पुणे, 29 एप्रिल 2025 : भारतातील नागरिक आजही दैनंदिन आहारातील प्रथिनांच्या गरजा पूर्ण करण्यात मोठ्या आव्हानाला सामोरे जात आहे. आपल्या रोजच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असले तरी, सर्व वयोगटांतील अनेक लोकांची आवश्यक प्रथिनांची गरज पूर्ण होत नाही. याबाबत जनजागृती वाढवण्यासाठी आणि प्रॅक्टिकल सोलुशन देण्यासाठी, अल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्नियाने पुण्यात “अड्रेसिंग इंडियाज प्रोटीन गॅप : बेटर नुट्रीशन फॉर हेल्दीयर टुमारो’ या विषयावर एक पॅनेल चर्चा आयोजित केली.
हा कार्यक्रम पुण्यातील रॅमी ग्रँड हॉटेल अँड स्पा येथे झाला आणि यामध्ये अभिनेत्री सोहा अली खान, फिटनेस एक्स्पर्ट यास्मिन कराचीवाला आणि रितिका समद्दार (रीजनल हेड – डायेटेटिक्स, मॅक्स हेल्थकेअर, नवी दिल्ली) यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी सहभाग घेतला. पॅनेलने भारतीय नागरिकांच्या पोषणातील प्रोटीन गॅपच्या(प्रथिनांची कमतरता) समस्येवर प्रकाश टाकला. आहारमधील छोटे छोटे बदल किती मोठी भूमिका निभावतात- रोज आहारात मूठभर बदाम खाण्याने सर्व वयोगटांतील लोकांसाठी प्रोटीन लेव्हल सुधारण्यात कशी मदत होऊ शकते हे त्यांनी अधोरेखित केले.
सर्वांगीण वाढीस, आरोग्यास आणि ताकद वाढविण्यासाठी प्रोटीन अत्यावश्यक घटक आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, तरुणांना ऊर्जा मिळवण्यासाठी आणि प्रौढांना स्नायूंची दुरुस्ती व संपूर्ण आरोग्यासाठी प्रोटीनची गरज असते. तरीही भारतीय आहार या बाबतीत कमी पडतो. उदाहरणार्थ, एका बाऊल डाळीमध्ये सुमारे 18 ग्रॅम प्रोटीन असते, जे सक्रिय जीवनशैली असलेल्या किंवा जास्त पोषणाची गरज असलेल्या घरातील लोकांसाठी पुरेसे नसते.
पॅनेलिस्ट्सनी असे सांगितले की संपूर्ण आहार बदलण्याची गरज नाही. फक्त आहारातील छोटे छोटे बदल — जसे की जेवणामध्ये किंवा नाश्त्यांमध्ये बदामांचे सेवन करणे परिणामकारक ठरू शकते. बदाम हे नैसर्गिक, प्लांट-बेस्ड प्रोटीन सोर्स आहेत, आणि 30 ग्रॅम सर्व्हिंगमध्ये सुमारे 6 ग्रॅम प्रथिने मिळतात. त्यासोबतच बदामांमध्ये मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई आणि झिंकसारखी प्रतिकारशक्ती व आरोग्यासाठी आवश्यक पोषकतत्त्वेही असतात.
सोहा अली खान म्हणाल्या, “जेव्हा मी घरी जेवण बनविण्याची तयारी करते, तेव्हा प्रोटीनला सर्वात वरचे स्थान असते. विशेषतः माझी मुलगी वाढत्या वयाची आणि खूप ऍक्टिव्ह असल्याने. बदाम हे आमच्यासाठी पोषणाचा सोपा आणि विश्वासार्ह स्रोत ठरले आहेत. शूट्सदरम्यान देखील मला बदाम खायला आवडतात. ते मला पचायला जड न वाटता एनर्जी देतात. मी माझ्या मुलीच्या आहारात, तिच्या नाश्त्यात किंवा सॅलडमध्ये देखील बदाम घालते. हा एक छोटा पण अर्थपूर्ण बदल आहे ज्यामुळे आपण दररोज पुरेशे प्रोटीन मिळवतो.”
यास्मिन कराचीवाला म्हणाल्या, “एक फिटनेस प्रोफेशनल म्हणून, मी नेहमी लोकांना एनर्जी, रिकव्हरी आणि स्ट्रेंथसाठी प्रोटीनचे असलेले महत्त्व सांगते. बदाम हे माझे नेहमीचे पर्याय आहेत कारण ते चांगल्या दर्जाचे प्लांट-बेस्ड प्रोटीन देतात, जे व्यायामानंतर/पोस्ट वर्कआऊट खूप उपयोगी पडतात. ते तुम्हाला तृप्त ठेवतात, त्यामुळे ते स्मार्ट स्नॅक चॉईस ठरतात. मी बदाम नेहमी बरोबर ठेवते, मग मी क्लायंट्सना ट्रेनिंग देत असेल किंवा शूटला जात असेल. बदाम शरीराला योग्य पोषण देण्याचा एक सोपा मार्ग आहे.”
रितिका समद्दार म्हणाल्या, “भारतातील बऱ्याच लोकांच्या डेली प्रोटीन नीड पूर्ण होत नाहीत, हे तेव्हा कळते जेव्हा आपण त्यांचे आहार तपासून बघतो. ही गॅप भरून काढण्यासाठी,बदामासारखे प्रोटीन रिच फूड आहारात समाविष्ट करणे हा एक उत्तम मार्ग आहे. मी बदामांची शिफारस अनेक वेळा करते कारण ते सहज आहारात घेता येतात, विशेषतः कुटुंबांसाठी. बदाम प्रोटीन बरोबरच ते इतर आवश्यक पोषकतत्त्वेही देतात आणि बहुतांश पॅकेज्ड स्नॅक्सपेक्षा ते चांगले पर्याय आहेत. दररोज मूठभर बदामाचे सेवन केल्यास पोषण सुधारण्यात मोठा फायदा होते.”
आयसीएमआर आणि एफएसएसएआय सारख्या संस्थांनीही बदामाच्या पोषणमूल्याची कबुली दिली आहे. ‘इट राईट ड्युरिंग कोविड-19’ च्या मार्गदर्शक तत्वांमध्ये, बदामांना प्लांट प्रोटीनच्या चांगल्या स्रोतांपैकी एक म्हणून शिफारस करण्यात आली आहे, शिवाय व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियमसारखी पोषकतत्त्वेही त्यातून मिळतात. आयसीएमआर ने देखील रोजच्या संतुलित आहारात नियमितपणे नट्स (सुकामेवा) समाविष्ट करण्याचा सल्ला दिला आहे.
रोजच्या आहारात पुरेशी प्रोटीन मिळवणे फारसे कठीण किंवा महागडे नाही. रोजच्या साध्या निवडी जसे की नाश्त्यात बदाम खाणे- कुटुंबांला चांगल्या आरोग्याकडे नेणारे प्रभावी पाऊल ठरू शकते.
अल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्निया बद्दल:
कॅलिफोर्निया बदाम ‘आपण जे पिकवतो आणि ज्या प्रकारे आपण ते पिकवतो’ या क्वालिटी बेसिसवर तुमचे जीवन अधिक सुधृढ बनवते. स्ट्रॅटेजिक मार्केट डेव्हलपमेंटमधील नेतृत्वासह इनोव्हेटिव्ह रिसर्च आणि उद्योगातील उत्तम पद्धतींचा वेगाने अवलंब करत अल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्निया नैसर्गिक, शुद्ध आणि दर्जेदार बदामांना प्रोत्साहन देतो. या बोर्डाचे प्रतिनिधित्व 7,600 हून अधिक कॅलिफोर्नियातील बदाम उत्पादक आणि प्रक्रिया करणारे लोक करतात, त्यापैकी बरेच जणांचा हा अनेक पिढ्यांपासूनचा व्यवसाय आहे. 1950 मध्ये स्थापन झालेली आणि कॅलिफोर्नियातील मोडेस्टो येथे असलेली ही नॉन-प्रॉफिट-ऑर्गनायझेशन आहे, जी युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरच्या देखरेखीखाली उत्पादकांद्वारे स्वीकारलेल्या फेडरल मार्केटिंग ऑर्डरचे प्रशासन करते. अल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्निया किंवा बदामांबद्दल अधिक माहितीसाठी, Almonds.com ला भेट द्या किंवा California Almonds च्या Facebook, Twitter, Pinterest, Instagram आणि California Almonds blog वर पाहा.


