पुणे, 16 मे 2025: नाइट फ्रँक इंडिया यांनी सादर केलेल्या ताज्या अहवालानुसार, एप्रिल 2025 मध्ये पुण्याच्या रिअल इस्टेट बाजारात एकूण 14,421 मालमत्ता व्यवहार नोंदवले गेले, ज्यातून 547 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क महसूल जमा झाला. मालमत्ता नोंदणीत वार्षिक तुलनेत (YoY) 1% वाढ झाली असली तरी, मुद्रांक शुल्क संकलनात मात्र 3% ने किरकोळ घट झाली. ही घट प्रामुख्याने कमी किमतीच्या मालमत्ता व्यवहारांमध्ये वाढ झाल्यामुळे झाली आहे.
मालमत्तेची नोंदणी, मालमत्तेचे मूल्य आणि मुद्रांक शुल्क संकलन
वर्ष
महिना
एकूण नोंदणी
मुद्रांक शुल्क संकलन
(भारतीय रुपये कोटी)
2024
जानेवारी
17,786
589
2024
फेब्रुवारी
18,791
662
2024
मार्च
22,189
822
2024
एप्रिल
14,244
566
2024
मे
12,280
440
2024
जून
14,690
545
2024
जुलै
13,731
521
2024
ऑगस्ट
13,645
599
2024
सप्टेंबर
11,056
508
2024
ऑक्टोबर
20,894
751
2024
नोव्हेंबर
13,371
475
2024
डिसेंबर
17,348
620
2025
जानेवारी
17,449
638
2025
फेब्रुवारी
19,025
713
2025
मार्च
24,494
960
2025
एप्रिल
14,421
547
स्रोत: नाईट फ्रँक रिसर्च, महाराष्ट्र सरकार – नोंदणी आणि मुद्रांक विभाग (IGR)
मालमत्ता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क संकलन
कालावधी
नोंदणी (युनिट)
मुद्रांक शुल्क संकलन (रुपये कोटी )
एप्रिल-24
14,244
566
एप्रिल-25
14,421
547
वार्षिक बदल
1%
-3.4%
महिन्यागणिक (MoM) तुलनेत, पुण्यात मालमत्ता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क संकलन या दोन्हीमध्ये 43% घट झाली आहे. मात्र, हा ट्रेंड चक्रीय असल्याचे दिसून येते, कारण ऐतिहासिक आकडेवारीनुसार मार्च महिन्यात नेहमीच जोरदार व्यवहार नोंदवले जातात, तर एप्रिलमध्ये तुलनेने मंदी दिसून येते.
मालमत्ता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क संकलन
कालावधी
नोंदणी (युनिट)
मुद्रांक शुल्क
(रुपये कोटी )
कालावधी
नोंदणी (युनिट)
मुद्रांक शुल्क
(रुपये कोटी )
नोंदणी (महिना)
मुद्रांक शुल्क
(मासिक)
मार्च-23
21,389
621
एप्रिल-23
11,010
319
-49%
-49%
मार्च-24
14,309
822
एप्रिल-24
8,758
566
-39%
-31%
मार्च-25
25,494
960
एप्रिल-25
14,421
547
-43%
-43%
वर्षाच्या आतापर्यंतच्या (YTD) विश्लेषणानुसार, पुण्याचा मालमत्ता बाजार स्थिर आहे आणि गेल्या चार वर्षांतील जानेवारी ते एप्रिल या कालावधीसाठी सर्वाधिक मालमत्ता नोंदणी व मुद्रांक शुल्क संकलन नोंदवले गेले आहेत. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत, मालमत्ता नोंदणीत 5% वाढ झाली असून मुद्रांक शुल्क संकलनात 8% वाढ झाली आहे.
मालमत्ता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क संकलन
कालावधी (जानेवारी-एप्रिल)
नोंदणी (युनिट)
मुद्रांक शुल्क संकलन (रुपये कोटी )
2022
52,823
1,696
2023
49,517
1,897
2024
73,010
2,639
2025
76,389
2,858
2025 मध्ये वार्षिक बदल
5%
8%
एप्रिल 2025 मध्ये सर्व विभागांमध्ये मागणी वाढली
एप्रिल 2024 मध्ये 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या घरांचा वाटा 14% होता, जो एप्रिल 2025 मध्ये वाढून 16% झाला आहे. यावरून प्रीमियम घरांबाबतची वाढती रसिकता स्पष्ट होते. मात्र, 1 कोटी रुपयांपर्यंतच्या मालमत्तांचा वाटा अजूनही 83% इतका असल्यामुळे, एकूण मागणी प्रामुख्याने या श्रेणीतच केंद्रित असल्याचे दिसते. हे सूचित करते


