Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedतृतीयपंथी देखील समाजाचा एक भाग आहेत याचा स्वीकार करा पन्ना गाबरेल यांचे...

तृतीयपंथी देखील समाजाचा एक भाग आहेत याचा स्वीकार करा पन्ना गाबरेल यांचे मत : श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र (महिला विभाग) यांच्या वतीने मैत्रेय पुरस्कार सोहळा

पुणे : आज एकविसाव्या शतकात देखील तृतीयपंथींना वेगळी वागणूक दिली जाते. सर्वसामान्यांना प्रमाणे त्यांना वागणूक न देता वेगळे समजले जाते. त्यामुळे त्यांना अनेक गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. परंतु ते समाजाचा एक भाग आहेत याचा स्विकार करून त्यांना देखील समान वागणूक दिली पाहिजे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या पन्ना गाबरेल यांनी व्यक्त केले.

 

श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र (महिला विभाग) यांच्या वतीने शुक्रवार पेठेतील यादव व्यापार भवन येथे मैत्रेय पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात देवदासी भगिनींसाठी काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिला व संस्थांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शीतल पवार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. एन्ड्युरन्स टेक्नोलाॅजी लि. चे कार्यकारी उपाध्यक्ष कल्याण पवार, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर पवार यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मानाचा फेटा, सन्मान चिन्ह, भेटवस्तू देऊन यांचा सन्मान करण्यात आला.

 

सन्मानाला उत्तर देत चांदणी गोरे म्हणाल्या, लोक मला बघून हसतात कारण मी वेगळी दिसते. पण मी लोकांना बघून हसते कारण ते सर्व एकसारखे दिसतात, हे तत्व मी टोक्यात ठेवून काम करते त्यामुळे मला त्रास होत नाही. तुमच्याकडे केवळ चांगली दृष्टी असून फायदा नाही तर सकारात्मक दृष्टीकोन देखील असला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

 

सागर पवार म्हणाले, जागतिक महिलादिनानिमित्त प्रतिष्ठानच्यावतीने देवदासी भगिनींसाठी काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिला व संस्थांचा सन्मान करण्यात दरवर्षी करण्यात येतो. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन तर मिळतेच व इतरांना देखील त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळते. प्रतिष्ठानच्यावतीने वर्षभर समाजातील विविध घटकांसाठी उपक्रम राबविले जातात, असेही त्यांनी सांगितले. अलका फाऊंडेशनच्या अलका गुजनाळ, संघटनेचे उपसंपर्क प्रमुख सचिन पवार, महिला संपर्क प्रमुख स्मिता पवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सूत्रसंचालन डॉ.कुमोदिनी पवार यांनी केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments