Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedआर्ट मॅजिक चित्रकला प्रदर्शन मंगळवारपासून (दि.२९)  आर्ट मॅजिकच्या वतीने बालगंधर्व कलादालन...

आर्ट मॅजिक चित्रकला प्रदर्शन मंगळवारपासून (दि.२९)  आर्ट मॅजिकच्या वतीने बालगंधर्व कलादालन येथे आयोजन : विनामूल्य प्रवेश

पुणे : ‘आर्ट मॅजिक’ १८ वे चित्रकला प्रदर्शन दिनांक २९ आणि ३० एप्रिल रोजी बालगंधर्व कलादालन येथे होणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार, दिनांक २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५.४५ वाजता होणार असून उद्घाटनाला ज्येष्ठ चित्रकार अल्हाद नाईक, सायली दामले उपस्थित राहणार आहेत.

 

आर्ट मॅजिकच्या संस्थापिका महालक्ष्मी पवार, अंबादास पवार यांनी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यावर्षी या कला प्रदर्शनात अ‍ॅक्रिलिक पेंटिंग, पोर्ट्रेट, वॉटर कलर पेंटिंग, पेंन्सिल स्केचिंग अशा विविध माध्यमातून कलाकारांनी त्यांच्या प्रतिभेला मुक्तपणे मांडले आहे. वय ५ वर्षे ते ६५ वर्षे या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या कलाकृती प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत. या प्रदर्शनात तब्बल ७५ कलाकार सहभागी झाले आहेत.

 

प्रदर्शनाचे संयोजन संयोजन अनुजा जोशी, ऋचा पोतदार, सार्थक चव्हाण, सिया पांडे, श्लोका धुमाळ, निल पायगुडे यांनी केले आहे. महालक्ष्मी पवार या मुलांना कला शिकवण्यासोबतच त्यांना नॅशनल व इंटरनॅशनल पातळीवर काम करायला शिकवतात व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी करतात.

 

द मॅस्ट्रो पेंटर व्हि.एस. गायतोंडे इंटरनॅशनल अॅवाॅर्ड ने महालक्ष्मी पवार यांना सन्मानित करण्यात आले आहे. आर्ट मॅजिक संस्थेला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहे. दिनांक २९ आणि ३० एप्रिल रोजी सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत पुणेकरांना विनामूल्य प्रदर्शन पाहता येणार आहे. तरी कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

 


RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments