पुणे –
आज दि. 17 मार्च 2025 रोजी तिथी प्रमाणे युनाइटेड इंडिया इन्शुरन्स. कं. च्या काकडे बीज आयकोन गणेश खिंड रोड येथे थाटा माटात साजरी केली.
दीप प्रज्वलन, संध्या डंके यांच्या पोवाडा गायना नंतर सुनील देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी खूप छान आणि उडबोधक माहिती दिली. यानंतर पिंपरी वाहतूक शाखेच्या दोन महिला कर्मचारी सौं. रेश्मा खान आणि सौं. नीलिमा चव्हाण यांचा त्यांनी एका वीट भट्टी महिलेची डिलेव्हरी वाकड येथे डॉक्टरांच्या सूचनेनुसार व्हीडिओ कॉल वरून सूचना घेऊन सुखरूप केली या त्यांच्या समयसूचकते साठी आणि धाडसी निर्णय घेऊन केलेले एक उत्तम काम म्हणून सत्कार केला. तसेच रींगल ऑफिस पुण्याच्या डी. जि.एम. जयश्री यांचाही त्या जनरल मॅनेजर या पदावर बढती मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
हे सर्व सत्कार भारतीय विमा कर्मचारी सेनेचे पुणे विभागाचे अध्यक्ष मा. रत्नाकर उर्फ शिरीष फडतरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या नंतर मा. जयश्री नायर, शिरीष फडतरे या दोघांची समायोचित भाषणे झाली.
यांनंतर प्रफुल सुदामे यांनी आभार प्रदर्शन केले, आणि अलपोपहार होऊन कार्यक्रम संपला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय विमा कर्मचारी सेनेच्या श्री. प्रफुल्ल सुदामे, सुनील देसाई, कुणाल सावळे, श्री. रहागळे, यशवंत सावंत, राम धावडे, आकाश कांबळे, सौं. स्वाती हेजीब विशाल राजपूत आणि तीन महिला कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेतले.


