पिंपरी, दि. १८ एप्रिल २०२५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर बंधुंच्या पुतळ्यास सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे आणि विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, सहाय्यक सुरक्षा अधिकारी बापूसाहेब निम्हण, उद्यान निरीक्षक कांबळे, दिनेश जांभळे तसेच महापालिका कर्मचारी उपस्थित होते.


