Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedपीएनजी ज्वेलर्स'चे चिंचवडनंतर तळेगावात नवीन दालन सुरू पारंपरिक आणि आधुनिक अशा...

पीएनजी ज्वेलर्स’चे चिंचवडनंतर तळेगावात नवीन दालन सुरू पारंपरिक आणि आधुनिक अशा कलेक्शनसह ब्रॅंडच्या विश्वासार्हतेचा विस्तार

तळेगाव,17 मार्च २०२५ : चिंचवडमधील यशस्वी ५१ व्या दालनाच्या उद्घाटनानंतर, ‘पीएनजी ज्वेलर्स’ने तळेगावात नवीन दालन १६ मार्च २०२५ पासून सुरू करून आपल्या विस्तारला गती दिली आहे. हे नवीन दालन महाराष्ट्रातील ‘पीएनजी ज्वेलर्स’ची उपस्थिती अधिक मजबूत करणार असून त्यांच्या अद्वितीय परंपरा, कौशल्य आणि नावीन्यपूर्ण दागिन्यांचे प्रदर्शन तळेगावाच्या ग्राहकांसाठी खुले करणार आहे.

 

 

 

तळेगाव दाभाडे येथे सुरू करण्यात आलेल्या या ४००० चौरस फूट क्षेत्रफळाच्या भव्य दालनाचे उद्घाटन बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ, श्री. पराग गाडगीळ आणि ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या दालनात सोने, हिरे, चांदी त्याचबरोबर प्लॅटिनमचे दागिने उपलब्ध असून पारंपरिकतेसह आधुनिक शैली असलेल्या दागिन्यांचा मनमोहक संग्रह पाहायला मिळणार आहे. उद्घाटनाच्या निमित्ताने, ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स जाहीर करण्यात आल्या असून, सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर २०% पर्यंत सवलत आणि हिऱ्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर १००% पर्यंत सवलत देण्यात येत आहे.

 

 

 

‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ सौरभ गाडगीळ म्हणाले, “चिंचवड दालनाच्या यशस्वी उद्घाटनानंतर आम्ही महाराष्ट्रात ‘पीएनजी ज्वेलर्स’चा विस्तार आणखी वेगाने करण्याचा प्रयत्न करत आहोत. तळेगावातील हे दालन गुणवत्तापूर्ण आणि विश्वासार्हतेसह उत्तम दर्जाचे दागिने प्रदान करण्यासाठी प्रयत्नशील राहील. आम्ही तळेगावकरांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांना उत्कृष्ट दागिने आणि सेवा प्रदान करत राहू याची हमी देतो.”

 

 

 

बॉलीवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग म्हणाल्या, “पीएनजी ज्वेलर्सच्या या भव्य उद्घाटन सोहळ्याचा भाग होण्याची संधी मला मिळाली, याचा आनंद आहे. ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या गुणवत्तेची आणि ग्राहकांच्या विश्वासाची जपणूक करण्याची बांधिलकी कौतुकास्पद आहे. तळेगावमधील या नव्या दालनामुळे, ग्राहकांना पारंपरिक आणि आधुनिक कारागिरीचा सुंदर संगम असलेले दागिने सहज उपलब्ध होतील याची खात्री आहे.”

 

 

 

‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे या भव्य उद्घाटनानिमित्त मर्यादित कालावधीसाठी विशेष सवलती आणि ऑफर्स देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील पारंपरिक दागिन्यांना असलेली अनमोल ओळख जपत, ‘पीएनजी ज्वेलर्स’ने पिढ्यान्‌पिढ्या त्यांच्या शैलींचे जतन आणि आधुनिकीकरण केले आहे. आज ‘पीएनजी ज्वेलर्स’ भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या ब्रँडच्या विस्तारीकरणाला चालना देत आहे. तळेगावातील हे दालन तज्ज्ञ कारागिरी, हॉलमार्क प्रमाणित दागिने आणि खास वधू-वरांसाठी दागिन्यांचे विविध संग्रह यांसह एक अद्वितीय खरेदीचा अनुभव या दालनाद्वारे मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments