Thursday, August 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedIIT बॉम्बे आणि इंडस टॉवर्स लिमिटेड हे शाश्वत ऊर्जा तंत्रज्ञानात नावीन्य आणण्यासाठी...

IIT बॉम्बे आणि इंडस टॉवर्स लिमिटेड हे शाश्वत ऊर्जा तंत्रज्ञानात नावीन्य आणण्यासाठी एकत्रित येत आहेत

मुंबई, २२ एप्रिल २०२५: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बे (IIT-B) आणि जगातील सर्वात मोठ्या दूरसंचार सुविधा कंपन्यांपैकी एक असलेल्या इंडस टॉवर्स लिमिटेडने आज शाश्वत ऊर्जेतील दोन परिवर्तनकारी संशोधन उपक्रमांसाठी एका करारावर स्वाक्षरी केली. हे संशोधन प्रामुख्याने सौर ऊर्जा निर्मिती आणि ऊर्जा साठवणूक यांमध्ये प्रगती करण्यावर केंद्रित असेल, ज्याचा उद्देश दूरदृष्टीचे आणि व्यवहार्य उपाय तयार करणे आहे. हा उपक्रम इंडस टॉवर्सच्या ‘प्रगती’ या प्रमुख कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) कार्यक्रमाचा भाग आहे.

 

ज्या काळात हवामान बदल आणि ऊर्जेची मागणी हे जगाचे प्राधान्यक्रम बदलत आहेत आणि जग स्वच्छ, स्मार्ट व हरित ऊर्जा प्रणालीकडे वेगाने वाटचाल करत आहे, अशा परिस्थितीत नावीन्य हा केवळ पर्याय राहिलेला नाही—ती आता गरज आहे. उज्ज्वल भविष्यासाठी उपाययोजना करण्याच्या महत्त्वाबद्दल बोलताना इंडस टॉवर्सचे एमडी आणि सीईओ प्रचुर साह म्हणाले, “हे भागीदारी उद्योग आणि शिक्षण क्षेत्राने एकत्र येऊन संशोधन आणि नावीन्याच्या माध्यमातून वास्तविक जगातील आव्हानांना सामोरे जाण्याचे एक मोठे उदाहरण आहे. पेरोव्हस्काईट सौर सेल तंत्रज्ञान आणि ऊर्जा साठवणुकीसाठी कृषी कचऱ्याचा वापर यावरचे संशोधन एक उत्साहवर्धक संकल्पना आहे आणि शाश्वत ऊर्जा उपायांना पुढे नेण्यात हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरू शकते. आम्हाला विश्वास आहे की या संशोधनात स्वच्छ ऊर्जेच्या दृष्टिकोनात क्रांती घडवण्याची क्षमता आहे.”

 

पेरोव्हस्काईट सौर सेल तंत्रज्ञान विकसित करण्याच्या या महत्त्वपूर्ण प्रयत्नांचा उद्देश पारंपरिक सिलिकॉन फोटोव्होल्टेइक (PV) सेलच्या मर्यादा ओलांडणे आहे. हे प्रगत तंत्रज्ञान सध्याच्या सेलच्या खर्चात वाढ न करता उच्च कार्यक्षमतेचे उद्दिष्ट ठेवते. संपूर्णपणे स्वदेशी प्रयत्नांतून विकसित केलेले हे तंत्रज्ञान भूभागावरील आणि अंतराळातील सौर ऊर्जा प्रणालींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाऊ शकते.

 

या सहकार्यातील दुसरा उपक्रम आणखी एका महत्त्वपूर्ण टिकाऊपणाच्या आव्हानावर भाषी करतो—कृषी कचरा आणि ऊर्जा साठवणूक. या प्रकल्पाचा उद्देश भाताच्या पेंढ्याचे, जे एक विपुल प्रमाणात उपलब्ध असलेले कृषी कचरा आहे, त्याचे डोप्ड हार्ड कार्बन पदार्थांमध्ये रूपांतर करण्याची एक स्केलेबल पद्धत विकसित करणे आहे. हे पदार्थ सोडियम-आयन बॅटरीमध्ये एनोड किंवा ॲडिटिव्ह म्हणून काम करतील, जे लिथियम-आयन तंत्रज्ञानाला एक टिकाऊ आणि किफायतशीर पर्याय देऊ शकेल. हे संशोधन केवळ शेतातील कचरा जाळल्याने होणारे पर्यावरणीय धोके कमी करत नाही, तर स्वदेशी आणि पर्यावरणपूरक संसाधनांचा वापर करून देशातील स्वच्छ ऊर्जा परिसंस्थेला अधिक मजबूत करते.

 

या भागीदारीच्या व्यापक दृष्टिकोनावर भाष्य करताना, आयआयटी बॉम्बेचे प्रा. रवींद्र गुडी, (डीन, माजी विद्यार्थी आणि कॉर्पोरेट संबंध) म्हणाले, “आयआयटी बॉम्बे येथे, आमचा विश्वास आहे की वैज्ञानिक उत्कृष्टतेला उद्देशाची जोड असणे आवश्यक आहे. यासारखे सहकार्य केवळ संशोधनाच्या कक्षा रुंदावत नाही, तर शिक्षण आणि उद्योग हे आपल्या काळातील काही गंभीर समस्या सोडवण्यासाठी कसे एकत्र काम करू शकतात हे देखील दर्शवते. ऊर्जा टिकाऊपणाच्या दिशेने भारताच्या वाटचालीस गती देण्याची क्षमता असलेल्या नवकल्पनांना पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही इंडस टॉवर्स लिमिटेडचे आभारी आहोत.”

 

ही भागीदारी उच्च-प्रभाव आणि ध्येय-आधारित संशोधनासाठी राष्ट्रीय केंद्र म्हणून आयआयटी बॉम्बेची असलेली भूमिका अधोरेखित करते. इंडस टॉवर्ससोबतच्या अर्थपूर्ण सहकार्याच्या माध्यमातून, संस्था वैज्ञानिक कल्पनांना स्केलेबल, वास्तविक-जगातील उपायांमध्ये रूपांतरित

करणे सुरू

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments