पुणे, दि. 5 : महिलांना सबल करण्याबरोबरच त्यांच्यात आर्थिक सक्षमताही निर्माण करायला हवी. त्यातून त्या अधिक स्वयंपूर्ण होऊन स्वत:चे व कुटुंबाचे आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम बनतील, असा विश्वास ज्येष्ठ आर्थिक सल्लागार, सामाजिक कार्यकर्ते आणि सनदी लेखापाल सुरेश मेहता यांनी व्यक्त केला. महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनच्या (बीएनसीए) सभागृहात ‘आर्थिक साक्षरतेसह महिला सबलीकरण’ या विषयावर ते बोलत होते. महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेतील सर्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचे मार्गदर्शन लाभले.
बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप तसेच डॉ. वसुधा गोखले आणि डॉ.मीरा शिरोळकर यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विभाग प्रमुख सनदी लेखापाल शीतल दंडवते, कर विभाग प्रमुख व सनदी लेखापाल निर्मला पाटील तसेच बीएनसीएतील व्यवस्थापन विभाग प्रमूख अमोल हिंगे, शिल्पा पाठक आणि लेखा विभागातील अधिकारी मृदुल गौरी जोशी उपस्थित होते. आयोजक प्रा. गीता नगरकर यांनी मेहतांचा परिचय करून दिला आणि आभार मानले.
यावेळी बोलताना मेहता म्हणाले की, अर्थिक साक्षरता हे मोठे कौशल्य असून त्यात वैयक्तिक पातळीवरील आर्थिक गुंतवणूक,आर्थिक अंदाजपत्रक बनवणे, बचतीचे नियोजन आणि वित्तीय कर्ज असे आर्थिक व्यवहार कौशल्याने करणे अंतभूत आहे. महिलांनी प्रत्येक आर्थिक व्यवहारात दक्ष राहात स्वत:ला अद्ययावत ठेवले पाहिजे. तसेच महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या तर पर्यायाने याचा लाभ देशपातळीवरील अर्थकारणासाठी होऊ शकेल.
मेहता यांनी यावेळी गुंतवणूकीसंबंधी उपयुक्त माहिती सांगितली. आर्थिक व्यवहार करताना महिलांनी या सगळ्यातील आर्थिक सावधगिरी कशी बाळगली पाहिजे याचेही मार्गदर्शन के
ले.


