पुणे,17 मार्च 2025 : भारतीय एअर कूलर बाजारपेठेची पायाभरणी करणाऱ्या केनस्टारने केनस्टार बीएलडीसी मॅक्स ही आपली क्रांतिकारी कूलिंग उपाययोजना बाजारात दाखल केल्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या बाजारात नव्याने दाखल झालेल्या एअर कूलर्सच्या श्रेणीमध्ये अंतर्भूत असलेले हे अत्याधुनिक नवसंकल्पना साकारणारे तंत्रज्ञान उत्कृष्ट कार्यक्षमता असणारे, अधिक काळ टिकणारे व भारतीय घरांना अधिक चांगली विश्वासार्हता पुरविणारे आहे.
या श्रेणीच्या बाजारातील पदार्पणासाठी केनस्टार एक प्रभावी जाहिरात प्रसिद्ध करत आहे, ज्यात राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत व त्यांच्या सोबतीला अॅनिमेशनवरून प्रेरणा घेत बनविण्यात आलेले, भविष्यवेधी दृष्टिकोन, पर्यावरणस्नेही आणि कार्यक्षमता यांचे प्रतिनिधीत्व करणारे टेकी बॉय हे पात्र असणार आहे. आपल्या पर्यावरण-स्नेही आणि किफायतशीर तंत्रज्ञानाच्या साथीने उन्हाळा अधिक स्मार्ट, अधिक कूल बनविण्याप्रती ब्रॅण्डची बांधिलकी या जाहिरातीतून अधोरेखित झाली आहे. तसेच त्यातून भारतीय प्रेक्षकवर्गाशी ब्रॅण्डचे गहिरे नातेही पुन: प्रस्थापित होणार आहे.
बीएलडीसी (ब्रशलेस डिरेक्ट करंट) हे नवे तंत्रज्ञान घेऊन आलेले बीएलडीसी मॅक्स विजेची ६० टक्क्यांपर्यंत बचत करते, त्यामुळे हा कूलर भारतीय ग्राहकांसाठी एक पर्यावरणस्नेही आणि किफायतशीर पर्याय ठरतो. ही उत्पादने आर्द्रतेवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवतात व सर्व ऋतूंमध्ये जास्तीत-जास्त आराम मिळेल, याची हमी देतात. याचे काम जराही आवाज न करता चालत असल्याने ते घरांसाठी व कार्यालयांसाठी आदर्श ठरतात. आपल्या उत्पादनगटातील सर्वोत्तम अशी ५ वर्षांची वॉरंटी आणि ३ वर्षांची पंप वॉरंटी असलेले हे कूलर्स अतीव उन्हाळ्यातही अधिक टिकाऊपणा व सातत्यपूर्ण कामगिरीची खात्री देतात.
“केनस्टारचा एकमेव हेतू आजच्या ग्राहकांच्या वेगाने बदलत्या आकांक्षा पूर्ण करणे हा आहे.” केनस्टारचे सीईओ सुनिल जैन म्हणाले. “आजच्या ग्राहकांना उच्च दर्जाची कामगिरी तर हवी असतेच, पण त्याचबरोबर उत्पादनाच्या बाह्यरूपाचे सौंदर्य व त्यातील तंत्रज्ञान या दोहोंतही आधुनिकता हवी असते. केनस्टारचा बॅज उच्चतम दर्जा, आकर्षक डिझाइन आणि प्रदीर्घकाळ टिकण्याची क्षमता यांचे प्रतिनिधीत्व करतो. आमच्या बीएलडीसी मॅक्सची शक्ती लाभलेले एअर कूलर्स म्हणजे या उद्योगक्षेत्रासाठी व आमच्या ग्राहकांसाठीही एक मोठी झेप आहे.”
केनस्टारच्या मार्केटिंग विभागाच्या प्रमुख नेहा कुमार पुढे म्हणाल्या, “आमचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर्स राजकुमार राव व पत्रलेखा व त्यांच्या सोबत असणारा टेकी बॉय यांच्यामुळे संभाव्य ग्राहकांना कूलर्सची ही श्रेणी अधिकच आकर्षक वाटेल व त्यातून ब्रॅण्डचा नाविन्यपूर्ण दृष्टिकोन पुन:प्रस्थापित होईल. काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या आपल्या विचारसरणीतून टेकी बॉय प्रगत कूलिंग तंत्रज्ञान आपल्याशी संबंधित असल्याची भावना ग्राहकांच्या मनात जागवतो व केनस्टारची ही ताजी नवसंकल्पना त्यांचे विजेचे बिल आटोक्यात ठेवतानाच त्यांनाही कशाप्रकारे थंड ठेवू शकते, हे समजून घेण्यास ग्राहकांची मदत करतो.”
बीएलडीसी मॅक्स तंत्रज्ञान केंद्रस्थानी बाळगणारे केनस्टार एअर कूलर्सची एक सर्वसमावेशक श्रेणी सादर करते, ज्यात Tall Boy, TallDe, Arc 3D या व अशा इतरही कूलर्सचा समावेश आहे, जे कूलिंगची नवीन व्याख्या तयार करणारे, ऊर्जेचा वापर कमी करणारे व अधिक आराम पुरविणारे आहेत. या उन्हाळ्यामध्ये केनस्टार कूलर्सचे ५० हून अधिक एसकेयू पुरवित आहे, ज्यात महा डेझर्ट, डेझर्ट, पर्सनल, टॉवर आणि विंडो कूलर्सचा समावेश आहे, जे प्रत्येक घर व व्यवसायासाठी परिपूर्ण कूलिंग उपाययोजना पुरविण्याची हमी देणारे आहेत.
एअर कंडिशनर्सची आपली नवीन श्रेणी बाजारात आणत केनस्टार होम अप्लायन्सेसच्या बाजारपेठेतील आपले स्थानही अधिक भक्कम करत आहे. धोरणीपणे उचललेल्या या पावलामुळे रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशीन्स, वॉटर हीटर्स, रूम हीटर्स आणि लाइफस्टाइल अप्लायन्सेससह आपल्या वैविध्यपूर्ण उत्पादनश्रेणीअंतर्गत उच्च दर्जाची कामगिरी देणारी, शैलीदार व टिकाऊ उत्पादने पुरविण्याप्रती ब्रॅण्डची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.
==============================


