Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिफ्टीच्या टॉप 100 कंपन्यांमध्ये वेदांता सर्वाधिक शेयरहोल्डर रिटर्न देणारी कंपनी

निफ्टीच्या टॉप 100 कंपन्यांमध्ये वेदांता सर्वाधिक शेयरहोल्डर रिटर्न देणारी कंपनी

आर्थिक वर्ष 25 मध्ये निफ्टी 50 आणि निफ्टी नेक्स्ट 50 कंपन्यांमध्ये वेदांताने सर्वाधिक 87% शेयरहोल्डर रिटर्न दिला आहे.

 

· मजबूत बॅलन्स शीट, प्रमुख विभागांमध्ये नेतृत्व, ऑपरेशनल उत्कृष्टता आणि प्रस्तावित डिमर्जर ही कारणे आहेत.

 

नैसर्गिक साधनसंपत्तीतील दिग्गज कंपनी असलेल्या वेदांता लिमिटेडने 2025 च्या आर्थिक वर्षात एकूण 87% शेअरहोल्डर रिटर्न (TSR) दिले, ज्यामुळे शेअर होल्डर्सना लक्षणीय फायदा झाला. निफ्टी 50 आणि निफ्टी नेक्स्ट 50 कंपन्यांमध्ये हे सर्वाधिक आहे. टॉप पाच TSR कंपन्यांमध्ये फार्मा क्षेत्रातील प्रमुख कंपनी दिवि लॅबोरेटरीज 69%, बजाज होल्डिंग्ज 52%, भारत इलेक्ट्रॉनिक्स 51% आणि इंटरग्लोब एव्हिएशन 44% यांचा समावेश आहे.

 

 

 

TSR म्हणजे स्टॉकच्या किमतीतील एकूण बदल आणि ठरावीक कालावधीत मिळालेला कोणताही लाभांश, सुरुवातीच्या स्टॉकच्या किमतीने भागून काढलेली संख्या.

 

 

 

आर्थिक वर्ष 25 मध्ये वेदांताच्या शेअर्समध्ये जवळपास 70% वाढ झाली आणि त्यातून 11.8% लाभांश उत्पन्नही मिळाले. कंपनीचा 87% टीएसआर हा तिच्या क्षेत्रातील कंपन्यांपेक्षा जास्त आहे, ज्यात जेएसडब्ल्यू 29%, हिंडाल्को 22%, टाटा स्टील 1% आणि जिंदाल स्टील 8% यांचा समावेश आहे.

 

 

 

वेदांताच्या TSR मध्ये योगदान देणाऱ्या प्रमुख घटकांमध्ये मजबूत बॅलन्स शीट, प्रमुख उत्पादनांमधील कंपनीची आघाडी, उत्पादन खर्च कार्यक्षमता आणि महत्त्वाच्या खनिजांची वाढती मागणी यांचा समावेश आहे. वेदांताच्या सध्या सुरू असलेल्या विलगीकरणाचाही शेअरच्या वाढीला हातभार लागला. वेदांताच्या भागधारकांकडून आणि कर्जदारांकडून 99%+ मान्यता मिळाल्यामुळे हे विलगीकरण संस्थात्मक गुंतवणूकदारांना भारताच्या आर्थिक विकासाशी जुळणाऱ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.

 

 

 

वेदांता ने आर्थिक वर्ष 26 साठी मोठ्या विस्तार योजना आखल्या आहेत. कंपनीला अपेक्षा आहे की, त्यांच्या चालू विस्तार प्रकल्पांमुळे काही व्यवसायांना जागतिक खर्चाच्या उच्चांकापर्यंत पोहोचण्यास आणि उत्पादन वाढण्यास मदत होईल. कंपनीने अलीकडच्या मुलाखतीत जोर दिला की, ती तिची ऍल्युमिनिअम क्षमता लक्षणीयरीत्या वाढवत आहे आणि तिच्या ग्रीन ऍल्युमिनिअम उत्पादन सुविधेसाठी स्थान निश्चित करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे, जे कंपनीच्या मते, जगातील पहिले पूर्णपणे ग्रीन ऍल्युमिनिअम प्लांट असेल.

 

 

 

वेदांता इतर युनिट्समध्येही मोठ्या प्रमाणात क्षमता विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. त्यांचे बाल्को स्मेल्टर विस्तार प्रगत टप्प्यात आहे आणि ते आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीत सुरू करण्याचे लक्ष्य आहे. कंपनीच्या झिंक इंडिया युनिटने देबारी येथे वार्षिक 160,000 टन रोस्टर आणि वार्षिक 510,000 टन खत प्रकल्पाची योजना आखली आहे, ज्याचे अंतिम कार्यान्वित करण्याचे लक्ष्य आर्थिक वर्ष 2026 च्या चौथ्या तिमाहीत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्याचप्रमाणे, वेदांताच्या झिंक इंटरनॅशनल युनिटचा फेज-2 विस्तार प्रकल्प आर्थिक वर्ष 2026 मध्ये सुरू करण्याचे लक्ष्य ठेवत आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments