Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिरोगी जीवनशैली हीच मुत्रपिंडाच्या आरोग्याची गुरूकिल्ली : डॉ.रोकडे

निरोगी जीवनशैली हीच मुत्रपिंडाच्या आरोग्याची गुरूकिल्ली : डॉ.रोकडे

पुणे,12 मार्च 2025 : भारतामध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना, चांगल्या जीवनशैलीचा अवलंब करणे अत्यंत महत्त्वाचे आहे,असे मत विश्वराज हॉस्पिटलचे कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट डॉ.महेश डॉ.रोकडे यांनी व्यक्त केले.

दरवर्षी 13 मार्च रोजी जागतिक मुत्रपिंड दिन साजरा केला जातो. यावर्षीची संकल्पना आर युवर किडनीज्‌‍ ओके? डिटेक्ट अर्ली प्रोटेक्ट किडनी हेल्थ ही आहे.

डॉ.रोकडे म्हणाले की,लठ्ठपणा,मधुमेह,उच्च रक्तदाब यासह जीवनशैलीशी संबंधित वाढते आजार हे दीर्घकालीन मुत्रपिंडाच्या आजारांसाठी जोखमीचे घटक ठरत आहेत.

ते पुढे म्हणाले की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे आणि विशिष्ट हर्बल औषधांचा उपयोग यामुळे मुत्रपिंड निकामी होण्याचा धोका निर्माण होत आहे.

तंबाखू,मद्यपान,जंक फूड यासारख्या चुकीच्या सवयी बदलणे गरजेचे आहे. अलीकडच्या काळात फॅड डाएटचे प्रमाण वाढले आहे,मात्र योग्य सल्ला आणि मार्गदर्शनाशिवाय वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होत नाही.

मुत्रपिंड हे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात, म्हणून आपण काय खातो,त्याचे पोषणमुल्य काय याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी आपले मुत्रपिंड योग्यरित्या कार्य करत आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी मुत्रातील प्रथिने आणि सीरम क्रिएटिनिनची तपासणी करावी. कोणताही आजार नसलेल्या व्यक्तींनी निरोगी जीवनशैली अंगिकारावी,दररोज किमान 2 ते 3 लीटर पाणी प्यावे,वजन नियंत्रित ठेवावे,नियमित व्यायाम करावा आणि वेदनाशामक औषधे घेणे टाळावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments