Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोदरेज जर्सीतर्फे आर्थिक वर्ष 26 साठी 3x3 धोरण सादर: तीन प्रमुख...

गोदरेज जर्सीतर्फे आर्थिक वर्ष 26 साठी 3×3 धोरण सादर: तीन प्रमुख उत्पादनांवर लक्ष केंद्रित करत घरोघरी प्रवेश, बाजारपेठीय विस्तार आणि उत्पादन नाविन्यपूर्णतेवर भर – आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये 1000 कोटी रु. च्या मूल्यवर्धित पोर्टफोलिओचे लक्ष्य

आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये 1000 कोटी रु. च्या मूल्यवर्धित पोर्टफोलिओचे लक्ष्य

 

 

 

Pune, 21 मार्च 2025 – दक्षिण भारतातील दुग्ध व्यवसायातील अग्रगण्य ब्रँड गोदरेज जर्सी ने आज आर्थिक वर्ष 26 साठी आपले महत्त्वाकांक्षी 3×3 Leapfrog धोरण सादर केले. या भविष्याभिमुख उपक्रमाचा उद्देश कंपनीच्या उत्पादन श्रेणीचा विस्तार करणे, बाजारातील प्रवेश वाढवणे आणि सातत्यपूर्ण नवीन उपक्रमाद्वारे ग्राहकांचा अनुभव अधिक उंचावणे हा आहे. बदाम दूध, पनीर आणि दही या तीन मुख्य उत्पादनांवर लक्ष केंद्रित करून गोदरेज जर्सी दुग्ध व्यवसायातील मूल्यवर्धित विभागात आघाडी घेण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

 

 

 

या धोरणाची तीन प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:

 

· घरोघरी प्रवेश वाढवणे: आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील (APT) “व्हॅल्यू अॅडेड प्रॉडक्ट” पोर्टफोलिओची चाचणी आणि वापर वाढवणे.

 

· बाजार विस्तार: बदाम दूध आणि पनीरचे आंध्र प्रदेश व तेलंगणा (APT) मधील प्रादेशिक बाजारपेठेत वितरण वाढवणे.

 

· उत्पादनात नाविन्यपूर्णता: ग्राहकांच्या बदलत्या आवडीनुसार सतत नाविन्यपूर्ण मूल्यवर्धित उत्पादने (VAP) विकसित करणे.

 

 

 

गोदरेज जर्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र सूरी म्हणाले, “आर्थिक वर्ष 26 च्या दिशेने वाटचाल करत असताना आमचे विकास धोरण उभरत्या श्रेणींमध्ये मजबूत स्थिरता मिळवण्यावर केंद्रित आहे. 3×3 Leapfrog धोरण आम्हाला बाजारपेठीय विस्तार वेगवान करण्यास, ग्राहकांना अधिक चांगले पर्याय देण्यास आणि सातत्यपूर्ण नवीन उपक्रम, धोरणात्मक गुंतवणूक आणि योग्य भागीदारीद्वारे शाश्वत वाढ साध्य करण्यास मदत करेल. जोडीला मूल्यवर्धित उत्पादन पोर्टफोलिओ (VAP) विस्तारून आमचा बाजारपेठीय हिस्सा मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवत आम्ही दक्षिण भारतातील दुग्ध व्यवसायात आमचे नेतृत्व अधिक मजबूत करू. या धोरणांच्या मदतीने गोदरेज जर्सी पुढील दोन वर्षांत तेलंगणामध्ये 1,000 कोटी रु. ची उलाढाल साध्य करण्यासाठी तयार आहे. बाजारातील प्रवेश, उत्पादन नाविन्यपूर्णता आणि ग्राहक सहभागाच्या वाढीमुळे याला चालना मिळेल.”

 

 

 

 

 

ब्रॅंड आपली मार्केटिंग गुंतवणूक वाढवत आहे आणि नवीन अत्याधुनिक तंत्रांचा वापर करून विकासाला गती देत आहे. यामध्ये उच्च-प्रोफाइल सेलिब्रिटी यांचा सहभाग समाविष्ट आहे. प्रख्यात अभिनेता राणा दग्गुबाती बदाम दुधासाठी आणि विस्मई फुड्सचे प्रसिद्ध शेफ तेजा पनीर श्रेणीसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून असतील. यामुळे गोदरेज जर्सीचे बाजारपेठेतील स्थान उंचावेल, ब्रँड प्रभाव वाढेल आणि ग्राहकांमध्ये त्यांची ओळख आणखी मजबूत होईल.

 

 

 

उत्तम गुणवत्ता आणि समृद्ध चव यांसह नवीन पॅकेजिंगमुळे गोदरेज जर्सी पॅक केलेल्या पनीरच्या बाजारपेठेत क्रांती घडवत आहे. स्वयंपाक करताना अत्यंत मऊ आणि सुटे मोकळे न होता म्हणजेच विरघळून न जाता टिकून राहील अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहे. ‘स्वादिष्ट पनीर डिशेस कशा तयार कराव्यात?’ या दक्षिण भारतातील ग्राहकांच्या सर्वात मोठ्या प्रश्नाचे उत्तर या पनीरमधून मिळते. 200 ग्रॅमच्या सिंगल-यूज पॅकमध्ये QR कोड असेल. ज्याद्वारे ग्राहकांना शेफ तेजाच्या सोप्या आणि स्वादिष्ट पनीर पाककृती पाहता येतील.

 

 

 

कंपनी संशोधन आणि विकासात मोठी गुंतवणूक करत असून, ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन नवीन नाविन्यपूर्ण उत्पादन आणण्यावर भर देत आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये संशोधन आणि विकासावर 50% अधिक खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे नाविन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणता येतील. त्यातून बाजारातील योजना बळकट करण्यास, बाजारपेठेत अग्रणी राहण्यास आणि ग्राहक अनुभव सुधारण्यास मदत मिळेल.

 

 

 

गोदरेज जर्सीचे मार्केटिंग प्रमुख शंतनू राज म्हणाले, “आजचे ग्राहक परिक्षेत्र आजपर्यंत कधी नव्हते एवढे गतिशील झाले आहे. त्यामुळे अग्रणी राहणे म्हणजे त्यांच्या बदलत्या गरजा ओळखून त्या पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. मूल्य वर्धित उत्पादनांवर आमचा भर सुलभता, चव आणि नाविन्यपूर्णतेबाबत बांधिलकी जपत अधिकाधिक घरांपर्यंत पोहोचवण्यावर आणि बाजार विस्तारावर केंद्रित आहे. यासाठी आम्ही आंध्रप्रदेश तेलंगणामध्ये (APT) जाहिरात आणि संज्ञापन अधिक वाढवत आहोत तसेच जागृती आणि चाचण्या दोन्ही वाढविण्यासाठी पुढील वर्षभरात तेलंगणामध्ये वितरण नेटवर्क 20,000 आउटलेट्स पर्यंत वाढवत आहोत. जोडीला गोदरेज जर्सी बदाम दूध येत्या दोन वर्षांत 100 कोटी रु. चा ब्रँड बनण्याच्या मार्गावर आहे. आम्ही क्विक कॉमर्स आणि मॉडर्न ट्रेड यांसारख्या विविध चॅनेल्समध्ये आमचे स्थान मजबूत करत आहोत. ग्राहक-केंद्रीत दृष्टिकोनाला डेटा प्रणीत माहितीची जोड देऊन सखोल सहभाग वाढवणे, उपलब्धतेला गती देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यायोगे गोदरेज जर्सी दक्षिण भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह ब्रँड राहील हे आम्ही सुनिश्चित करत आहोत.”

 

 

 

ब्रॅंडचे दुग्ध उत्पादन क्षेत्रातील स्पर्धात्मक बाजारपेठेत गोदरेज जर्सी दही या उत्पादनाचे स्थान वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यांचे दही उत्तम दर्जाचा एकसंध पोत आणि घरगुती चवीसाठी ओळखले जाते. गोदरेज जर्सी दही घट्ट, कवडी असलेले आणि मलईदार असून घरी विरजण लावून बनवलेल्या दहयाप्रमाणे लागते. त्यामुळे ग्राहकांसाठी अस्सल चवीचे ठरते. निव्वळ ताज्या आणि शुद्ध दुधाने तयार करण्यात आलेल्या या दहयाला पाणी सुटत नाही. यातून त्याच्या उच्च गुणवत्तेची हमी मिळते. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील ग्राहकांचा कल घट्ट दह्याच्या दिशेने असल्याने, गोदरेज जर्सी दही हा प्रत्येक जेवणात एक आदर्श भर घालणारा पर्याय आहे.

 

 

 

गोदरेज जर्सीचे शहरी तसेच ग्रामीण बाजारपेठांमध्ये धोरणात्मक विस्तार करण्याचे ध्येय आहे. ब्रँडचे मल्टी-प्रॉन्गड धोरण भविष्यासाठी मजबूत पाया तयार करत आहे. ब्रँडने महत्वाकांक्षी उत्पादन नाविन्यपूर्ण धोरण आणि ग्राहक सहभाग यावर भर देत बाजारपेठीय हिस्सा वाढवण्याच्या दृष्टीने स्वतःचे स्थान निर्माण केलेले असताना गोदरेज समूहाच्या गुणवत्ता, विश्वास आणि कल्याणकारी दृष्टिकोनाचा वारसा जपण्यास बांधील आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments