Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedथोरले बाजीराव पेशवे यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान...

थोरले बाजीराव पेशवे यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान तर्फे २८५ वी पुण्यतिथी साजरी

पुणे : थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्यावतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या २८५ व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारवाडा येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी पुणेकरांनी त्यांच्या शौर्याचे स्मरण करीत बाजीराव पेशवे यांना अभिवादन केले. तसेच पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे अशी मागणी संस्थेच्या वतीने सचिव कुंदनकुमार साठे यांनी केली.

 

यावेळी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, मोहन शेटे, श्रीकृष्ण चितळे, थोरले बाजीराव प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, पुष्करसिंह पेशवा, जगन्नाथ लडकत, श्रीकांत नगरकर, विश्वनाथ भालेराव उपस्थित होते. कार्यक्रमात शनिवार वाड्याचे सुरक्षारक्षक अनिल बागाव यांचा सन्मान करण्यात आला. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या १५ इंच उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण यावेळी पुष्करसिंह पेशवा यांच्या हस्ते करण्यात आले.

 

पांडुरंग बलकवडे म्हणाले, १८ व्या शतकातील हिंदवी साम्राज्याचा अभ्यास करण्यासाठी भारत इतिहास संशोधक मंडळात अध्यासनाची निर्मिती करण्यात येत आहे. या अध्यासनाचे नाव थोरले बाजीराव पेशवे अध्यासन असे असणार आहे.

 

कुंदनकुमार साठे म्हणाले, मागील अनेक वर्षांपासून पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे, परंतु आजही रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव देण्यात आलेले नाही. बाजीराव पेशवे कोण होते, त्यांचे कार्य जनमानसाला कळावे, यासाठी पेशवे यांचे नाव पुणे रेल्वे स्थानकाला लवकरात लवकर देण्यात यावे. मोहन शेटे यांनी मनोगत व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments