Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedकॅन्डेरेचे संस्थापक रुपेश जैन यांनी हिऱ्याच्या आभूषणांचा ब्रॅंड 'लुसिरा' लॉन्च केला

कॅन्डेरेचे संस्थापक रुपेश जैन यांनी हिऱ्याच्या आभूषणांचा ब्रॅंड ‘लुसिरा’ लॉन्च केला

मुंबई, २५ एप्रिल २०२५: डिजिटल ज्वेलरी मधील अग्रणी रूपेश जैन आता लुसिरा या नवीन धाडसी उद्यामासह पुन्हा एकदा प्रकाशझोतात येत आहेत. रूपेश जैन तेच आहेत, ज्यांनी कॅन्डेरेला भारतातील एक अत्यंत यशस्वी ऑनलाइन फाइन ज्वेलरी प्लॅटफॉर्म बनवला होता, जो नंतर कल्याण ज्वेलर्स द्वारा संपादित करण्यात आला. लुसिरा एक आधुनिक, लॅबमध्ये विकसित हीऱ्यांच्या आभूषणांचा ब्रॅंड आहे, जो आजच्या युगाच्या जागरूक आणि डिझाईनला प्राधान्य देणाऱ्या उपभोक्त्यांसाठी बनला आहे आणि फाइन ज्वेलरीच्या बाबतीत लोकांचा ज्या प्रकारे सहभाग असतो, त्यात बदल करण्याचा त्यांचा उद्देश आहे.

 

लुसिराचे संस्थापक रूपेश जैन म्हणाले, “आमचे व्हिजन एक प्रीमियम, डिझाईन-आधारित फाइन ज्वेलरी डेस्टिनेशन बनण्याचे आहे, ज्याची सुरुवात ऑनलाइन होऊन सौंदर्य दृष्टीने क्यूरेट केलेल्या फिजिकल स्पेसपर्यंत ते विस्तारित होईल. एआय-आधारित कस्टमायझेशन, व्हर्च्युअल ट्राय-ऑन आणि निर्बाध ई-कॉमर्सच्या माध्यमातून आम्ही डिजिटल खरेदी करण्यास सरावलेल्या, मूल्याला महत्त्व देणाऱ्या आणि अनुभवाने प्रेरित ग्राहकांपर्यंत पोहोचत आहोत. आमचे फ्लॅगशिप स्टोअर्स हे व्हिजन साकार करतील, जेथे टेक्नॉलॉजीची सुविधा आणि स्पर्श भावनेचा समन्वय साधला जाईल. भारतात आणि जगभरात विस्तार करत असताना आमचा उद्देश साधा आहे: लुसिरा ब्रॅंडला आधुनिक भारतीय लक्झरीचा पर्याय बनवणे- जो व्यक्ती-केंद्रित असेल, हेतुपूर्ण असेल आणि ज्यात भारतीय असल्याचा अभिमान असेल.”

 

लुसिराने स्वतःला “रिंग्ज किंग” म्हणून स्थापित केले आहे आणि विशेषतः विवाह-प्रस्ताव, विवाह, वर्धापन दिन आणि व्यक्तिगत सिद्धींसारखे खास क्षण काही विशिष्ट डिझाईन आणि नैतिक झळाळी सह साजरे करण्यावर त्यांचा विशेष फोकस आहे. या ब्रॅंडचा जन्म एका साध्या पण दमदार कल्पनेतून झाला आहे की, लक्झरी अर्थपूर्ण, व्यक्तिगत आणि तितकीच जबाबदारही असू शकते. लुसेन्ट या लॅटिन शब्दातून (ज्याचा अर्थ आहे ‘चमकणे’) प्रेरित लुसिरा हा ब्रॅंड मूल्य आणि सौंदर्य यांना प्रतिबिंबित करणाऱ्या आभूषणांसह जीवनातील मौल्यवान क्षण प्रकाशमान करण्याची वचनबद्धता तसेच शुद्धता आणि चमक यांचे प्रतिनिधित्व करतो. लुसिरा ब्रॅंड पारंपरिक कारागिरी आणि अत्याधुनिक इनोव्हेशन यांची सांगड घालतो. एआय-आधारित पर्सनलाईझेशन, प्रमाणित लॅब-ग्रोन डायमंड्स आणि डिजिटल-फर्स्ट अनुभवाच्या माध्यमातून तो विश्वास आणि सहभागाला प्रोत्साहन देतो. एरव्ही हा उद्योग पारंपरिक दृष्ट्या आजवर अपारदर्शक राहिला आहे.

 

लुसिरा झपाट्याने बदलत चाललेल्या ब्राईडल ज्वेलरी क्षेत्रात आपली खास जागा बनवत आहे. या क्षेत्रात सॉलीटेअर्स, साखरपुड्यासाठी हव्या तशा बनवून घेतलेल्या अंगठ्या, ईटर्निटी ब्रॅंड आणि दैनंदिन वापरासाठीच्या कन्व्हर्टिबल पिसेसवर खास ध्यान दिलेले आहे. या ब्रॅंडने पाच आगळेवेगळे सिग्नेचर डायमंड कट्स प्रस्तुत केले आहेत, जे प्रकाश, भावना आणि चमक महत्तम करण्याच्या दृष्टीने डिझाईन करण्यात आले आहेत. या केवळ अंगठ्या नाहीत, तर ती प्रेमाची अभिव्यक्ती आहे, सिद्धी प्राप्त केल्याचे प्रतीक आहे आणि नव्या पिढीसाठी नव्याने व्याख्या केलेला वारसा आहे.

 

सध्या लुसिरा ज्वेलरी ऑनलाइन उपलब्ध आहे आणि देशभरात त्यांची डिलिव्हरी मिळू शकते. लवकरच हा ब्रॅंड मुख्य महानगरांत आपले फ्लॅगशिप एक्सपिरीयन्स स्टोअर लॉन्च करणार आहे आणि त्यानंतर भारतात आणि जागतिक बाजारात आक्रमक रिटेल विस्ताराची त्यांची योजना आहे. टप्प्याटप्प्याने ओम्नीचॅनल विकासाच्या धोरणांतर्गत लुसिराचे लक्ष्य भारताचे पहिले ग्लोबल लॅब-ग्रोन डायमंड लक्झरी हाऊस बनण्याचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments