Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedजुनी वाहने जबाबदार पद्धतीने मोडीत काढणे आवश्यक

जुनी वाहने जबाबदार पद्धतीने मोडीत काढणे आवश्यक

वाहनाचे आयुष्य संपले (एण्ड-ऑफ-लाइफ अर्थात ईएलव्ही) असे कधी समजले जाते आणि अशा वाहनाची जबाबदार पद्धतीने विल्हेवाट कशी लावली जाऊ शकते?

 

एखादे वाहन निश्चित जीवन कालावधी पार करते किंवा ऑटोमेटेड फिटनेस सेंटरमध्ये घेतलेल्या तंदुरुस्ती चाचणीत अपयशी ठरते, तेव्हा ते ईएलव्ही समजले जाते. वाहनाचे, दुरुस्ती होऊ शकणार नाही अशा पद्धतीचे, नुकसान झाल्यासही ते ईएलव्ही म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते. अशा वाहनाची जबाबदार पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी वाहनमालक ईएलव्ही वाहन मोडीत काढणाऱ्या अधिकृत नोंदणीकृत आस्थापनेत (रजिस्टर्ड व्हेइकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी अर्थात आरव्हीएसएफ) ते नेऊ शकतात. उदाहरणार्थ टाटा मोटर्स आरई. डब्ल्यूआय. आरई- अर्थात रिवायर- रिसायकल विथ रिस्पेक्ट (आदरपूर्वक रिसायकल). अशा आस्थापनांमध्ये वाहनाचे सर्व भाग सुरक्षितपणे सुटे करण्यासाठी पर्यावरणपूरक प्रक्रियांचे पालन केले जाते आणि हे करताना त्यातील मौल्यवान ऐवज जतन केला जातो. वाहनाच्या जबाबदार रिसायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला बढावा देण्यासाठी वाहन उद्योगातर्फे भारतभरात आरव्हीएसएफचे नेटवर्क विस्तारले जात आहे.

 

२. जुने वाहन मोडीत काढण्यातून ग्राहकाला कोणते लाभ मिळतात?

 

जुने वाहन मोडीत काढण्याचे अनेक लाभ आहेत. ग्राहकाला त्याच्या वाहनाचे चांगले मूल्य मिळते- साधारणपणे वाहनाच्या एक्स-शोरूम किमतीच्या ४ ते ६ टक्के रक्कम ग्राहकाला या प्रक्रियेतून मिळते. याशिवाय, अनेक राज्य सरकारे हे करणाऱ्या ग्राहकांना सवलती देऊ करतात, यामध्ये मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना मार्ग करात (रोड टॅक्स) १५ टक्के सवलत दिली जाते, तर मालवाहतूक न करणाऱ्या (नॉन-ट्रान्सपोर्ट) वाहनांना २५ टक्के सवलत दिली जाते. त्याचबरोबर नोंदणी मोफत केली जाते. जुने वाहन जमा केल्याचे प्रमाणपत्र अर्थात सीओडी सादर केल्यास वाहन उत्पादक नवीन वाहनाच्या खरेदी किमतीत ३ टक्क्यांपर्यंत सवलत देतात. सर्व मिळून हे लाभ नवीन वाहनाच्या किमतीच्या ८ ते १० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतात. म्हणूनच जुने वाहन मोडीत काढणे हा आकर्षक आर्थिक निर्णय ठरू शकतो.

 

ही प्रक्रिया सुलभ आहे, कारण अधिकृत आरव्हीएसएफ सर्व कागदपत्रांचे आणि नोंदणी रद्द करण्याचे काम बघतात, सर्व नियमांचे पालन केले जाईल याची काळजी घेतात. वाहन मोडीत काढल्यामुळे रस्त्यावरील जुनी, प्रदूषणकारक वाहने कमी होऊन पर्यावरणाच्या संवर्धनातही मदत होते आणि रिसायकलिंगमध्ये स्टील, अॅल्युमिनिअम, तांबे यांसारखे मौल्यवान साहित्य जतन केले जाते.

 

३. ग्राहक टाटा मोटर्स रिवायरसारख्या (आरई.डब्ल्यूआय.आरई) आस्थापनेत त्याचे वाहन मोडीत कशा पद्धतीने काढू शकतो?

 

टाटा मोटर्सच्या रिवायरमध्ये वाहन मोडीत काढण्याची प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक आहे. ग्राहक कोणत्याही ब्रॅण्डची व्यावसायिक किंवा खासगी वाहने येथे मोडीत काढू शकतात. टाटा मोटर्सचे आरव्हीएसएफ पुण्याजवळ चाकण येथे आहे. वाहन मोडीत काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी ग्राहक रिवायरच्या (आरई.डब्ल्यूआय.आरई) वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करू शकतात, १८०० २०९ ७९७९ या आमच्या टोल-फ्री क्रमांद्वारे आमच्याशी संपर्क साधू शकतात किंवा जवळच्या अधिकृत टाटा मोटर्स डीलरशिपला भेट देऊ शकतात. ग्राहकाच्या घरी जाऊन वाहनाची तपासणी केली जाते आणि स्थितीनुसार वाहनाचे मूल्य निश्चित केले जाते. नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया आस्थापनेतर्फे पूर्ण केली जाते, सीओडी तयार केले जाते, वाहन कोणतेही शुल्क न घेता उचलले जाते आणि पैसे ऑनलाइन पद्धतीने ग्राहकाला चुकते केले जातात. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर वाहनाचे भाग जबाबदार पद्धतीने सुटे केले जातात.

 

 

 

४. एखादे वाहन ‘रिवायर’मध्ये जबाबदार पद्धतीने मोडीत कसे काढले जाते?

 

रिवायरमध्ये सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रक्रियांचा वापर करून ईएलव्ही मोडीत काढली जातात. या आस्थापनेत आधुनिक उपकरणे आहेत तसेच वाहन मोडीत काढण्याच्या धोरणाचे पालन करणाऱ्या नियमित प्रक्रियांचे पालन केले जाते. सर्वप्रथम, वाहनाची तपासणी केली जाते आणि त्यातील वापरण्याजोगे भाग कोणते ते निश्चित केले जाते. इंधन, तेल आणि कूलण्ट यांसारखे हानिकारक ठरू शकतील असे द्रवपदार्थ पर्यावरणाला कोणताही धोका पोहाचणार नाही याची काळजी घेऊन काढून टाकले जातात. प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांचे भाग सुटे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. टाटा मोटर्समध्ये वाहनाचे भाग सुटे करण्याच्या जागतिक दर्जाच्या प्रक्रियेचे पालन केले जाते. ही प्रक्रिया पर्यावरणपूरकही आहे आणि प्रत्येक पायरीवर वाहनातून जास्तीत-जास्त मूल्य प्राप्त करण्याचा प्रयत्न यात केला जातो.

 

५. जबाबदारीने वाहने मोडीत काढण्याचा समाजाला व्यापक लाभ कसा होतो?

 

जबाबदार पद्धतीने वाहनाची विल्हेवाट लावणे पर्यावरणाच्या आणि आर्थिक अशा दोन्ही दृष्टींनी फायद्याचे आहे. जुनी, अति उत्सर्जन करणारी वाहने रस्त्यावरून दूर झाल्यास हवेचे प्रदूषण कमी होण्यात मदत होते, त्यामुळे शहरांमधील हवा स्वच्छ होते आणि राहण्याची स्थिती निरोगी होते. मोडीत काढलेल्या वाहनांमधील साहित्याचे रिसायकलिंग केल्यामुळे स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन उत्पादन आदी उद्योगक्षेत्रांची कच्च्या मालाची गरज काही प्रमाणात भागवली जाते, त्यामुळे नैसर्गिक संसाधने जपली जातात. संघटित स्क्रॅपेज फॅसिलिटीजमध्ये (वाहने मोडीत काढण्याचे कारखाने) रोजगार निर्माण होतात, आर्थिक वाढीला आधार मिळतो आणि शाश्वत वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला हातभार लागतो. जबाबदाररित्या वाहने मोडीत काढून आपण अधिक स्वच्छ, अधिक सुरक्षित व अधिक संसाधन-कार्यक्षम भवितव्यासाठी

योगदान देऊ शकतो.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments