Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedरे-बॅन मेटा ग्‍लासेस् भारतात दाखल: मेटा एआय इंटीग्रेटेडच्‍या भविष्‍याचा अनुभव घेण्‍यासह ऑफरवर...

रे-बॅन मेटा ग्‍लासेस् भारतात दाखल: मेटा एआय इंटीग्रेटेडच्‍या भविष्‍याचा अनुभव घेण्‍यासह ऑफरवर असलेल्‍या अनेक स्‍टाइल्‍सचा आनंद घ्‍या

रे-बॅन मेटा ग्‍लासेस् आता भारतात येत आहे, ज्‍यामध्ये आयकॉनिक स्‍टाइल आणि अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचे संयोजन आहे, जे व्‍यक्‍तींना सर्वाधिक केअर करणाऱ्या गोष्‍टीशी कनेक्‍टेड राहण्‍यास मदत करतात. २९,९०० रूपयांपासून किंमत असलेल्‍या या ग्‍लासेसच्‍या प्री-ऑर्डरला आजपासून Ray-Ban.com या वेबसाइटवर सुरूवात होत आहे आणि कलेक्‍शन १९ मेपासून Ray-Ban.com वर आणि देशभरातील आघाडीच्‍या ऑप्टिकल व सनग्‍लास स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध असेल.

मेटा एआय इंटीग्रेटेडसह फक्‍त ‘हे मेटा’ म्‍हणा आणि आसपासच्‍या विश्‍वाबाबत प्रश्न विचारा, तसेच मुंबईतील ऐतिहासिक स्‍थ्‍ळांबाबत जाणून घ्‍या किंवा किचनमधील घटकांवर आधारित कूकिंग टिप्‍स मिळवा. संगीत किंवा पॉडकास्‍ट्स स्‍ट्रीमिंग करायचे असो, कॉल्‍स घ्‍यायचे असो किंवा इन्‍स्‍टाग्राम किंवा फेसबुकवर लाइव्‍ह जायचे असो रे-बॅन मेटा ग्‍लासेस् परिपूर्ण सोबती आहेत, जे तुम्‍हाला हँड्स-फ्री सर्व टास्‍क्‍स करण्‍यास साह्य करतात.

नवीन देशात प्रवेश करायचा असो आणि ट्रेनच्या स्‍टेशनकडे जाणाऱ्या दिशांबाबत विचारायचे असो किंवा कुटुंबातील सदस्‍यांसोबत वेळ व्‍यतित करायचा असो आणि भाषेसंदर्भात येणारा अडथळा दूर करायचा असो तुम्‍ही आधीच लँग्‍वेज पॅक डाऊनलोड केले असेल तर एअरप्‍लेन मोडवर असताना देखील इंग्रजी, फ्रेंच, इटालियन व स्‍पॅनिश या भाषांमध्‍ये विनासायास संवाद करू शकता. तुम्‍ही यापैकी एखाद्या भाषेमध्‍ये इतरांसोबत संवाद साधत असाल तर रिअल-टाइममध्‍ये ग्‍लासेसच्‍या माध्‍यमातून तुमच्‍या पसंतीच्‍या भाषेमध्‍ये ते काय म्‍हणत आहे हे ऐकायला मिळेल आणि ते तुमच्‍या फोनवर संवादाचे भाषांतरित ट्रान्‍सक्रिप्‍ट पाहू शकतात किंवा त्‍यांच्‍या फोनमधून ऐकू शकतात. सुरूवात करण्‍यासाठी फक्‍त म्‍हणा ‘हे मेटा, स्‍टार्ट लाइव्‍ह ट्रान्‍सलेशन’.

प्रत्‍येक व्‍यक्तिमत्त्वासाठी स्‍टाइल

रे-बॅन मेटा ग्‍लासेस् कलेक्‍शन कालातील वेफेरर स्‍टाइलमध्‍ये येते, जे तुम्‍हाला माहिती आहे आणि आवडते (प्रमाणित व मोठ्या आकारांमध्‍ये). तसेच स्‍कायलर ही सर्वात सर्वसमावेशक व युनिव्‍हर्सल फिटिंग डिझाइन आता शाइनी चॉकी ग्रेमध्‍ये उपलब्‍ध आहे. सन, क्‍लीअर, पोलाराईज्‍ड किंवा ट्रान्झिशन्‍स® अशा सर्व श्रेणीमध्‍ये उपलब्‍ध असण्‍यासह आम्‍ही रे-बॅन मेटा ग्‍लासेसना प्रीस्क्रिप्‍शन लेन्‍स-कॉम्‍पॅटिबल म्‍हणून देखील देखील डिझाइन केले आहे.

मेटा एआय अॅपसोबत स्‍मार्टर इंटीग्रेशन

आमच्‍या सर्व सर्वात शक्तिशाली एआय अनुभवांना एकीकृत करण्‍यासाठी रे-बॅन मेटा ग्‍लासेसना नवीन लाँच करण्‍यात आलेल्‍या मेटा एआय अॅपसोबत संलग्‍न करण्‍यात आले आहे, जेथे अॅपमध्‍ये प्रत्‍यक्ष अतिरिक्‍त एआय वैशिष्‍ट्यांचा समावेश करण्‍यात आला आहे, जे रे-बॅन मेटा ग्‍लासेस् अनुभवाला अधिक उत्‍साहित करतात. ग्‍लासेसवरील मेटा एआयसह संवादाला सुरूवात करा, त्‍यानंतर तुमच्‍या शेवटच्‍या संवादापासून पुन्‍हा सुरूवात करण्‍यासाठी अॅपमधील हिस्ट्री टॅबमधून अॅक्‍सेस मिळवा. तुम्‍ही ग्‍लासेसमध्‍ये फोटोजची भर केल्‍यानंतर क्रिएटिव्‍ह बदल करू शकता, मेटा एआयला फोटोंची भर करण्‍यास, काढून टाकण्‍यास किंवा काही भाग बदलण्‍यास सांगू शकता. ग्‍लासेस् एआय युगामधील सर्वात उत्‍साहवर्धक नवीन हार्डवेअर श्रेणी म्‍हणून उदयास आले आहेत, जेथे रे-बॅन मेटा ग्‍लासेस् शक्‍य असलेल्‍या गोष्‍टींना नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहेत.

लवकरच, तुम्‍ही ग्‍लासेसच्‍या माध्‍यमातून हँड्स-फ्री इन्‍स्‍टाग्राममधून प्रत्‍यक्ष मेसेजेस्, फोटोज पाठवू शकता व प्राप्‍त करू शकता, तसेच ऑडिओ कॉल्‍स व व्हिडिओ कॉल्‍स करू शकता. याव्‍यतिरिक्‍त व्‍हॉट्सअॅप व मेसेंजर, तसेच सकाळच्‍या वेळी प्रवासादरम्‍यान किंवा वीकेण्‍ड हाइक्‍सदरम्‍यान कनेक्‍टेड राहण्‍यासाठी अनुकूल असलेल्‍या आयफोन किंवा अँड्रॉइड फोनवरील स्‍थानिक मेसेजिंग अॅपच्‍या माध्‍यमातून कॉल्‍स करता येऊ शकतात आणि मेसेजेस् पाठवता येऊ शकतात. फक्‍त म्‍हणा, ‘हे मेटा, सेण्‍ड ए पिक्‍चर टू प्रिया ऑन व्‍हॉट्सअॅप’.

आम्‍ही स्‍पॉटीफाय, अॅप्‍पल म्‍युझिक, अॅमेझॉन म्‍युझिक आणि शाजम अशा म्‍युझिक अॅप्‍सची उपलब्‍धता देखील वाढवत आहोत. ज्‍यामुळे तुम्‍ही मेटा एआयला म्‍युझिक चालू करण्‍यास सांगू शकाल आणि डिफॉल्‍ट लँग्‍वेज इंग्रजीमध्‍ये स्‍थापित असेपर्यंत कुठेही तुमची आवडती गाणी ऐकण्‍याचा आनंद घेऊ शकाल. मेटा एआयला तुमची आवडती गाणी चालू करण्‍यास किंवा कॅफेमध्‍ये ऐकलेले गाणे ओळखण्‍यास सांगा. फक्‍त म्‍हणा, ‘हे मेटा, व्‍हॉट्स धीस सॉंग?’ किंवा ‘हे मेटा, प्‍ले द लेटेस्‍ट बॉलिवुड सॉंग्‍स’.

आम्‍ही भारतातील अधिकाधिक व्‍यक्‍तींना या ग्‍लासेसना स्विकारताना आणि प्रत्‍यक्षात वापर करताना बघण्‍यास अत्यंत उत्सुक आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments