Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान ‘सिनेमास ऑफ इंडिया – अ फेस्टिव्हल...

पुण्यात ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान ‘सिनेमास ऑफ इंडिया – अ फेस्टिव्हल ऑफ कंटेम्पररी इंडियन फिल्म्स’ चित्रपट महोत्सव विविध भारतीय भाषांमधील 12 पुरस्कार विजेते चित्रपट तीन दिवसांमध्ये होणार प्रदर्शित

पुणे 6 फेब्रुवारी २०२४ : पुण्यातील नॅशनल फिल्म अर्काइव्ह (एनएफएआय) येथे ९ ते ११ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत होणाऱ्या ‘सिनेमास ऑफ इंडिया – अ फेस्टिव्हल ऑफ कंटेम्पररी इंडियन फिल्म्स’ या तीन दिवसीय चित्रपट महोत्सवात विविध भारतीय भाषांमधील बारा पुरस्कार प्राप्त भारतीय चित्रपट दाखवले जातील. पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी), इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स – इंडिया चॅप्टर (एफआयपीआरईएससीआय -इंडिया), आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन-नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (एनएफडीसी -एनएफएआय) यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.चित्रपट हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, तमिळ, मणिपुरी-तंगखुल, राजस्थानी-हिंदी आणि खासी-जैंतिया-गारो-हिंदी या भाषांमध्ये आहेत.

एफआयपीआरईएससीआय -इंडियाचे सरचिटणीस श्री प्रेमेंद्र मजुंबर आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव (चित्रपट) श्री प्रितुल कुमार यांच्या हस्ते उद्घाटन होईल.

चित्रपट प्रदर्शनाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे –

शुक्रवार, फेब्रुवारी. 9: ‘एब आले ऊ’ (2019, हिंदी, 98 मिनिटे, 11am); बारा बाय बारा [१२x१२] (२०२१, हिंदी, ११८ मिनिटे, दुपारी १.३०); कोली एसरू [चिकन करी] (2022, कन्नड, 84 मिनिटे, संध्याकाळी 4 वाजता; बिर्याणी [फ्लेव्हर्स ऑफ फ्लेश] (2019, मल्याळम, 93 मिनिटे, संध्याकाळी 6 वाजता)

शनिवार, फेब्रुवारी. 10: अपराजितो [दि अनडीफिटेड ] (2022, बंगाली, 138 मिनिटे, सकाळी 10.30); नसीर (२०२०, तमिळ, ७८ मिनिटे, दुपारी २); निषिद्धो [फॉरबिडन ] (२०२२, मल्याळम, १२४ मिनिटे, दुपारी ४); नाइन हिल्स वन व्हॅली (2021, मणिपुरी-तांगखुल, 75 मिनिटे, संध्याकाळी 6.30)

रविवार, फेब्रुवारी. 11: नानेरा [मॅटर्नल ग्रँडफाथर्स हाऊस ] (2022, राजस्थानी-हिंदी, 149 मिनिटे, सकाळी 10.30); बी चेस ने वेथ [आय एम नॉट दि रिव्हर झेलम ] (२०२२, हिंदी, ९५ मिनिटे, दुपारी १.३०; ह्या गोष्टिला नावच नाही (२०२३, मराठी, १४१ मिनिटे, दुपारी ३.३०; लेवदूह [मार्केट ] (२०१९, खासी-जैंतिया-गारो-हिंदी, ९४ मिनिटे, संध्याकाळी ६)

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments