ठाणे येथे *Serendipity* या अत्यंत वेगळ्या आणि प्रेरणादायी विषयावर पूर्ण दिवसाची एक विशेष कार्यशाळा पार पडली.
या कार्यशाळेचे प्रशिक्षण सुप्रसिद्ध प्रशिक्षक *श्री. विवेक मेहेत्रे* यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली झाले. कार्यशाळेच्या प्रारंभी प्रत्येक सहभागीला प्रशिक्षणाचा विषय स्वतःहून ओळखण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, बहुतेक सहभागी योग्य अंदाज लावू शकले नाहीत. कार्यशाळा संपेपर्यंत मात्र सर्व सहभागी “Serendipity” या संकल्पनेशी इतके समरस झाले की, त्यांनी या विषयाचा गहन आणि सखोल अभ्यास केला असल्याचे स्पष्ट दिसत होते.
श्री. विवेक मेहेत्रे यांनी प्रभावी उदाहरणे, गीते, संवाद , खेळ आणि अभ्यासपूर्ण सत्रांच्या माध्यमातून विषय सहज समजावून दिला. प्रत्येक सहभागी या कार्यशाळेतून *अनपेक्षित संधी आणि अनुभवांना कसे खुलेपणाने स्वीकारावे*, हे शिकू शकला.
कार्यशाळेचा संपूर्ण प्रवास सहभागींना अंतर्मुख करणारा, विचारप्रवृत्त करणारा आणि प्रेरणादायी ठरला. आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे, *Serendipity* या विषयावर भारतात कुठेही असे सत्र आयोजित होत नाही, आणि यामुळेच ही कार्यशाळा एक अविस्मरणीय व एकमेवाद्वितीय अनुभव ठरली.ही कार्यशाळा यशविवेक गोल्ड अभियानाचा एक भाग होता .कार्यशाळेला उपस्थित असलेल्या अनेकांचे प्रसन्न चेहरे आपण पाहू शकता .आपल्या विभागातही यश विवेक अभियानाच्या 28 विविध विषयांच्या कार्यशाळा आपण पुढाकार घेऊन आयोजित करू शकता .अधिक माहितीसाठी संपर्क करा yashavivekindia@gmail.com


