Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedबिस्कीट पहिल्यांदाच झाले 'बुल्स-आय' - दोन वेळा सुवर्णपदक जिंकलेल्या अवनी लेखरा ला...

बिस्कीट पहिल्यांदाच झाले ‘बुल्स-आय’ – दोन वेळा सुवर्णपदक जिंकलेल्या अवनी लेखरा ला ब्रिटानिया मारी गोल्डतर्फे मानवंदना पॅरिस गेम्समधील शूटिंग टारगेटच्या आकारात तयार केलेल्या ब्रिटानिया मारी गोल्डच्या स्पेशल एडिशन पॅकची गोष्ट

भारताची जिद्द आणि सातत्यपूर्ण कामगिरीचे प्रतीक असलेल्या ब्रिटानिया मारी गोल्ड या ब्रँडने खेळातील उत्कृष्टता आणि माणसाच्या विजिगिषू वृत्तीला अभूतपूर्व मानवंदना दिली आहे. अवनी लेखरा स्पेशल एडिशन सादर करत, पॅरिस गेम्स 2024 आणि टोकियो गेम्स 2020 मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला खेळाडूचा गौरव करण्यात आला आहे. आपल्या इतिहासात पहिल्यांदाच, या ब्रँडने आपल्या बिस्किटांची रचना आणि पॅकेजिंग बदलले असून, ‘डू मोअर, बी मोअर’ हा दीर्घकाळापासून असलेला संदेश नव्याने अधोरेखित केला आहे.

ब्रिटानिया मारी गोल्डच्या बिस्किटाच्या पुड्यातील प्रत्येक बिस्कीटाचे अत्यंत काटेकोरपणे रिइंजिनीअरिंग केले आहे. पॅरिस 2024 क्रीडास्पर्धेत अवनीने केलेल्या कामगिरीमध्ये ज्या प्रकारचे लक्ष्य साध्य केले होते, त्याचे प्रतिबिंब या बिस्किटांमध्ये साकारण्यात आले आहे. याला आणखी खास बनवत, अवनी लेखरा ने नेमबाजीत ऐतिहासिक विजय मिळविताना तिने मारलेल्या अचूक शॉट्सच्या ठिकाणी पॅकमधील प्रत्येक बिस्किटावर नक्षी कोरली आहे. हा बदल म्हणजे केवळ एक मानवंदना नसून, या निमित्ताने, 10 मीटर अंतरावरून आकाराने इतक्या बारीक लक्ष्यावर निशाणा साधण्यासाठी आवश्यक असलेल्या अद्भुत कौशल्याची जाणीव होते. अवनी लेखरा स्पेशल एडिशन ही ब्रिटानिया मारी गोल्डच्या महिलांच्या सशक्तीकरणासाठीच्या दशकभराच्या योगदानाचे प्रतीक आहे. हा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचा ठरत असून, प्रथमच अशा यशस्वी खेळाडूचा फोटो बिस्किट पॅकच्या मुखपृष्ठावर झळकत आहे. यामध्ये अवनीच्या प्रभावी चित्राला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.

लाँचची फिल्म येथे पाहा : https://youtu.be/Nkh3cs8QxoY

पॅरिस गेम्स 2024 आणि टोकियो गेम्स 2020 मध्ये दोन वेळा सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू अवनी म्हणाली, “शूटिंगमध्ये परिपूर्णतेचे मोजमाप मिलिमीटर्समध्ये केले जाते. हे बिस्कीट हातात धरल्यावर, सर्वोच्च स्तरावर जिंकण्यासाठी किती प्रचंड एकाग्रता आणि अचूकता लागते, हे लोकांना समजेल, अशी आशा आहे. या प्रवासाचा सन्मान करण्यासाठी आणि तरुण मुलींना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देण्यासाठी ब्रिटानिया मारी गोल्ड पुढाकार घेत आहे, याचा मला अभिमान वाटतो.”

ब्रिटानियाच्या मार्केटिंग विभागाचे जनरल मॅनेजर सिद्धार्थ गुप्ता म्हणाले, “ब्रिटानिया मारी गोल्ड नेहमीच महिलांच्या सशक्तीकरणासाठी उभे राहिले आहे. त्यांच्या जिद्दीला आणि मोठ्या स्वप्नांना साथ दिली आहे. योग्य संधी मिळाल्यास भारतीय महिला कोणतीही मोठी कामगिरी करू शकतात, हेच अवनीच्या यशातून दिसून येते. ही स्पेशल एडिशन तिच्या यशाला आणि इतिहास घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक महिलेला समर्पित आहे.”

टॅलेंटेडमधील क्रिएटिव्ह्ज विभागातील जवाद अहमद आणि टेरेसा सेबॅस्टियन म्हणाले, “ब्रिटानिया मारी गोल्डच्या आकारात बदल करून आम्ही भारताला अवनीच्या यशाची जाणीव करून देण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे. (or you can use – अवनीच्या यशाचे कौतुक करण्याचा एक सशक्त मार्ग दिला आहे). या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ एका आघाडीच्या खेळाडूचा सन्मानच करण्यात आला नसून, त्याबरोबर सर्वसमावेशक स्त्रीसबलीकरणालाही चालना देण्यात आली आहे आणि दुर्लक्षित असलेल्या एअर रायफल शूटिंग या खेळालाही प्रकाशझोतात आणले आहे.”

लिटल बटण फिल्म्सच्या डायरेक्टर तन्वी गांधी म्हणाल्या, “अवनीने विक्रम मोडेल आहेतच, त्याचप्रमाणे तिने पूर्वग्रहसुद्धा बदलले आहेत. ही फिल्म व कॅम्पनेच्या माध्यमातून चटकन डोळ्यांना न दिसणाऱ्या या बदलावर प्रकाश

टाकणे, हे आमचे उद्दिष्ट होते. एअर रायफल शूटिंगच्या या शांत, पण तितक्याच प्रभावी ऊर्जेला न्याय देणारी आणि अवनी लेखरा या सुपरस्टार/सुपरगर्लची दखल घेणारी फिल्म केल्याचा आम्हाला अभिमान आहे.

ब्रिटानिया मारी गोल्ड अवनी लेखरा स्पेशल एडिशन पॅक मुंबई, बंगळुरू व हैदराबाद येथे स्विगी इन्स्टामार्टवर 7 मार्चपासून उपलब्ध असेल आणि 10 मिनिटांत डिलिव्हरी करण्यात येईल आणि हा इतिहास लाखो लोकांच्या थेट हातात पोहोचेल.

लाँचची फिल्म येथे पाहा : https://youtu.be/Nkh3cs8QxoY

==============================

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments