Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorized46 वर्षीय मेंदूमृत कॅब चालकाच्या अवयवदानामुळे सहा जणांना नवजीवन * हृदय,यकृत,मुत्रपिंड आणि...

46 वर्षीय मेंदूमृत कॅब चालकाच्या अवयवदानामुळे सहा जणांना नवजीवन * हृदय,यकृत,मुत्रपिंड आणि नेत्रदान

पुणे,10 एप्रिल 2025 : केईएम हॉस्पिटल पुणे येथे मेंदूमृत घोषित झालेल्या 46 वर्षीय कॅब चालकाच्या अवयवदानामुळे सहा जणांना नवजीवन मिळाले. त्यांना केईएम हॉस्पिटल मधील अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ.प्रदीप डिकोस्टा यांच्या देखरेखी खाली दाखल करण्यात आले होते.

 

मेंदूमृत रुग्णाचे हृदय मुंबईच्या एका रूग्णालयात पाठविण्यात आले. एक मुत्रपिंड केईएम हॉस्पिटल पुणे येथे प्रत्यारोपित करण्यात आले तर,दुसरे मुत्रपिंड,यकृत आणि कॉर्निआ पुण्यातील इतर रूग्णालयात पाठविण्यात आले.

 

केईएम हॉस्पिटल पुणे येथील अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ.प्रदीप डिकोस्टा म्हणाले की, या 46 वर्षीय रूग्णाला मोठ्या प्रमाणावर मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता व 2 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.

 

8 एप्रिलला सायंकाळी त्यांना मेंदू मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर 9 एप्रिलला त्यांचे अवयव काढून ग्रीन कॉरिडॉर मार्फत इतर रूग्णालयांना पाठविण्यात आले. केईएम हॉस्पिटलमध्ये एक मुत्रपिंड ल्युपस नेफ्रायटिस या आजाराने ग्रस्त असलेल्या 40 वर्षीय महिला सॉफ्टवेअर व्यावसायिकावर प्रत्यारोपित करण्यात आले.

 

शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या टीममध्ये शल्यचिकित्सक डॉ.भरत कळंबे,अँड्रोलॉजिस्ट डॉ.योगेश सोवनी,व्हॅस्क्युलर सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ.शार्दूल दाते, मुत्ररोगतज्ञ डॉ.शम्स इक्बाल,मुत्रपिंड विकार तज्ञ डॉ.व्हॅलेंटाईन लोबो,वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी सहस्त्रबुध्दे,प्रत्यारोपण समन्वयक मनोज गाडेकर आणि जस्मित अरोरा यांच्यासह केईएम हॉस्पिटलच्या सहाय्यक प्रशासक डॉ.पूनम देशमुख आणि नर्सिंग टीम यांचा समावेश होता.

 

केईएम हॉस्पिटलचे मुख्य कामकाज अधिकारी डॉ.राकेश शहा म्हणाले की,अवयवदान हे महान कार्य असून त्याला संमती देणाऱ्या नातेवाईकांना आमचा सलाम.याशिवाय समन्वयनासाठी झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन कमिटी आणि अवयव दुसऱ्या रूग्णालयांमध्ये घेऊन जाण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करणाऱ्या वाहतूक पोलिसांचे आम्ही आभार

मानतो.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments