Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedइव्हॉल्व्हएडी: निस्सानच्या सहयोगाने केलेल्या संशोधन प्रकल्पामुळे इंग्लंड ऑटोनॉमस ड्रायव्हिंगसाठी सज्ज

इव्हॉल्व्हएडी: निस्सानच्या सहयोगाने केलेल्या संशोधन प्रकल्पामुळे इंग्लंड ऑटोनॉमस ड्रायव्हिंगसाठी सज्ज

• इंग्लंड सरकारच्या निधीतून उभारलेल्या या समूह प्रकल्पासून ऑटोनॉमस ड्रायव्हिंगची क्षमता वाढेल आणि पुरवठा साखळीच्या सज्जतेला तांत्रिक आधार मिळेल.

• १०० % इलेक्ट्रिक निस्सान लीफ अद्ययावत एडी तंत्रज्ञानाने सुसज्ज असून ती गुंतागुंतीच्या नागरी निवासी आणि ग्रामीण रस्त्यांवर तपासण्यात आली आहे.

• यशस्वी निस्सान संशोधन प्रकल्प, ह्यूमनड्राइव्ह आणि सर्व्हसिटीवर इव्हॉल्व्हएडी उभारले गेले असून यूकेमधील एडी तंत्रज्ञानाच्या सर्वाधिक कठोर चाचणीसाठी सज्ज आहे.

• तीन प्रकल्पांमध्ये मागील ८ वर्षांत ० अपघातांसह १६००० पेक्षा ऑटोनॉमस मैल गाड्या चालवल्या गेल्या आहेत.

क्रेनफील्ड, इंग्लंड- उद्योगातील पाच भागीदारांच्या सहयोगाने इंग्लंडमधील अद्ययावत ऑटोनॉमस ड्रायव्हिंग (एडी) संशोधन प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. हा देशातला आतापर्यंतचा सर्वांत कठोर तपासणी झालेला प्रकल्प आहे.
इव्हॉल्व्हएडी इंग्लंडमधील आधीच्या ह्युमनड्राइव्ह आणि सर्वसिटी या निस्सानपुरस्कृत प्रकल्पांवर उभा राहिला आहे. त्यातून कंपनीच्या सुरक्षित, अधिक स्वच्छ आणि अधिक सर्वसमावेशक जगाच्या जागतिक दूरदर्शितेनुसार ऑटोनॉमस मोबिलिटी सत्याच्या आणखी जवळ आली आहे.
मागच्या आठ वर्षांच्या कालावधीत देशाच्या महामार्गांवर, नागरी केंद्रांमध्ये, निवासी रस्ते व गावांमध्ये शून्य अपघातांसह १६००० पेक्षा अधिक ऑटोनॉमस मैलांवर गाड्या चालवल्या गेल्या आहेत.
निस्सानचे (आफ्रिका, मध्यपूर्व, भारत, युरोप आणि ओशियनिया) मधील प्रादेशिक संशोधन व विकास विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डेव्हिड मॉस म्हणाले की, “एडी तंत्रज्ञान अत्यंत आव्हानात्मक वाहनचालन वातावरणांमध्ये कशा रितीने काम करते याबाबत आमचे ज्ञान समज वाढवण्यात हे तिन्ही संशोधन प्रकल्प अत्यंत यशस्वी ठरले आहेत.
“एडी मोबिलिटीचा प्रसार करण्यासाठी आमच्या भागीदारांसोबत काम करणे ही आनंदाची गोष्ट होती. मानवी चुका कमी करून गाडी चालवणे सुरक्षित करण्याबरोबरच कार्यक्षमता वाढवून अधिक स्वच्छ वातावरण निर्मिती करतानाच हे तंत्रज्ञान आज स्थान, वय किंवा अपंगत्व यांच्यामुळे मोबिलिटी मिळू न शकणाऱ्या अनेक लोकांना गाडी चालवण्याचा आनंद देऊ शकते.
“आमची क्रेनफील्डमधील निस्सान टेक्निकल सेंटर युरोपमधली बुद्धिमान यूके टीम हे तंत्रज्ञान विकासे काम सुरू राहणार असून आगामी वर्षांमध्ये हे एडी मोबिलिटी तंत्रज्ञान ग्राहकांपर्यंत येईल.”
इव्हॉल्व्हएडीचा समारोप यशस्वीरित्या झाल्यामुळे एडीच्या वापराचा पुढील टप्पा सुरू होणार आहे. त्यात इंग्लंडमधील शहरे आणि प्रदेशांमध्ये एडी यंत्रणा व सेवांच्या भविष्यातील वापरासाठी सज्जता तपासली जाईल.

निस्सान तांत्रिक प्रमुख असलेल्या पाच भागीदारांच्या सहयोगाने पूर्ण करण्यात आलेल्या इव्हॉल्व्हला सरकार तसे समूहातील भागीदारांनी संयुक्तरित्या वित्तपुरवठा केला. सरकारचा £१०० दशलक्ष इंटेलिजेंट मोबिलिटी फंड सेंटर फॉर कनेक्टेड अँड ऑटोनॉमस व्हेइकल्स (सीसीएव्ही)कडून प्रशासित केला जातो तर तो यूकेची नावीन्यपूर्णता आस्थापना, इनोव्हेट यूकेकडून वितरित केला जातो.
मागील २१ महिन्यांमध्ये निस्सान, कनेक्टेड प्लेसेस कॅटापुल्ट, ह्युमनायझिंग ऑटोनॉमी, एसबीडी ऑटोमोटिव्ह आणि टीआरएल या पाच भागीदारांनी एकत्रितरित्या काम करून यूके पुरवठा साखळीला यूकेमध्ये एडी तंत्रज्ञानाचा व्यापक प्रसार करण्यासाठी सज्ज करण्यासाठी मदत केली.
निस्सान जगभरात ‘ऑटोनॉमस मोबिलिटी सर्व्हिस’ संशोधन करत असून त्यात जपान (निस्सान रिसर्च सेंटर), यूके (निस्सान टेक्निकल सेंटर युरोप) आणि अमेरिका (निस्सान अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी सेंटर, सिलिकॉन व्हॅली) यांचा समावेश आहे. यात योकोहोमा, जपानमधील अद्यायव ‘इझी राइड’ सेरेना एडी वाहनाचा समावेश आहे. इथे कंपनी ऑटोनॉमस मोबिलिटी सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
इव्हॉल्व्हइडीमधून निस्सानच्या ऑटोनॉमस मोबिलिटीच्या जागतिक विकासाच्या प्रयत्नात योगदान दिले जात असून जगभरातील विविध वाहनचालनाच्या परिस्थितींमध्ये तंत्रज्ञानाचा वापर सुरक्षा देण्यासाठी कशा प्रकारे करता येईल यासाठी माहिती व ज्ञान दिले जात आहे.
इव्हॉल्व्हएडीदरम्यान कनेक्टेड आणि ऑटोनॉमस व्हेइकल्सची (सीएव्ही) तपासणी विविध सिम्युलेटर्सवर तसेच खासगी चाचणी ट्रॅक्सवर करण्यात आली आणि त्यानंतर शहरी निवासी आणि ग्रामीण रस्त्यांवर आणून इंग्लंडमधील एडी तंत्रज्ञानाची सर्वाधिक कठोर चाचणी करण्यात आली.
रस्त्यांचे हे प्रकार एडीं तंत्रज्ञानासाठी मोठे आव्हान निर्माण करतात. त्यात शहरांमधील निवासी परिसरातल्या निमुळत्या, सिंगल लेन रस्त्यांवर कमी वेगाने गाडी चालवणे अशा गोष्टी समाविष्ट आहेत. जास्त वेगवान मार्गांसाठी ग्रामीण भागांमध्ये चिन्हांकन नसलेले रस्ते होते. निस्सानने एडी वाहनासाठी चॅसिस नियंत्रण यंत्रणा आणली आहे. त्यामुळे ब्रेक्स आणि स्टीअरिंग्सना कसबी वाहनचालकाप्रमाणे काम करता येते.
निवासी रस्त्यांवर सीसीटीव्हीसारख्या सुविधांचा वापर केल्यामुळे इव्हॉल्व्हएडी सीएव्हींना परिस्थितीबाबत जागरूकता सुधारण्याची माहिती मिळाली आणि त्यातून व्हेइकल टू इन्फ्रास्ट्रक्र (व्ही२आय)चा वापर सीएव्हीची कामगिरी सुधारण्यासाठी व नवीन व्ही२आय तंत्रज्ञानाच्या विकासासाठी कसा करता येईल यासाठी विशेष अभ्यास तयार केला गेला.
इव्हॉल्व्हएडीचे प्रकल्प व्यवस्थापक निस्सान टेक्निकल सेंटर युरोप (एनटीसीई) मधील निस्सानच्या संशोधन आणि अद्ययावत इंजिनिअरिंग टीमचे व्यवस्थापक रॉबर्ट बाटेमन म्हणाले की: “इव्हॉल्व्हएडी आणि आधीचे प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आम्ही आता एडी यंत्रणा आणण्यासाठी इंग्लंडच्या तयारीचा अभ्यास करत आहोत.
“भागीदारांसोबत काम करताना आम्हाला देशभरातील पायाभूत सुविधा व नियामकांच्या गरजांचा ३६० अंशांत संपूर्ण अभ्यास करणे तसे धोरणकर्ते व नागरी नियोजकांना महत्त्वाची माहिती देणे गरजेचे आहे जेणेकरून एडी मोबिलिटी सेवा योग्य पद्धतीने व योग्य वेळी यशस्वीरित्या अंमलात आणता येतील.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments