद्यालयांचे पुण्यातील 9 संघ सहभागी झाले होते. ही स्पर्धा 7,8 व 9 मार्च दरम्यान महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आवारातील मैदानात आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेचे उद्घाटन बीएनसीएचे उपप्राचार्य डॉ.शार्वेय धोंगडे यांनी केले.मुलांच्या गटात डीवाय पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,आकुर्डी संघाला विजेतेपद आणि उपविजेतेपद एस.बी.पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,पिंपरी-चिंचवड आणि मुलींच्या गटात महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या स्कुल ऑफ फॅशन टेक्नोलॉजी या संस्थेच्या संघाने विजेतेपद पटकावले तर, उपविजेतेपद महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ.भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमेन (बीएनसीए) यांनी पटकावले. अंतिम सामन्यात मुलांच्या गटात डीवाय पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,आकुर्डी संघाने एस.बी.पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,पिंपरी-चिंचवड संघाचा 25-15 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात अंतिम सामन्यात महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या स्कुल ऑफ फॅशन टेक्नोलॉजी संघाने, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ.भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमेन (बीएनसीए) संघाचा 25-22 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. उत्कृष्ट पुरूष खेळाडू म्हणून डीवाय पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,आकुर्डीचा मोहित कुंभारे आणि उत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून स्कुल ऑफ फॅशन टेक्नोलॉजीच्या दाक्षायनी शिंदे यांना देण्यात आला.

विजेत्या संघाला चषक,प्रमाणपत्र व पदके व 10,000 रूपये रोख रक्कम प्रदान करण्यात आली. उपविजेत्या संघाला चषक,प्रमाणपत्र,पदके व रूपये 7000 रोख रक्कम प्रदान करण्यात आली.उत्कृष्ट पुरूष व महिला खेळाडूंना पदक व प्रमाणपत्र देण्यात आली.

विजेत्यांचे अभिनंदन बीएनसीएचे प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप आणि उपप्राचार्य डॉ.शार्वेय धोंगडे यांनी केले. या स्पर्धेच्या आयोजन समितीमध्ये प्रा.उमेश चव्हाण,प्रा.संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रिया देशमुख,सानिका साटम आणि सुदिक्षा अनंतरामण यांचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments