पुणे,23 एप्रिल 2025 : ह्युंडाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) तर्फे ह्युंडाई स्मार्ट केअर क्लिनिक हा राष्ट्रीय पातळीवरचा कस्टमर कनेक्ट प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे.ही मोहिम 25 एप्रिल ते 6 मे 2025 दरम्यान भारतातील सर्व ह्युंडाई सर्व्हिस सेंटर्समध्ये सुरू राहील.
ह्युंडाई स्मार्ट केअर क्लिनिक मुळे ग्राहकांना विविध फायदे मिळतील,ज्यामध्ये इंजिन,ब्रेक व इलेक्ट्रिकल सिस्टिम,सस्पेंशन इत्यादी समाविष्ट असलेले मोफत 70 पॉईंट चेकअप असतील.त्याशिवाय विस्तारित वॉरंटीवर 30 टक्के लाभ,नियतकालिक देखभाल,चालू दुरूस्ती,व्हील अलाईमेंट व बॅलेन्सिंगवर (मेकॅनिकल लेबर) 15 टक्के लाभ, कॉम्प्रेसर कंडेंसर सारख्या मेकॅनिकल व एसी पार्टस तसेच रोडसाईड असिस्टंस पॉलसीमध्ये 10 टक्के लाभ,एसी गॅस,एसी डिसइंफेक्टंटस समाविष्ट असलेले एसी सर्व्हिस असे अनेक प्रकारचे लाभ समाविष्ट आहेत.


