पुणे,२१ मे 2025 : सौर आणि अक्षय उर्जा क्षेत्रात भारतातील आघाडीचे मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ईक्यू इंटरनॅशनल मॅग्जीन तर्फे पुण्यात नुकतेच जेडब्ल्यू मॅरिएट, एसबी रोड येथे सुर्यकॉन पुणे 2025 या सौर उर्जा परिषद,एक्स्पो आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या एक दिवसीय परिषदेमध्ये पीएम सुर्यघर योजना मेळावा,महाराष्ट्र कुसुम मीट, सोलर बायर – सेलर मीट, सीॲन्डआय ग्रीन एनर्जी मीट, पुणे सस्टेनेबिलिटी ॲन्ड नेट झीरो समिट, महाराष्ट्र सोलर ॲन्ड आरई ॲवॉर्डस 2025 त्याचबरोबर या उद्योगातील नेतृत्वासह 500 हून अधिक व्यावसायिक सहभागी झाले होते. एक दिवसीय उच्च स्तरीय परिषदेत सौर उर्जा क्षेत्रातील प्रमुख भागधारक सहभागी झाले होते.


