पुणे,22 एप्रिल 2025 : द पुणे ऑब्स्टेट्रिक्स ॲन्ड गायनेकोलॉजी सोसायटी (पीओजीएस) च्या 2025-26 या कालावधीसाठी नवीन कार्यकरिणी जाहीर झाली असून नुकत्याच झालेल्या कोड रेड परिषदेत पदग्रहण समारंभ संपन्न झाला.नवीन कार्यकारिणीमध्ये डॉ.मनीष माचवे यांनी अध्यक्षपदाचा तर डॉ.निलेश बलकवडे यांनी सरसचिव पदाचा पदभार स्विकारला.या समितीमध्ये उपाध्यक्ष म्हणून डॉ.वैशाली चव्हाण, कार्यकारी उपाध्यक्ष डॉ.वैशाली कोरडे,वैद्यकीय सचिव डॉ.कल्याणी इंगळे आणि खजिनदार डॉ.समिधा दळवी यांचा समावेश आहे.
पदग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे व फॉग्सीच्या अध्यक्षा डॉ.सुनिता तांदूळवाडकर,विशेष अतिथी व प्रख्यात अभिनेते व दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी यांसह आयसीओजीचे अध्यक्ष डॉ.पराग बिनीवाले,एएमओजीएस चे अध्यक्ष डॉ.किरण कुर्तकोटी हे उपस्थित होते.
पदग्रहण समारंभाबरोबरच पीओजीएस तर्फे वैद्यकीय क्षेत्रात प्रतिष्ठित मानली जाणारी कोड रेड ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या तीन दिवसीय परिषदेमध्ये स्त्रीरोग क्षेत्रातील रक्तस्त्राव आणि रक्तविकारांवर शैक्षणिक सत्रे आयोजित करण्यात आली.या परिषदेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ समाविष्ट असलेली चर्चासत्रे,व्याख्याने,सादरीकरण यांचा समावेश होता.
पीओजीएस मोबाईल ॲपचे अनावरण हे या कार्यक्रमातील ठळक वैशिष्टय होते. सदस्यांमधील परस्पर संवाद अधिक सुधारण्याच्या दृष्टीने याची रचना केली गेली आहे. याशिवाय वैद्यकीय समुदायातील संशोधन आणि वैद्यकीय अंर्तदृष्टी दर्शविणाऱ्या पीओजीएस जर्नलच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्या
त आले.


