Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedसीएफए इन्स्टिट्युट तर्फे इंडिया फिनफ्लुएंसर रिपोर्ट प्रकाशित,फायनान्शियल इनफ्लुएंसर्सचा रिटेल गुंतवणूकीवर होणारा परिणाम...

सीएफए इन्स्टिट्युट तर्फे इंडिया फिनफ्लुएंसर रिपोर्ट प्रकाशित,फायनान्शियल इनफ्लुएंसर्सचा रिटेल गुंतवणूकीवर होणारा परिणाम अधोरेखित

पुणे,३१ मार्च 2025 : गुंतवणूक व्यावसायिकांची जागतिक संघटना असलेल्या सीएफए इन्स्टिट्युट ने ‘क्लिक्स ॲन्ड क्रेडिबिलिटी : अंडरस्टँडींग फिनफ्लुएंसर्स रोल इन इनव्हेस्टमेंट डिसिजन्स’ हा बहुप्रतिक्षित इंडिया फिनफ्लुएंसर रिपोर्ट सादर केला. हा रिपोर्ट भारतातील किरकोळ गुंतवणूकदार क्षेत्रात गुंतवणूक निर्णयांना आकार देण्यात फायनान्शियल इनफ्लुएंसर्स किंवा फिनफ्लुएंसरच्या वाढत चाललेल्या प्रभावाचे व्यापक विश्लेषण करतो. 1600 हून अधिक गुंतवणूकदारांच्या सर्व्हेक्षणावर आणि 51 प्रमुख फायनान्शियल इनफ्लुएंसर्सच्या सखोल विश्लेषणावर आधारित हा अभ्यास याबाबतीतील क्षमता आणि तोटे उघड करतो.

 

उल्लेखनीय बाब म्हणजे रिपोर्टमध्ये विश्लेषण केलेल्या फायनान्शियल इनफ्लुएंसर्सपैकी फक्त 2% लोकं सेबी कडे नोंदणीकृत आहेत,तरीही 33% स्पष्टपणे खरेदी किंवा विक्रीच्या शिफारसी देतात. यामुळे त्यांचा सल्ला,जबाबदारी आणि विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होतो.

 

गेल्या 5 वर्षात भारतात इक्विटी मार्केटमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.शेअर बाजारासाठी ही एक प्रोत्साहनदायक बाब असली तरी भांडवली बाजार नियामक असलेल्या सेबीच्या निष्कर्षावरून असे दिसून येते की यातील अनेक गुंतवणूकदार सट्टेबाज असल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे.माहिती नसलेल्या किरकोळ गुंतवणूकदारांचा बेकायदेशीर फायदा मिळविणाऱ्या फिनफ्लुएंसर्सवर व बेजबाबदार गुंतवणूकीला आळा घालण्यासाठी सेबी ने अनेक वेळा प्रामाणिक प्रयत्न केले आहेत,तरी भारतातील फिनफ्लुएंसर्स क्षेत्राला नियमित करण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे.या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे गुंतवणूकदारांचे गुंतवणूक वर्तन समजून घेणे आणि फिनफ्लुएंसर्स ने तयार केलेल्या आशयाचा आढावा घेणे.

 

या दिशेने रिपोर्टमधील निष्कर्ष गुंतवणूक दारांवर असलेल्या फिनफ्लुएंसर्सच्या प्रभावावर प्रकाश टाकतो. 82% फॉलोअर्स ने असे म्हटले आहे की,त्यांनी फिनफ्लुएंसर्स कडून मिळालेल्या गुंतवणूक सल्ल्यानुसार कृती केली आहे. यापैकी 72% फॉलाअर्सना आर्थिक फायदा झाला आहे. मात्र रिपोर्टमध्ये अंर्तनिहित जोखीम देखील अधोरेखित करण्यात आली आहे. 40 वर्षे किंवा त्यापुढच्या वयाच्या अनुभवी गुंतवणूकदारांपैकी 14% गुंतवणूकदारांनी दिशाभूल झाल्याचे किंवा फसव्या सल्ल्याला बळी पडल्याचे कबूल केले आहे.आर्थिक दक्षता आणि नियामक देखरेखीचे महत्त्व यातून स्पष्ट होते.

 

सीएफए इन्स्टिट्युट – इंडियाच्या कंट्री हेड आरती पोरवाल म्हणाल्या की,भारताच्या फायनान्शियल इनफ्लुएंसर परिसंस्थेत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि व्यापक पातळीवर गुंतवणूकदारांसाठी आर्थिक ज्ञान अधिक सुलभ आणि योग्य बनविण्यासाठी प्रचंड सामर्थ्य आहे.मात्र रिपोर्टमध्ये जबाबदार पध्दती आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.गुंतवणूकदारांनी सतर्क राहावे,सेबी नोंदणीकृत सल्लागारांकडून गुंतवणूक मार्गदर्शन घ्यावे आणि ते फॉलो करत असलेल्या इनफ्लुएंसर्सची विश्वासार्हता तपासावी. सीएफए इन्स्टिट्युटमध्ये आम्ही एक विश्वासार्ह आर्थिक परिसंस्था तयार करण्यासाठी नियामक संस्था,विविध व्यासपीठे आणि इनफ्लुएंसर्स यांच्यात अधिक पारदर्शकता आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहोत.

 

हा रिपोर्ट भारतातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या वर्तनाच्या विविध आयामांचा सखोल अभ्यास करतो. यातून असे दिसून आले आहे की,21 ते 25 वयोगटातील तरूण गुंतवणूकदार अनेकदा अनियमितपणे गुंतवणूक करतात,बचत जमा होण्याची वाट पाहत असतात,तर अनुभवी गुंतवणूकदार मासिक गुंतवणूकीमध्ये अधिक सुसंगती दर्शवितात.विश्वास आणि वापरामध्ये सुलभता हे इंफ्लुएंसिंग प्लॅटफॉर्म निवड करताना प्रमुख घटक आहे. तरुण गुंतवणूकदार कमी ब्रोकरेज असलेले प्लॅटफॉर्म्सला प्राधान्य देतात.तर अनुभवी गुंतवणूकदार व्यापक सेवा व वैयक्तिकृत मार्गदर्शनावर अवलंबून असतात. इनफ्लुएंसर्स त्यांच्या प्रेक्षकांसाठी वित्तीय क्षेत्राबाबत माहिती देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु अहवालात प्रकटीकरण पध्दतींमध्ये अभाव दिसून आला आहे. यामध्ये 63% इनफ्लुएंसर्स प्रायोजकत्व किंवा आर्थिक संलग्नता पुरेसे उघड करण्यात अपयशी ठरत आहेत.

 

सीएफए इन्स्टिट्युट तर्फे नियमन व जागरूकता यातील तफावत दूर करण्याचे महत्त्व देखील अधोरेखित केले जाते. मजबूत प्रमाणन मानकांची आवश्यकता या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आली असून आर्थिक सल्ला देणाऱ्या इनफ्लुएंसर्सना सेबी नोंदणी अनिवार्य करावी व पुनरावलोकन पध्दतींची आवश्यकता असल्याचे आवाहन सरकारकडे करण्यात आले आहे.याशिवाय,सीएफए इन्स्टिट्युट सोशल मिडिया प्लॅटफॉर्म बाबत पारदर्शकता वाढविण्याच्या पध्दतींची शिफारस करते,ज्यामध्ये प्रायोगिक आशयाचे स्पष्ट लेबलिंग आणि विश्वासार्ह फायनान्शियल इनफ्लुएंसर्स निर्माण करण्यासाठी पडताळणी यंत्रणा विकसित करणे समाविष्ट आहे. गुंतवणूकदार जागरूकता मोहिमांसह एकत्रित केलेले हे उपाय,किरकोळ गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यास मदत करतील आणि त्याचबरोबर एक जबाबदार व भरभराटीची आर्थिक सल्ला परिसंस्था विकसित करतील.

 

 

भारतातील गुंतवणूक क्षेत्र विकसित होत असताना,हा रिपोर्ट फायनान्शियल इनफ्लुएंसर्स ने निर्माण केलेल्या संधी आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी तपशीलवार आराखडा देते. शिक्षण,पारदर्शकता आणि सहकार्यावर लक्ष केंद्रित करून, सीएफए इन्स्टिट्युटचे उद्दिष्ट गुंतवणूकदारांना सक्षम करणे आणि भारतातील आर्थिक सल्ल्याची अखंडता टिकवून ठेवण्यासाठी अर्थपूर्ण सुधारणा घडवून आणणे आहे.

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments