पुणे, 19 मार्च २०२५ : मॅनेजमेंट क्षेत्रातील शिक्षणात समृद्ध वारसा असलेल्या पुण्यामधील इंडसर्च संस्थेतर्फे लॉ कॉलेज रोडच्या शाखेमध्ये बी.कॉम संदर्भात बी.कॉम (बँकिंग , फायनान्शिअल सर्विसेस व इन्शुरन्स) आणि बी.कॉम (ह्यूमन कॅपिटल मॅनेजमेंट) हे दोन अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.
बी.कॉम (बँकिंग, फायनान्शिअल सर्विसेस व इन्शुरन्स) ची संरचना ही विद्यार्थ्यांना बँकिंग, विविध वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्राबद्दल पूर्ण माहिती देणारी आहे, तर बी.कॉम (ह्यूमन कॅपिटल मॅनेजमेंट ) ची संरचना ही मनुष्यबळ विकास व व्यवस्थापन याबद्दल पूर्ण माहिती देणारी आहे. इंडसर्च मध्ये या अभ्यासक्रम अंतर्गत अनेक आधुनिक व व्यावहारिक उपयुक्तता असलेले विषय शिकवले जाणार आहेत. बी. कॉम (बीएफएसआय) अभ्यासक्रमामध्ये युपीआय, डिजिटल पेमेंट्स, इंटरनेट बँकिंग, क्रिप्टोकरन्सी यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर भर दिला जाणार असून कॉम्पुटर ऍप्लिकेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, वेब आणि सोशल मीडिया ऍनालिटिक्स, प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर असे विषय समाविष्ट आहेत. तसेच, फॉरेन्सिक अकाउंटिंग आणि ऑडिटिंग ,फायनान्शियल लिटरसी आणि पर्सनल फायनान्स अशा व्यावहारिक विषयांचा सुद्धा या मध्ये अंतर्भाव आहे. बी.कॉम (बीएफएसआय) हा अभ्यासक्रम बँकिंग प्रणाली, वित्तीय व्यवस्थापन, गुंतवणूक धोरणे, शेअर मार्केट, विमा यांसारख्या महत्त्वाच्या संकल्पनांवर भर देतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना बीएफएसआय या क्षेत्रातील तांत्रिक आणि व्यावसायिक ज्ञान मिळण्यास मदत होऊ शकते. या कोर्स नंतर विद्यार्थ्यांना बँका, वित्तीय संस्था, विमा कंपन्या, गुंतवणूक फर्म्स आणि स्टॉक मार्केटमध्ये विविध पदांवर नोकरीच्या संधी मिळू शकतात.
आजच्या स्पर्धात्मक युगात कोणत्याही संस्थेच्या यशासाठी तिच्या कर्मचार्यांचे व्यवस्थापन महत्त्वाचे असते, आणि यासाठी हुमन कॅपिटल मॅनेजमेंट क्षेत्राला विशेष महत्त्व आहे. इंडसर्च मध्ये बी.कॉम (ह्यूमन कॅपिटल मॅनेजमेंट ) या अभ्यासक्रम अंतर्गत आजच्या आधुनिक कर्मचारी व्यवस्थापन तंत्रज्ञानावर भर दिला जाणार असून यामध्ये कर्मचारी व्यवस्थापन संस्था,औद्योगिक मनोविज्ञान, डेटा ऍनालिटिक्स आणि ए आय आधारित भरती प्रक्रिया , असे अनेक विषय शिकवले जाणार आहेत. यातून विद्यार्थ्यांना कर्मचारी व्यवस्थापन, भरती प्रक्रिया, प्रशिक्षण, वेतन आणि प्रोत्साहन (कम्पेन्सेशन अँड बेनिफिट्स), संघटनात्मक वर्तन (ऑर्गनायझेशन बिहेवियर ) आणि कर्मचारी संबंध (एम्प्लॉयी रिलेशन्स ) याबाबत ज्ञान मिळते. या कोर्सनंतर विद्यार्थी मानवी संसाधन व्यवस्थापन (एचआरएम ) क्षेत्रातील विविध पद जसे की: एचआर व्यवस्थापक (एचआर मॅनेजर), भरती अधिकारी (रिक्रुटमेंट ऑफिसर ), वेतन व फायदे व्यवस्थापक (पेरोल अँड बेनिफिट्स मॅनेजर), प्रशिक्षण व विकास अधिकारी ( रिक्रुटमेंट ऑफिसर), कामगार संबंध सल्लागार (लेबर रिलेशन्स स्पेशालिस्ट ) म्हणून काम करू शकतात.


