Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorized‘एअरबीएनबी’तर्फे ‘गोवा अनसीन’ मार्गदर्शिका सादर; राज्याच्या सांस्कृतिक खजिन्याची डिजिटल मार्गदर्शिका

‘एअरबीएनबी’तर्फे ‘गोवा अनसीन’ मार्गदर्शिका सादर; राज्याच्या सांस्कृतिक खजिन्याची डिजिटल मार्गदर्शिका

‘एअरबीएनबी’च्या गोव्यातील बुकिंगला पुण्यातून चालना,

देशांतर्गत पर्यटन वाढवणाऱ्या अव्वल शहरांमध्ये स्थान मिळवते

भारत, २ एप्रिल २०२५ : गोव्याचा चमचमता समुद्रकिनारा आणि उत्साही नाइट लाइफ यामुळे हे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक बनले आहे. मात्र, गर्दीने गजबजलेल्या समुद्रकिनाऱ्यांपलीकडेही एक वेगळा गोवा दडला आहे. वारसा, कलेचा ठेवा आणि स्थानिक परंपरा यांनी समृद्ध असलेल्या गोव्यातील वसाहतकालीन वाडे, निसर्गरम्य मसाल्यांची शेती आणि रंगीबेरंगी बाजारपेठा गोव्याच्या खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक परंपरांची कहाणी सांगतात.

या अपरिचित गोव्याला प्रकाशझोतात आणण्यासाठी, एअरबीएनबीने गोवा पर्यटन विभागाच्या सहकार्याने ‘गोवा अनसीन’ ही डिजिटल मार्गदर्शिका सादर केली आहे. ही मार्गदर्शिका पर्यटकांना नेहमीच्या गोष्टींपलीकडे नेऊन गोवा राज्याच्या लपलेल्या सांस्कृतिक खजिन्यांमध्ये डोकावण्याची संधी देईल.

एअरबीएनबी आणि गोवा पर्यटन विभागाच्या ‘रिडिस्कव्हर गोवा’ उपक्रमाचा भाग म्हणून, ‘गोवा अनसीन’ मार्गदर्शिका राज्यातील लपलेल्या रत्नांची सफर पर्यटकांना घडवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ही मार्गदर्शिका गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खाउंटे, ‘एअरबीएनबी’चे भारत व आग्नेय आशियाचे प्रमुख अमनप्रीत सिंग बजाज, आणि गोव्याशी विशेष नाते असलेले प्रसिद्ध अभिनेते अभय देओल यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आली.

स्थानिक तज्ज्ञांच्या मदतीने तयार केलेली ‘गोवा अनसीन’ मार्गदर्शिका पर्यटकांना गोव्याचा नवा, प्रामाणिक आणि अनोखा अनुभव देण्यासाठी रचली गेली आहे. खाद्यसंस्कृतीतील दिग्गज अविनाश मार्टिन्स, खाद्य विषयक लेखक नोलन मास्करेनहास, कलाकार व कंटेंट क्रिएटर सिद्धार्थ केरकर, ‘गोवा गेटर’चे संस्थापक गर्व वोहरा, पर्यटन विषयक लेखक इंशिया लेसवाला आणि टीव्ही होस्ट व कंटेंट क्रिएटर स्कार्लेट रोझ या तज्ज्ञांचा या मार्गदर्शिकेमध्ये सहभाग आहे. या प्रत्येकाने अपल्याला प्रिय असलेली गोव्याची सांस्कृतिक स्थळे, दडलेल्या खाऊगल्ल्या आणि स्थानिक अनुभव अशा आपल्या शिफारसी मांडल्या आहेत. गोव्याचा खरा आत्मा उलगडण्यात या शिफारसी पर्यटकांना मदत करतील.

‘एअरबीएनबी’साठी गोवा हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे, आणि गोव्यासाठी झालेल्या बुकिंगमध्ये २०२३च्या तुलनेत २०२४मध्ये २० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. विशेषतः दक्षिण गोव्यात बुकिंगमध्ये २५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पर्यटक आता गोव्याच्या प्रसिद्ध हॉटस्पॉट्सपलीकडे जाऊन निसर्गरम्य ग्रामीण भाग आणि स्थानिक संस्कृती अनुभवण्यास प्राधान्य देत आहेत, असे यातून स्पष्टपणे दिसून येते.

‘एअरबीएनबी’चे भारत आणि आग्नेय आशियासाठी प्रमुख अमनप्रीत सिंग बजाज म्हणाले, “गोवा हा नेहमीच ‘एअरबीएनबी’साठी एक महत्त्वाचा पर्यटनस्थळ राहिला आहे. ‘रिडिस्कव्हर गोवा’ आणि ‘गोवा अनसीन’ यांसारख्या उपक्रमांद्वारे आणि गोवा पर्यटन विभागाच्या सहकार्याने, आम्ही राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, गतिशील समुदाय आणि अनोखी निवासस्थाने जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आदरातिथ्य क्षेत्रातील उद्योजकांसह आम्ही जबाबदारीने पर्यटन वाढवण्यास आणि पर्यटकांना गोव्याचा अप्रसिद्ध, पण खरा अनुभव देण्यास वचनबद्ध आहोत.”

‘रिडिस्कव्हर गोवा २.०’ मोहीम आणि ‘गोवा अनसीन’ मार्गदर्शिका यांविषयी माहिती देताना पर्यटन मंत्री रोहन खाउंटे म्हणाले, “पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि पुनरुत्थानशील पर्यटनाला चालना देणे हा आमचा उद्देश आहे, जेणेकरून स्थानिक व्यवसाय, समुदाय आणि नवीन पिढीतील उद्योजक यांना त्याचा लाभ मिळेल. विशेषतः ग्रामीण भागात होमस्टे संकल्पनेला प्रोत्साहन देऊन आणि महिला व तरुणांना सशक्त करून, आम्ही आपल्या पंतप्रधानांच्या ‘नारी शक्ती’ व ‘युवा शक्ती’च्या दृष्टिकोनाशी सुसंगत कृती करत आहोत. ‘गोवा अनसीन’ मार्गदर्शिकेसारख्या उपक्रमांसाठी ‘एअरबीएनबी’सोबत भागीदारी करून आम्ही पर्यटकांना प्रसिद्ध स्थळांपलीकडे नेऊन समुद्र किनाऱ्यापलिकडच्या गोव्याचा अस्सल अनुभव देऊ इच्छितो. संपूर्ण जगभरातील पर्यटकांसाठी गोव्याचा खरा आत्मा शोधण्याचे काम आम्ही एअरबीएनबीसोबत करीत आहोत.”

अभिनेते अभय देओल यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले, “गोवा हे माझ्यासाठी नेहमीच शोधयात्रेचे ठिकाण राहिले आहे. या ठिकाणी सर्जनशीलता, निसर्ग आणि समुदाय यांचे सुंदर मिश्रण आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून गोव्याचा लपलेला खजिना शोधत आलो आहे. इथल्या घनदाट जंगलांपासून दुर्लक्षित किनाऱ्यांपर्यंत, तसेच अनोख्या स्थानिक अनुभवांपर्यंत सर्वांनी माझ्या या यात्रेला प्रेरणा दिली आहे. ‘गोवा अनसीन’च्या माध्यमातून मी हा अनोखा गोवा जगासमोर आणण्यास उत्सुक आहे. ‘एअरबीएनबी’सोबत तुम्हीही गोव्याच्या उत्साही वातावरणाशी स्वतःचा अनोखा संबंध जोडाल अशी आशा आहे.”

‘गोवा अनसीन’च्या मदतीने पर्यटकांना परिचित गोव्याच्या पलीकडे पाहण्याची आणि राज्याच्या अलौकिक सौंदर्याची सफर करण्याची संधी मिळेल. शांत निसर्गरम्य परिसरांचा शोध घ्यायचा असो, कलात्मक ठिकाणांची सफर करायची असो किंवा स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्यायचा असो, ही मार्गदर्शिका गोव्याचा नवा आणि अनोखा अनुभव देणारा परिपूर्ण सहप्रवासी ठरेल.

‘गोवा अनसीन’ मार्गदर्शिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि गोव्याच्या अनोख्या अनुभवांचा शोध घ्या.

‘एअरबीएनबी’विषयी :

एअरबीएनबीची सुरुवात २००७ मध्ये झाली. त्यावेळी दोन यजमानांनी तीन पाहुण्यांचे त्यांच्या सॅन फ्रान्सिस्को येथील घरी स्वागत केले होते. आज ‘एअरबीएनबी’कडे ५० लाखांहून अधिक यजमान आहेत आणि त्यांनी जगभरातील २ अब्जांहून अधिक अतिथींचे स्वागत केले आहे. एअरबीएनबीचे यजमान आपल्या अतिथींना दररोज अनोखी निवासस्थाने आणि अनुभव उपलब्ध करून देतात आणि या पाहुण्यांना स्थानिक समुदायाशी प्रामाणिक आणि अर्थपूर्ण नाते जोडता येईल, अशी व्यवस्था

करतात.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments