सर्व्हाइकल स्पाइन फ्रॅक्चरमुळे तब्बल सहा महिने व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णावर अभूतपूर्व अशा फ्रेनिक नर्व्ह स्टिम्युलेशन सर्जरीमुळे रुग्णाची स्वतंत्रपणे श्वसन प्रक्रिया पुनर्स्थापित / रुग्णानी घेतला स्वतंत्रपणे मोकळा श्वास
पुणे, ३० एप्रिल २०२५ : पुण्यातील वैद्यकीय उपचारांमध्ये अग्रगण्य असलेल्या रुबी हॉल क्लिनिकने महाराष्ट्रातील पहिल्या फ्रेनिक नर्व्ह न्यूरोमोड्युलेशन शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करत एक महत्त्वपूर्ण वैद्यकीय यश मिळवले आहे. रुबी हॉल क्लिनिकमधील न्यूरो ट्रॉमा युनिटचे प्रमुख व इंटेन्सिव्हिस्ट डॉ. कपिल झिरपे यांच्या तज्ञ देखरेखीखाली आणि कन्सल्टंट फंक्शनल न्यूरोसर्जन डॉ.मनीष बलदिया यांनी केलेल्या या दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे ५८ वर्षीय व्यक्ती श्री. संजय यशवंत पै यांना पाठीच्या कण्यातील दुखापतीमुळे सहा महिने मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर अवलंबून राहिल्यानंतर स्वतंत्रपणे व मोकळा श्वास घेता आला.
२५ जुलै २०२४ रोजी बाथरूममध्ये पडल्यामुळे श्री पै यांना मणक्याला दुखापत (C3-C4 फ्रॅक्चर- मणक्याच्या मध्यभागी असलेल्या कशेरुका) झाली होती, त्यांच्यावर सुरुवातीला दुसऱ्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. C4 कॉर्पेक्टॉमी ( C4 पातळीवर असलेल्या कशेरुका शस्त्रक्रियेने काढण्याची प्रक्रिया) ,C3-C4 डिसेक्टॉमी ( मणक्यामधील C3-C4 पातळीच्या कशेरुकांमधील चकत्या काढून टाकण्याची प्रक्रिया) आणि स्पाइनल फ्यूजनच्या ( मणक्यामधील कशेरुका जोडण्याची प्रक्रिया) अनेक शस्त्रक्रिया करूनही, ते क्वाड्रिप्लेजिक ( हातापायाच्या हालचाली न होणे/ पक्षघात ) स्थितीत होते आणि व्हेंटिलेटरवर अवलंबून राहिले.जरी मेंदूत कोणतेही तीव्र बदल दिसून आले नाहीत, तरी इमेजिंग चाचणीतून C3-C4 अँटीरियर सबलक्सेशन आणि स्पाइनल कॉर्ड कॉम्प्रेशनची असल्याचे स्पष्ट झाले.
आधुनिक उपचारांची गरज ओळखून, श्री पै यांना १९ सप्टेंबर २०२४ रोजी रुबी हॉल क्लिनिकमध्ये मज्जासंस्थेच्या कार्यावर देखभाल (न्यूरो-मॉनिटरिंग) करण्यासाठी, व्हेंटिलेटर सपोर्ट आणि पुनर्वसन यासह पुढील व्यवस्थापनासाठी हलवण्यात आले. जेव्हा ते रुग्णालयात आले तेव्हा ते व्हेंटिलेटरवर अवलंबून व शुद्धीवर होते, त्यांना पोटात नळी द्वारे पोषक अन्न दिले जात होते (पर्क्युटेनियस एंडोस्कोपिक गॅस्ट्रोस्टोमी) आणि अँटीबायोटिक थेरपी सुरु होती.
व्हेंटिलेटरशी संबंधित न्यूमोनिया, स्ट्रेस अल्सर, डीप व्हेन थ्रोम्बोसिस आणि पल्मोनरी एम्बोलिझम यासारख्या दीर्घकाळ व्हेंटिलेटर वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर धोके लक्ष्यात घेऊन, रुबी हॉल क्लिनिकमधील वैद्यकीय टीमने (डॉ.रिचा सिंग,डॉ.मनीष बलदिया, त्यांच्या आयसीयू टीमसह डॉ. झिरपे आणि डॉ. ग्रँट) फ्रेनिक नर्व्ह न्यूरोमोड्युलेशन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही प्रगत शस्त्रक्रिया श्वासोच्छवासासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख स्नायू डायफ्रामला उत्तेजित करत मणक्याच्या दुखापतींमुळे मज्जातंतूमध्ये कमकुवतपणा असलेल्या रुग्णांसाठी एक आवश्यक उपाय प्रदान करते.
रुबी हॉल क्लिनिकचे कन्सल्टंट फंक्शनल न्यूरोसर्जन डॉ. मनीष बलदिया म्हणाले, ” व्यापक प्रयत्न करून देखील व्हेंटिलेटरचे अवलंबत्व काढणे कठीण जात होते, परंतु फ्रेनिक नर्व्ह स्टिम्युलेशन शस्त्रक्रियेनंतर लगेचच आम्हाला त्यांच्या श्वासोच्छवासात उल्लेखनीय सुधारणा दिसून आली. ही एक अत्यंत नाजूक आणि दुर्मिळ प्रक्रिया होती . यामध्ये आम्ही फ्रेनिक नर्व्हजवळ ( श्वसनाचे प्राथमिक स्नायू असलेल्या डायाफ्रामवर( छिद्रपटल) नियंत्रण ठेवून श्वासोच्छवासात महत्त्वाची भूमिका बजावणारी एक प्रमुख मज्जातंतू) एक लहान उपकरण ठेवले. या उपकरणाच्या मदतीने, आम्ही रुग्णाचे डायाफ्राम रिमोटद्वारे बाहेरून सक्रिय करत नियंत्रित करू शकलो आणि व्हेंटिलेटरचा अवलंब कमी करण्याची प्रक्रिया सुरु करू शकलो. रुग्णाच्या शारीरिक प्रतिसादानुसार सिमुलतार कार्यान्वित करण्यात आला, यामुळे थकवा न येता डायाफ्रामची ताकद हळूहळू वाढत गेली या शस्त्रक्रियेच्या यशामुळे पाठीच्या कण्यातील गंभीर दुखापती आणि दीर्घकालीन व्हेंटिलेटर अवलंबित्व असलेल्या रुग्णांसाठी एक नवीन आशा निर्माण झाली आहे .”
शस्त्रक्रियेनंतर, श्री. पै यांच्या प्रकृतीमध्ये उत्तमरीत्या सुधारणा झाली. हळूहळू, त्यांना देण्यात आलेले व्हेंटिलेटरचे साहाय्य कमी करण्यात आले आणि २८ एप्रिल २०२५ पर्यंत, त्यांना जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले.
रुबी हॉल क्लिनिकचे चीफ कार्डिओलॉजिस्ट, अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.परवेझ ग्रांट म्हणाले की , रुबी हॉल क्लिनिकमध्ये अभिनवता आणि रुग्ण-केंद्रित उपचार हे आम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी आहे. महाराष्ट्रातील पहिली फ्रेनिक नर्व्ह न्यूरोमोड्युलेशन शस्त्रक्रिया ही वैद्यकीय सेवेतील शक्यतांच्या सीमारेषा ओलांडून रुग्णांना जीवनात दुसरी संधी मिळवून देण्याप्रती आमची वचनबद्धता दिसून येते.
रुबी हॉल क्लिनिकच्या आयसीयू टीम (एनटीयू२) च्या समर्पण आणि कौशल्यामुळे ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाली, ज्यामुळे महाराष्ट्रात क्रिटिकल केअर आणि न्यूरोसर्जिकल क्षेत्रात एक नवीन मानक स्थापित झाले आहे .


