Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतात सॅमसंगचा सर्वात किफायतशीर एआय-पॉवर्ड स्‍मार्टफोन 'गॅलॅक्‍सी ए२६ ५जी' लाँच, किंमत फक्‍त...

भारतात सॅमसंगचा सर्वात किफायतशीर एआय-पॉवर्ड स्‍मार्टफोन ‘गॅलॅक्‍सी ए२६ ५जी’ लाँच, किंमत फक्‍त २२,९९९ रूपयांपासून

गुरूग्राम, भारत – मार्च २४, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने एआयची क्षमता असलेला सर्वात किफायतशीर स्‍मार्टफोन गॅलॅक्‍सी ए२६ ५जी च्‍या लाँचसह एआय डिमोक्रेटायझेशनच्‍या मर्यादांना दूर करणे सुरूच ठेवले आहे. विनासायास अनुभवासाठी डिझाइन करण्‍यात आलेला गॅलॅक्‍सी ए२६ ५जी स्‍टाइल, टिकाऊपणा, कार्यक्षमता व नाविन्‍यतेचे संतुलित संयोजन देतो, जो दैनंदिन वापरासाठी परिपूर्ण निवड आहे.

 

ऑसम इंटेलिजन्‍स

 

सॅमसंगने गॅलॅक्‍सी ए२६ ५जी मध्‍ये ऑसम इंटेलिजन्‍सची भर केली आहे, ज्‍यामुळे दैनंदिन टास्‍क्‍स स्‍मार्टपणे व सहजपणे करता येतात. इंटेलिजण्‍ट एआय सूट सर्कल टू सर्च विथ गुगल, एआय सिलेक्‍ट, ऑब्‍जेक्‍ट इरेजर, माय फिल्‍टर्स अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांसह युजर अनुभव उत्‍साहित करते.

 

गेल्‍या वर्षी गॅलॅक्‍सी ए सिरीज डिवाईसेसवरील चाहत्‍यांचे आवडते सर्कल टू सर्च विथ गुगल वैशिष्‍ट्य आता फोटोंच्‍या पलीकडे जात वापरकर्त्‍यांना गाणी ओळखण्‍यास, माहिती शोधण्‍यास आणि किमान प्रयत्‍नांसह त्‍वरित कृती करण्‍यास मदत करते. नवीन अपडेट्ससह वापरकर्ते आता त्‍यांच्‍या फोनवर अधिक टास्‍क्‍स करू शकतात. सर्कल टू सर्च विथ गुगल त्‍वरित स्क्रिनवरील फोन क्रमांक, ईमेल अॅड्रेसेस् व यूआरएल ओळखेल, ज्‍यामुळे वापरकर्ते किमान प्रयत्‍नासह कृती करू शकतात.

 

गॅलॅक्‍सी ए२६ ५जी मध्‍ये ऑब्‍जेक्‍ट इरेजर देखील आहे, जे वापरकर्त्‍यांना फोटोंमधील नको असलेले घटक दूर करण्‍यास मदत करते. वापरकर्ते मॅन्‍युअली किंवा ऑटोमॅटिकली नको असलेले घटक निवडू शकतात, ज्‍यामुळे काही टॅप्‍समध्‍ये सुस्‍पष्‍ट, अधिक आकर्षक इमेज मिळू शकते.

 

एआय सिलेक्‍ट सिंगल क्लिकमध्‍ये माहितीचे त्‍वरित शोध व सादर करत संदर्भ समजण्‍यास मदत करते. माय फिल्‍टर्स वापरकर्त्‍यांना त्‍यांचे वैयक्तिकृत फिल्‍टर्स तयार करण्‍यास सक्षम करते. हे नाविन्‍यपूर्ण वैशिष्‍ट्य वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या पसंतीनुसार फोटोंचा लुक व फिल बदलण्‍यास मदत करते, जेथे ते रंग व स्‍टाइल्‍सचा वापर करून नवीन फोटो तयार करू शकतात. भावी प्रोजेक्‍ट्स सहजपणे उपलब्‍ध होण्‍यासाठी कॅमेरा अॅपमध्‍ये प्रत्‍येक कस्‍टम फिल्‍टर सोईस्‍करपणे सेव्‍ह करण्‍यात आले आहे, ज्‍यामधून अधिक वैयक्तिकृत व सर्जनशील फोटोग्राफी अनुभव मिळतो.

 

ऑसम डिझाइन व डिस्‍प्‍ले

 

गॅलॅक्‍सी ए२६ ५जी पीच, मिंट, व्‍हाइट व ब्‍लॅक या चार स्‍टायलिश रंगांमधील प्रीमियम ग्‍लॉस बॅक अपीअरन्‍ससाठी वरचढ ठरतो, ज्‍यामुळे वापरकर्ते आकर्षक डिझाइनच्‍या माध्‍यमातून त्‍यांचे व्‍यक्तिमत्त्व व्‍यक्‍त करू शकतात. मोठा ६.७-इंच सुपर एएमओएलईडी डिस्‍प्‍ले १२० हर्टझ रिफ्रेश रेटसह व्‍युइंग अनुभव अधिक उत्‍साहित करतो. हा डिवाईस पूर्वीच्‍या व्‍हेरिएण्‍ट्सच्‍या तुलनेत अधिक स्लिम आहे, ज्‍याची जाडी फक्‍त ७.७ मिमी आहे, ज्‍यामुळे तो स्‍लीक असण्‍यासोबत सहजपणे हातामध्‍ये मावतो.

 

ऑसम कार्यक्षमता

 

गॅलॅक्‍सी ए२६ ५जी ची खासियम म्‍हणजे एक्झिनॉस १३८० प्रोसेसर, ज्‍यामधून विनासायास मल्‍टीटास्किंग, सुधारित गेमिंग व सुलभ दैनंदिन कार्यक्षमतेची खात्री मिळते. वेपर चेंबर आता मागील जनरेशनच्‍या तुलनेत ३.७ पट मोठे आहे, जे अधिक प्रमाणात गेमप्‍लेदरम्‍यान देखील डिवाईसला कार्यक्षमपणे कार्यरत ठेवते. २५ वॅट फास्‍ट चार्ज सपोर्टसोबत ५००० एमएएच बॅटरी असलेला गॅलॅक्‍सी ए२६ ५जी तुमच्‍या जीवनशैलीसह कार्यरत राहण्‍यासाठी दिवसभर कार्यरत राहतो.

 

ऑसम कॅमेरा

 

फोटोग्राफीप्रेमींना प्रमुख ५० मेगापिक्‍सल ओआयएस मेन कॅमेरा आवडेल, जो सुस्‍पष्‍ट व ब्‍लर नसलेले फोटो कॅप्‍चर करतो. ८ मेगापिक्‍सल अल्‍ट्रा-वाइड कॅमेरा व्‍यापक लँडस्‍केपेससाठी परिपूर्ण आहे, तर २ मेगापिक्‍सल मॅक्रो कॅमेरा सुस्‍पष्‍ट क्‍लोज-अप शॉट्सची खात्री देतो. १३ मेगापिक्‍सल फ्रण्‍ट कॅमेरा उच्‍च दर्जाच्‍या सेल्‍फीजची खात्री देतो आणि शार्प, स्थिर इमेजेस् कॅप्‍चर करण्‍यास मदत करतो.

 

ऑसम टिकाऊपणा

 

गॅलॅक्‍सी ए२६ ५जी त्‍याच्‍या सेगमेंटमधील टिकाऊपणासाठी नवीन बेंचमार्क स्‍थापित करतो आणि दैनंदिन आव्‍हानांमध्‍ये टिकून राहण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, तसेच दीर्घकाळपर्यंत विश्‍वसनीयतेची खात्री देतो. कॉर्निंग गोरिला ग्‍लास विक्‍टस+ उच्‍च दर्जाचे स्‍क्रॅच व ड्रॉप रेसिस्‍टण्‍स देते, ज्‍यामुळे नकळतपणे फोन जमिनीवर पडल्‍यामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण मिळते. आयपी६७ जलरोधक व धूळरोधक रेटिंग अतिरिक्‍त मन:शांती देते, ज्‍यामुळे गॅलॅक्‍सी ए२६ ५जी नकळतपणे खाली पडल्‍यामुळे होणारे नुकसान, पाणी व धूळीपासून संरक्षणाची खात्री देतो.

 

गॅलॅक्‍सी ए२६ ५जी सेगमेंट-लीडिंग ओएस अपग्रेड्सची ६ वर्ष आणि ६ वर्ष सिक्‍युरिटी अपडेट्ससह दीर्घकाळपर्यंत कार्यरत राहण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. यामुळे वापरकर्त्‍यांना आगामी वर्षांसाठी आधुनिक सॉफ्टवेअर सुधारणा आणि प्रबळ सिक्‍युरिटी प्रोटेक्‍शन्‍समधून फायदा मिळतो. टिकाऊ रचना आणि फ्यूचर-रेडी सॉफ्टवेअर सपोर्टला एकत्र करत सॅमसंग ब्रँड म्‍हणून आपले स्‍थान अधिक भक्‍कम करत आहे, जो ग्राहकांसाठी दीर्घकालीन मूल्‍य आणि विश्‍वसनीयतेला प्राधान्‍य देतो.

 

ऑसम तत्त्व

 

किफायतशीर दरामध्‍ये प्रीमियम अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेला गॅलॅक्‍सी ए२६ ५जी आजपासून Samsung.com, सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर्स, आघाडीचे ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म्‍सवर आणि देशभरातील रिटेल स्‍टोअर्समध्‍ये २२,९९९ रूपयांच्‍या* अविश्‍वसनीय किमतीत उपलब्‍ध आहे. गॅलॅक्‍सी ए२६ ५जी १२८ जीबी व १२५ जीबी या दोन स्‍टोरेज पर्यायांमध्‍ये ८ जीबी रॅमसह येतो. दोन्‍ही डिवाईसेसमधील स्‍टोरेज क्षमता मायक्रोएसडीच्‍या माध्‍यमातून जवळपास २ टीबीपर्यंत वाढवता येते, ज्‍यामुळे सर्व कन्‍टेन्‍टसाठी व्‍यापक स्‍टोरेज स्‍पेस मिळते.

 

Variant

 

Original Price

 

Net Effective Price

 

Colours

 

Offers

 

8GB/256GB

 

INR 27999

 

INR 25999

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Awesome Peach, Awesome Mint, Awesome White and Awesome Black

 

Primary Offer:

 

*INR 2000 Bank Cashback (HDFC and SBI)

 

 

 

Additional Offer:

 

Samsung Care+: 1 year Screen Protection at just INR 1699

 

₹9

99

 

 

 

 

 

Up to 12 months No Cost EMI

 

8GB/128GB

 

INR 24999

 

INR 22999

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments