Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्‍कोडा ऑटो इंडियाकडून कायलॅकच्‍या यशस्‍वी लाँचनंतर श्रेणीमधील अव्‍वल ऑल-न्‍यू स्‍कोडा कोडियक लाँच...

स्‍कोडा ऑटो इंडियाकडून कायलॅकच्‍या यशस्‍वी लाँचनंतर श्रेणीमधील अव्‍वल ऑल-न्‍यू स्‍कोडा कोडियक लाँच सेकंड-जनरेशन ४x४ एसयूव्‍ही त्‍याच आकारमानामधील लक्‍झरी व स्‍पोर्टीनेससह भारतात दाखल

बुकिंग्‍जना आजपासून सुरूवात, तसेच ग्राहक डिलिव्‍हरीजना २ मेपासून सुरूवात होईल

 

· शहरातील रस्‍ते आणि विविध ऑल-टेरेन क्षमतांसाठी अल्टिमेट लक्‍झरी व हाताळणी

 

· आकर्षक किंमत ₹ 46 89 000 रूपयांपासून सुरू होते आणि परिभ‍ाषित करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे

 

 

 

 

 

मुंबई, १७ एप्रिल २०२५ – स्‍कोडा कायलॅक श्रेणीच्‍या यशस्‍वी लाँचनंतर स्‍कोडा ऑटो इंडिया आता त्‍यांची लक्‍झरी ४x४ एसयूव्‍ही कोडियकच्‍या ऑल-न्‍यू जनरेशनच्‍या लाँचसह स्‍पेक्‍ट्रकच्‍या दुसऱ्या बाजूस नवीन कारची घोषणा करत आहे. भारतात व जगभरात सेकंड जनरेशन असलेली नवीन कोडियक लक्‍झरी, सुधारणा, ऑफ-रोड क्षमता, ऑन-रोड गतीशीलता आणि सात-आसनी विविधतेच्‍या सिग्‍नेचर संयोजनासह भारतामध्‍ये लाँच करण्‍यात आली आहे.

 

 

 

स्‍कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पीटर जनेबा म्‍हणाले, ”मार्चमध्‍ये आम्‍ही भारतात आतापर्यंतच्‍या सर्वाधिक मासिक विक्रीची नोंद केली, ज्‍याला कायलॅक लाँचमुळे गती मिळाली आणि कुशक व स्‍लाव्हियाचा पाठिंबा मिळाला. हे आम्‍ही या वर्षात स्‍थापित करण्‍याचा मनसुबा ठेवलेल्‍या अनेक नवीन रेकॉर्ड्सपैकी एक आहे. आमच्‍या उत्‍पादन ऑफेन्सिव्‍ह धोरणाशी बांधील राहत ऑल-न्‍यू कोडियकच्‍या लाँचमधून स्‍कोडाची लक्‍झरी व तंत्रज्ञान क्षमतेसह आमच्‍या उत्‍पादन स्‍पेक्‍ट्रमची दुसरी बाजू दिसून येते. कोडियक आता ऑक्टिव्हिया व सुपर्ब प्रमाणे आमच्‍यासाठी महत्त्वपूर्ण वारसा बनली आहे. कोडियक शहरातील रस्‍त्‍यांवर ड्रायव्हिंगसाठी अल्टिमेट लक्‍झरी व हाताळणी देते, तसेच या वेईकलमध्‍ये विविध ऑल-टेरेन क्षमता देखील आहेत.”

 

 

 

स्‍कोडा ऑटोची प्रीमियर ४x४ मध्‍ये २.० टीएसआय इंजिनची शक्‍ती आहे, जे १५० केडब्‍ल्‍यू शक्‍ती आणि ३२० एनएम टॉर्कची निर्मिती करते. ही शक्‍ती व टॉर्क सेव्‍हन-स्‍पीड ड्युअल क्‍लच डीएसजी ऑटोमॅटिकच्‍या माध्‍यमातून दोन्‍ही अॅक्‍सल्‍समध्‍ये वितरित केले जाते. ही वेईकल एमक्‍यूबी३७ ईव्‍हो प्‍लॅटफॉर्मवर आधारित आहे आणि स्‍पोर्टलाइन व सिलेकशन एलअँडके व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध आहे, जेथे दोन्‍ही व्‍हेरिएण्‍ट्स सात आसनी आहेत. भारतात छत्रपती संभाजी नगर येथील ब्रँडच्‍या प्‍लांटमध्‍ये असेम्‍ब‍ल करण्‍यात आलेल्‍या कोडियकला एआरएआयकडून १४.८६ किमी/लिटर इंधन कार्यक्षमता देण्‍यासाठी प्रमाणित करण्‍यात आले आहे.

 

 

 

 

 

कोडियकची ऑल-न्‍यू जनरेशन तिच्‍या पूर्वीच्‍या जनरेशनच्‍या तुलनेत ५९ मिमी लांब आहे. या वेईकलची लांबी ४,७५८ मिमी आणि उंची १,६७९ मिमी आहे. तसेच ही वेईकल १,८६४ मिमी रूंद असून व्‍हीलबेल २,७९१ मिमी आहे. पूर्णत: लॅडेन ऑल-न्‍यू कोडियकमध्‍ये १५५ मिमी ग्राऊंड क्‍लीअरन्‍स आहे. पूर्वीप्रमाणे तीन रांगा असलेली लक्‍झरी ४x४ तिच्‍या वैविध्‍यपूर्ण इंटीरिअरमध्‍ये सामानासाठी व्‍यापक स्‍पेस देते. तिन्‍ही सीट्सच्‍या खाली कोडियक २८१ लिटर लगेज स्‍पेस देते, तसेच तिसऱ्या रांगेतील सीट फोल्‍ड केल्‍यास ही लक्‍झरी एसयूव्‍ही ७८६ लिटर लगेज स्‍पेस देते आणि मागील दोन्‍ही रांगा खाली केल्‍यास कोडियक १,९७६ लिटरची व्‍यापक लगेज क्षमता देते.

 

 

 

नवीन स्कोडा कोडियाक दोन वेगळ्या थीमसह परिभाषित केलेल्या लक्झरीची परंपरा पुढे चालू ठेवते, स्पोर्टलाइन व्हेरिएंटसाठी पूर्णपणे काळ्या रंगाची स्पोर्टी डेकोर आणि सिलेक्शन एल अँड के ट्रिममध्ये प्रीमियम कॉग्नाक लेदर अपहोल्स्ट्री. केबिनमधील तंत्रज्ञान आणि आराम वाढवत, या वाहनात आता ३२.७७ सेमी इन्फोटेनमेंट सिस्टम, तसेच टॅक्टाइल रोटरी नॉब्स आणि स्क्रीनसह सुसज्ज मल्टी-फंक्शन स्मार्ट डायल आहेत, जे HAVC, सीट व्हेंटिलेशन, ऑडिओ सेटिंग्ज आणि ड्राइव्ह मोड्सचे सहज नियंत्रण करण्यास सक्षम करतात. एर्गोनॉमिक सुधारणांमध्ये सुधारित सुलभतेसाठी स्टीअरिंग व्हीलच्या मागे नवीन स्थित गियर-सिलेक्टर आणि रिअल-सीट प्रवाशांसाठी टॅबलेट होल्डर समाविष्ट आहे, जे प्रवाशांना अधिक सुविधा प्रदान करते.

 

 

 

AI-generated content may be incorrect.एर्गो फ्रंट सीट्समुळे लक्झरी स्टँडर्ड आणखी वाढला आहे, जे प्रगत न्यूमॅटिक मसाज फंक्शन देतात, उत्कृष्ट आराम आणि पाठीचा कणा आधार देतात. समाविष्ट केलेल्या अकॉस्टिक पॅकेजसह अकॉस्टिक फ्रंट-साइड विंडो बाहेरील आवाज कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे एक निसर्गरम्य आणि प्रीमियम ड्रायव्हिंग अनुभव निर्माण होतो. ९ एअरबॅग्‍ज, स्‍लाइडिंग पॅनोरॅमिक सनरूफ आणि सर्वोत्तम ऑडिओ अनुभवासाठी ७२५ वॅट कॅन्‍टॉन साऊंड सिस्‍टमसोबत १३ स्‍पीकर्स व सब-वूफर यासह सुरक्षितता व आरामदायीपणाला प्राधान्‍य देण्‍यात आले आहे. तसेच, रिअर विंडोजमधील रोलिंग सबब्‍लाइण्‍ड्स गोपनीयता आणि प्रवासी आरामदायीपणामध्‍ये अधिक वाढ करतात.

 

AI-generated content may be incorrect.स्‍कोडा कोडियक तिची ऑल-न्‍यू डिझाइन आणि प्रीमियम स्‍टायलिंग एलीमेंट्ससाठी ओळखली जाते. एलईडी बीम क्रिस्‍टालिनियम हेडलॅम्‍प्‍समध्‍ये आता वेलकम इफेक्‍ट आहे, जे या लक्‍झरी ४x४ ला अनलॉक केल्‍यानंतर अत्‍याधुनिकतेची भर करतात. सिलेक्‍शन एलअँडके ट्रिम डार्क क्रोम अॅसेंट्सच्‍या माध्‍यमातून अधिक आकर्षक दिसते, तर स्‍पोर्टलाइन व्‍हेरिएण्‍ट ग्‍लॉसी ब्‍लॅक हायलाइट्समधून स्‍पोर्टीयर परसोना दाखवते. रस्‍त्‍यावरील लक्षवेधकतेमध्‍ये वाढ करत कोडियकमध्‍ये फ्रण्‍ट ग्रिलसह इंटीग्रेटेड होरिझोण्‍टल लाइट स्ट्रिप आहे, जे आकर्षक व्हिज्‍युअल ओळख निर्माण करतात, तर टेललॅम्‍सशी कनेक्‍ट केलेले रेड स्ट्रिप एसयूव्‍हीच्‍या रूंदीला साजेसे आहे, ज्‍यामधून रस्‍त्‍यावर वेईकलची विशिष्‍ट आणि लक्ष

वेधक उपस्थिती दिसून येते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments