Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडियाकडून महाराष्‍ट्रातील नाशिक येथे ह्युंदाई एक्‍सप्‍लोरर्स कार्निवल आयोजित

ह्युंदाई मोटर इंडियाकडून महाराष्‍ट्रातील नाशिक येथे ह्युंदाई एक्‍सप्‍लोरर्स कार्निवल आयोजित

§ ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडकडून ह्युंदाई एक्‍सप्‍लोरर्स कार्निवलच्‍या पुढील एडिशनची घोषणा, जो महाराष्‍ट्रातील नाशिक येथे ५ एप्रिल २०२५ (शनिवार) रोजी आयोजित करण्‍यात आला आहे

 

§ या विशेष ग्राहक संबंध उपक्रमाचा ह्युंदाई मालकांना एकाच व्‍यासपीठावर आणत दिवसभर शोध मोहिम, साहस, फन फिएस्‍टा अशा धमाल क्षणांचा आनंद देण्‍याचा मनसुबा आहे

 

§ ह्युंदाई ग्राहक या क्‍यूरेटेड अनुभवासाठी hyundaiexplorers.com येथे त्‍यांची स्‍वत:ची, तसेच जवळपास ३ अतिरिक्‍त सदस्‍यांची नोंद करू शकतात

 

नाशिक । एप्रिल २, २०२५: ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) ने आज त्‍यांचा विशेष ग्राहक संबंध महोत्‍सव ‘ह्युंदाई एक्‍सप्‍लोरर्स कार्निवल’च्‍या पुढील एडिशनची घोषणा केली, जो ५ एप्रिल २०२५ (शनिवार) रोजी महाराष्‍ट्रातील नाशिक येथे आयोजित करण्‍यात आला आहे. एचएमआयएलने या कार्निवलच्‍या विविध यशस्‍वी एडिशन्‍सचे आयोजन केले आहे, जेथे भारतभरातील ह्युंदाई मालकांच्‍या विकसित होत असलेल्‍या समुदायामधील हजारो ग्राहक एकत्र आले आहेत. ह्युंदाई एक्‍सप्‍लोरर्स कार्निवलमधून ग्राहक-केंद्रित्‍वाप्रती, तसेच शोध व साहसाचा उत्‍साह सामावलेला संस्‍मरणीय अनुभव देण्‍याप्रती एचएमआयएलची कटिबद्धता दिसून येते. ह्युंदाई ग्राहक hyundaiexplorers.com येथे भेट देत नाममात्र नोंदणी शुल्‍कामध्‍ये त्‍यांची स्‍वत:ची आणि कुटुंबातील जवळपास ३ सदस्‍यांची नोंदणी करू शकतात.

 

या प्रायोगिक उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत एचएमआयएलचे पूर्ण-वेळ संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. तरूण गर्ग म्हणाले, ”ह्युंदाईमध्‍ये आमचा आमची उत्‍पादने व सेवांच्‍या माध्‍यमातून किंवा ह्युंदाई एक्‍सप्‍लोरर्स कार्निवल यांसारख्‍या अद्वितीय उपक्रमांच्‍या माध्‍यमातून ग्राहकांसाठी उत्‍साहवर्धक अनुभव निर्माण करण्‍यावर विश्‍वास आहे. भारतभरात ११ यशस्‍वी एडिशन्‍स पूर्ण करण्‍यासह आता दुसऱ्या वर्षामध्‍ये ह्युंदाई एक्‍सप्‍लोरर्स कार्निवल ह्युंदाई मालकांच्‍या निष्‍ठावान समुदायाला एकत्र आणत आहे. आगामी एडिशन ग्राहकांना नाशिकच्‍या नयनरम्‍य व ऐतिहासिक आकर्षणांच्‍या माध्‍यमातून प्रायोगिक प्रवासावर घेऊन जाण्‍याची खात्री देते, जेथे स्‍थानिक स्‍वाद, रोमांचक गेम्‍स आणि मंत्रमुग्‍ध लाइव्‍ह म्‍युझिकने भरलेल्‍या उत्‍साहवर्धक कार्निवल महोत्‍सवासह या प्रवासाची सांगता होईल. नाविन्‍यता, साहस व समुदाय या ह्युंदाईच्‍या ब्रँड तत्त्वांना सादर करत ह्युंदाई एक्‍सप्‍लोरर्स कार्निवल इव्‍हेण्‍टपेक्षा अधिक बहुमूल्‍य ग्राहकांकरिता संस्‍मरणीय आठवणी निर्माण करण्‍याची संधी आहे.”

 

ह्युंदाई एक्‍सप्‍लोरर्स कार्निवलला विविध भौगोलिक स्‍थळांमधील आणि वयोगटांतील सहभागींकडून उल्‍लेखनीय प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमाने आपलेपणाची भावना जागृत केली आहे, जी ह्युंदाई आणि तिच्‍या निष्‍ठावान ग्राहकांमध्‍ये दृढ नाते निर्माण करत आहे. एचएमआयएल ग्राहक संबंध दृढ करण्‍यासाठी वर्षभर आपल्‍या ग्राहकांसाठी साहसी मोहिमा, कार्निवल आणि कॉन्‍सर्टस् यांसारख्‍या विविध विशेष इव्‍हेण्‍ट्सचे आयोजन क

रते.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments