पुणे,8 एप्रिल 2025 : पालवीया फाऊंडेशन यांच्या तर्फे आणि नुक्कड कॅफे,एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटीडब्ल्यूपीयू),नॅशनल एचआरडी नेटवर्क-पुणे चॅप्टर,विलू पुनावाला फाऊंडेशन,समिक्षा सोशल इनिशिएटिव्ह आणि रायटर्स वेब यांच्या सहकार्याने पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुस्तक महोत्सव 11 आणि 12 एप्रिल 2025 रोजी एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी,कोथरूड येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यंदाच्या पुस्तक महोत्सवाची संकल्पना एक्स्ट्राऑर्डिनरी स्टोरीज (असाधारण कथा) ही असून ज्या व्यक्तींनी विविध आव्हानांवर मात केली आहे,अशांची परिवर्तशील शक्ती कथाकथनेद्वारे सादर केली जाणार आहे.
या महोत्सवामध्ये दृष्टीहीन कवी,दिव्यांग लेखक,तिहार तुरुंगातील कैद्यांच्या कविता सादर होणार आहेत.महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी हेतूपूर्ण लेखन,साहित्याचे महत्त्व आणि कृतीला प्रेरणा देण्यासाठी आकर्षक कथन करण्याची क्षमता याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याप्रसंगी बोलताना पालवीया फाऊंडेशन आणि नुक्कड कॅफेचे संस्थापक वैभव पालीवाल म्हणाले की,साहित्य हे केवळ अभिव्यक्तीचे माध्यम नसून एक प्रकारे उत्क्रांतीचा मार्ग आहे. दृष्टीहीन,दिव्यांग आणि बंदिवासात असलेल्या व्यक्तींसाठी देखील साहित्याच्या माध्यमातून वैचारिक विस्तार झाला असून जीवनात नव-नव्या संधी खुल्या झाल्या आहेत. शब्दांच्या माध्यमातून स्वत:चा शोध घेण्याचा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो.कथांमध्ये जीवन उंचावण्याची आणि अधिक करूणामय समाज निर्माण करण्याची शक्ती असते.
या महोत्सवाचे वैशिष्टय म्हणजे फ्रॉम लेटर्स ॲन्ड डायरीज् या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रख्यात भारतीय टेलिव्हिजन निर्माते आणि सादरकर्ते सिध्दार्थ काक यांच्या लव्ह,एक्झाईल,रेडेमप्शन या नव्या पुस्तकाबाबत संवाद साधणार आहेत. व्हर्सेस बियाँड साईट या कार्यक्रमाद्वारे दृष्टीहीन कवी कवितेद्वारे आपली सर्जनशीलता सादर करणार आहेत. पॉवर ऑफ व्हॉईस कार्यक्रमाद्वारे कवी तेनझीन त्सुन्दुए हे स्टोरी टेलिंग – सामाजिक परिवर्तनाचे साधन यावर संवाद साधणार आहेत.इन सर्च ऑफ मीनिंग मध्ये प्रतिकूल परिस्थितीत दृढ निश्चयामध्ये साहित्याच्या भूमिकेबाबत डॉ.विशाल घुले बोलतील,तर स्टोरीज दॅट हील ॲन्ड इन्स्पायर मध्ये तिहार जेल मधील कैदींनी लिहिलेल्या कवितांबाबत दिव्यांग कथालेखक सादरीकरण क
रतील.


