Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedटीसीएस,अ‍ॅसेंचर आणि इन्‍फोसिस लिंक्‍डइनच्‍या २०२५ टॉप कंपनीज इंडिया लिस्‍टमध्‍ये अव्‍वल तीन स्‍थानांवर

टीसीएस,अ‍ॅसेंचर आणि इन्‍फोसिस लिंक्‍डइनच्‍या २०२५ टॉप कंपनीज इंडिया लिस्‍टमध्‍ये अव्‍वल तीन स्‍थानांवर

भारत, ८ एप्रिल २०२५: लिंक्‍डइन या जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कने आज भारतासाठी २०२५ टॉप कंपनीज लिस्‍टचे अनावरण केले, ज्‍यामधून २५ मोठ्या कंपन्‍या निदर्शनास आणल्‍या आहेत, जेथे प्रोफेशनल्‍स त्‍यांचे करिअर घडवू शकतात. प्‍लॅटफॉर्मवरील लाखो प्रोफेशनल्‍सच्‍या अॅक्टिव्हिटीनुसार ही लिस्‍ट मागणीमध्‍ये असलेली कौशल्‍ये, अव्‍वल लोकेशन्‍स आणि या कंपन्‍यांमधील सर्वात मोठे जॉब फंक्‍शन्‍स याबाबत माहिती देते, ज्‍यामुळे नोकरीसाधकांना त्‍यांची भावी संधी शोधण्‍यास मदत होते.

 

प्रगती करण्‍याची क्षमता, कौशल्‍ये वाढ, बाह्य संधी आणि कंपनीशी जवळीक यांसह लिंक्‍डइनच्‍या आठ आधारस्‍तंभांमधील डेटामधून मिळवलेली टॉप कंपनीज लिस्‍ट उच्‍च स्‍पर्धात्‍मक रोजगार बाजारपेठेत कर्मचाऱ्यांमध्‍ये गुंतवणूक करणाऱ्या आणि आता हायरिंग करणाऱ्या कंपन्‍यांना दाखवते.

 

लिंक्‍डइन करिअर एक्‍स्‍पर्ट आणि भारतातील वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापकीय संस्‍थापिका निरजिता बॅनर्जी म्‍हणाल्‍या, ”या वर्षीच्‍या लिस्‍टमधील सर्वात मोठी माहिती म्‍हणजे कंपन्‍या आज ज्‍या टप्‍प्‍यावर आहेत त्‍यासाठी, तसेच भविष्‍यात ज्‍या टप्‍प्‍यावर असण्‍याची महत्त्वाकांक्षा आहे त्‍यासाठी देखील हायरिंग करत आहेत. टॉप २५ पैकी १९ कंपन्‍या तंत्रज्ञान, फायनान्‍स आणि एंटरप्राइज सॉफ्टवेअर क्षेत्रांमधील आहेत, ज्‍या तंत्रज्ञानदृष्‍ट्या पारंगत प्रोफेशनल्‍सचा शोध घेत आहेत, जे टीम्‍समध्‍ये काम करू शकतात, महत्त्वपूर्ण विचार करू शकतात, त्‍वरित जुळून जाऊ शकतात आणि व्‍यवसायासह विकसित होऊ शकतात. पहिला किंवा भावी रोजगार मिळवू पाहणाऱ्यांसाठी परीक्षा देण्‍याची आणि तुमची क्षमता वाढवण्‍याची हीच योग्‍य वेळ आहे. तुमच्‍या मुलभूत कौशल्‍यांना दृढ करा, हस्‍तांतरणीय कौशल्‍यांचा शोध घ्‍या आणि उद्योगांच्‍या विकसित होण्‍याच्‍या पद्धतींशी जुळून राहा. सतत विकसित होत असलेल्‍या रोजगार बाजारपेठेत करिअर स्थिरता सुपरपॉवर आहे, जी तुम्‍हाला वेगळी ठरवेल.”

 

आणखी एका वर्षासाठी टाटा कन्‍सल्‍टन्‍सी सर्विसेस (टीसीएस)ने अव्‍वल स्‍थान कायम राखले, ज्‍यानंतर अॅसेंचर (#2) आणि इन्‍फोसिस (#3) यांचा क्रमांक होता. कॉग्‍नीझण्‍ट पाचव्‍या क्रमांकावर असण्‍यासह या वर्षीच्‍या लिस्‍टमधून आज भारतात करिअर प्रगत करणाऱ्या संधी देण्‍यामध्‍ये कम्‍प्‍युटर, आयटी आणि सॉफ्टवेर क्षेत्रांचे प्रभुत्‍व दिसून येते. डेव्‍हलपमेंट टूल्‍स, डेटा स्‍टोरेज टेक्‍नॉलॉजीज आणि एंटरप्राइज सॉफ्टवेअरमधील मुलभूत कौशल्‍ये विशेषत: बेंगळुरू, हैदराबाद व चेन्‍नईमध्‍ये त्‍यांच्‍या हायरिंग फोकससाठी महत्त्वाचे आहेत.

 

जवळपास अर्ध्या म्‍हणजेच २५ पैकी १२ कंपन्‍या या वर्षीच्‍या लिस्‍टमध्‍ये नवीन आहेत, ज्‍यामधून भारतातील नोकरीसाधकांसाठी उपलब्‍ध असलेल्‍या संधींमधील मोठा बदल दिसून येतो. फिडेलिटी इन्‍व्‍हेस्‍टमेंट्स (#4) पदार्पण केलेल्‍या कंपन्‍यांमध्‍ये अव्‍वलस्‍थानी आहे, ज्‍यानंतर सर्विसनाऊ (#17) आणि स्‍ट्राइप (#21) यांचा क्रमांक आहे. या वर्षीच्‍या लिस्‍टमध्‍ये फायनान्शियल सर्विसेस् कंपन्‍यांनी सात स्‍थान मिळवले आहेत, ज्‍यामध्‍ये जेपीमॉर्गन चेस (#7), वेल्‍स फार्गो (#15) आणि अमेरिकन एक्‍स्‍प्रेस (#25) यांचा समावेश आहे. या कंपन्‍यांमध्‍ये ज्‍या पदांसाठी हायर केले जाते ती पदे आहेत ऑपरेशन्‍स अॅनालिस्‍ट, फ्रॉड अॅनालिस्‍ट आणि फायनान्शियल अॅनालिस्‍ट, तसेच कॅपिटल मार्केट्स, इन्‍व्‍हेस्‍टमेंट्स बँकिंग व कमर्शियल बँकिंग यांमध्‍ये प्रमुख कौशल्‍ये देखील आवश्‍यक आहेत.

 

ही लिस्‍ट निदर्शनास आणते की, जागतिक तंत्रज्ञान कंपन्‍या भारतात त्‍यांचे फूटप्रिंट विस्‍तारित आहेत. अॅमेझॉन (#8), अल्‍फाबेट (#9) आणि सेल्‍सफोर्स (#12) सॉफ्टवेअर इंजीनिअर, डेटा अॅनालिस्‍ट व अकाऊंट मॅनेजर अशा पदांसाठी हायर करत आहेत. या कंपन्‍यांमध्‍ये आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स, एआय इंजीनिअरिंग आणि मोबाइल अॅप्‍लीकेशन डेव्‍हलपमेंट सर्वात लोकप्रिय कौशल्‍ये आहेत. सिनोप्सिस इन्‍क (#13), कॉन्टिनण्‍टल (#14) आणि आरटीएक्‍स (#20) कम्‍प्‍युटर हार्डवेअर, सिग्‍नल प्रोसेसिंग व इलेक्‍ट्रॉनिक कंट्रोल सिस्‍टम्‍समध्‍ये कौशल्‍ये असलेल्‍या त्‍यांच्‍या डिझाइन इंजीनअिरंग, टेस्‍ट इंजीनिअरिंग आणि क्‍वॉलिटी अशुरन्‍स टीम्‍समध्‍ये गुंतवणूक करत आहेत.

 

टॉप कंपनीशी कनेक्‍ट होण्‍यासोबत तेथील रोजगार संधींची शोध घेण्‍यासंदर्भात निरजिता यांचे मार्गदर्शन:

 

तुमची शोधक्षमता वाढवा: तुमच्‍या लिंक्‍डइन प्रोफाइलचा डिजिटल हँडशेक म्‍हणून विचार करा, कारण त्‍याचा रिक्रूटर्सवर पहिला प्रभाव पडू शकतो. उत्तमरित्‍या डिझाइन केलेले प्रोफाइल तुम्‍हाला वेगळे ठरवू शकते आणि टॉप कंपन्‍यांचे लक्ष वेधून घेण्‍याची शक्‍यता वाढू शकते. याचा वापर करत तुमचा प्रोफेशनल प्रवास प्रामाणिकपणे दाखवा. अधिक भर म्‍हणजे तुमचे हेडलाइन व अबाऊट सेक्‍शन्‍स सुधारण्‍यासाठी लिंक्‍डइनच्‍या एआय-पॉवर्ड प्रीमियम टूल्‍सचा फायदा घ्‍या.

कंपन्‍यांना दाखवून द्या की तुम्‍ही त्‍यांच्‍यामध्‍ये उत्‍सुक आहात: कंपन्‍यांमध्‍ये पदे रिक्‍त नसली तरी त्‍यांच्‍याप्रती रूची व्‍यक्‍त करण्‍यासाठी लिंक्‍डइनच्‍या ‘आय अॅम इंटरेस्‍टेड’ वैशिष्‍ट्याचा वापर करा. यामुळे संभाव्‍य उमेदवारांसाठी शोध घेत असलेल्‍या रिक्रूटर्समध्‍ये तुमची व्हिजिबिलिटी वाढते. लिंक्‍डइन टॉप चॉईस प्रीमियम वैशिष्‍ट्य देखील तुम्‍हाला हायरिंग मॅनेजर्सना कळवण्‍यास मदत करते की तुम्‍ही संधी मिळाल्‍यास त्‍यांच्‍या टीममध्‍ये सामील होण्‍यास उत्‍सुक आहात.

प्रोफेशनलप्रमाणे कंपन्‍यांचे संशोधन करा: कंपनीमध्‍ये अर्ज करण्‍यापूर्वी कंपनीबाबत सविस्‍तर माहिती मिळवा. कंपनीची संस्‍कृती, मूल्‍ये आणि नेतृत्‍वाबाबत माहिती मिळवण्‍यासाठी कंपनीच्‍या लिंक्‍डइन पेजसह सुरूवात करा. प्रमुख कार्यकारींना फॉलो केल्‍याने तुम्‍हाला त्‍यांच्‍यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्‍या बाबींबाबत, तसेच या बाबी तुमच्‍या प्राधान्‍यक्रमांशी जुळतात की नाही याचे मूल्‍यांकन करण्‍याबाबत माहिती मिळू शकते. लिंक्‍डइन प्रीमियम प्रोफेशनल्‍सना व्हिजिबिलिटी वाढवण्‍यासाठी, माहिती मिळवण्‍यासाठी आणि योग्‍य जॉब मॅचेस् शोधण्‍यासाठी विविध वैशिष्‍ट्ये देखील देते.

नेटवर्क. नेटवर्क. नेटवर्क: तुमच्‍या लक्ष्‍य कंपनीमधील विद्यमान व माजी कर्मचाऱ्यांसोबत कनेक्‍शन्‍स तुम्‍हाला माहित नसलेल्‍या संधींचे दरवाजे खुले करू शकतात. त्‍यांच्‍याशी संलग्‍न झाल्‍यास, त्‍यांच्‍या पोस्‍ट्सबाबत कमेंट केल्‍यास किंवा माहितीपूर्ण चॅटबाबत विनंती केल्‍यास तुम्‍हाला बहुमूल्‍य अंतर्गत पैलूबाबत माहिती मिळू शकते. प्रबळ नेटवर्क देखील रिफरल्‍ससह मदत करू शकते. लिंक्‍डइन डेटामधून निदर्शनास येते की, अर्जदारांना त्‍यांच्‍या कनेक्‍शन्‍सच्‍या माध्‍यमातून रोजगार मिळण्‍याची शक्‍यता चार पट आहे.

तुमची कौशल्‍ये दाखवा आणि दृढ करा: एआय रोजगार बाजारपेठेत परिवर्तन घडवून आणत असताना प्रमुख व रिक्रूटर्स प्रामुख्‍याने कौशल्‍यांचे योग्‍य संयोजन असलेल्‍या उमेदवारांवर लक्ष केंद्रित करत आहेत. तुमच्‍या प्रोफाइलमधून तुमची संबंधित कौशल्‍ये आणि टेक्निकल व नॉन-टेक्निकल क्षमता दिसून येण्‍याची खात्री घ्‍या. तुम्‍ही आता विकसित होत असलेल्‍या बाजारपेठेत स्‍पर्धात्‍मक राहण्‍यासाठी लिंक्‍डइन लर्निंग (LinkedIn Learning)वर नवीन कोर्सेस आणि कौशल्‍ये एक्‍स्‍प्‍लोअर करू शकता.

 

२०२५ टॉप लार्ज कंपनीज इंडिया लिस्‍टमध्‍ये प्रवेश मिळवलेल्‍या २५ कंपन्‍या पुढीलप्रमाणे:

 

टाटा कन्‍सल्‍टण्‍सी सर्विसेस्

अॅसेंचर

इन्‍फोसिस

फिडेलिटी इन्‍व्‍हेस्‍टमेंट्स

कॉग्‍नीझण्‍ट

ओरॅकल

जेपीमॉर्गन चेस

अॅमेझॉन

अल्‍फाबेट

द डिपॉझिटरी ट्रस्‍ट अँड क्‍लीअरिंग कॉर्पोरेशन (डीटीसीसी)

कॅपेजेमिनी

सेल्‍सफोर्स

सिनॉप्सिस इन्‍क

कॉन्टिनण्‍टल

वेल्‍स फार्गो

एचसीएल टेक

सर्विसनाऊ

मॉर्गन स्‍टॅण्‍ली

मास्‍टरकार्ड

आरटीएक्‍स

स्‍ट्राइप

अॅटलासियन

एमएससीआय इन्‍क.

एली लिली अँड कंपनी

अमेरिकन एक्‍स्‍प्रेस

 

लिंक्‍डइन न्‍यूज इंडियाद्वारे २०२५ टॉप कंपनी

ज इंडियावरील संपूर्ण लेख येथे (here[1] .) पहा.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments